पूर्वीची गोष्ट आहे. पाटलिपुत्रावर उग्रसेन नांबाचा राजा राज्य करीत होता. तो फार शूर होता. त्याचे सरदार सुद्धा त्याच्या सारखेच पराक्रमी होते. यामुळे शत्रूवर सुद्धा त्याचा वचक होता. त्याला पाहतांच ते थरथर कांपत असत. इतके असून सुद्धा त्याच्या सरदारांमध्ये काही सरदार अन्यायी व अत्याचारी होते. पण ते राजाच्या विश्वासांतील असल्याने त्यांच्या विरुद्ध कोणी काही बोल, शकत नव्हते. उग्रसेनाच्या सैन्यांत एक सहदेव नांबाचा सैनिक होता तो फार शूर होता. त्याला आढळून आले की काही दुष्ट सरदार प्रजेला त्रास देत आहेत व त्यामुळे विना- कारण राजाचें नांव बदनाम होत आहे. सहदेवाला हे मुळीच आवडले नाही. म्हणून त्याने प्रजेच्या कल्याणासाठी त्या सर्व दुष्ट लोकांचा नायनाट करण्याचा निश्चय केला. जेव्हा जेव्हां संधि मिळे तेव्हां तेव्हां सहदेव त्या अत्याचारी दुष्ट सरदारांवर हल्ला करीत असे व त्यांना उद्दन ते पन तो गरीब प्रजेला बांटून देत असे. काही दिवसांनी त्या दुष्ट सरदारांनी राजाकडे तक्रार केली की सहदेव डाकू झाला आहे. तो लोकांच्यावर हल्ले करून त्यांना लुबाडतो. अर्थातच राजाने त्याला पकडण्यासाठी सैनिक पाठविले. पण तो त्यांच्या हाती लागला नाही. त्यामुळे राजाने त्याला लुटेरा ठरवून ज्याच्या हाती तो सांपडेल त्याने त्याला मारून टाकावें असा हुकूम सोडला. काही दिवस गेले. एक दिवस रात्री उनसेन राजाला स्वमांत एक देवी दिसली. ती म्हणाली "राजा! ऊट. जाऊन चोरी करून ये.ही देवाची आज्ञा आहे असेच समज," राजा खडबडून जागा झाला. या विचित्र स्वमाचें त्याला फार आश्चर्य वाटले. तरी तो तसाच डोळे मिळून पडून राहिला. तितक्यांत त्याला पुन्हा तीच देवी दिसली. म्हणाली-"जर तूं चोरी केली नाहीस तर तुझं राज्य जाईल ही देवाची इच्छा आहे." दोन वेळा त्याला तेंच स्वम पडले. तरी त्याने चोरी करण्यास जाण्याचा विचार केला नाही. परंतु यात काही सरी गूढ असले पाहिजे असे त्याची मनोदेवता सांगू लागली. पुन्हां त्याने डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न केला. पण तिसऱ्यांदाहि त्याला तसेंच स्वा पडले. आता मात्र तो स्वस्थ बसू शकला नाही. त्यांत खरोखरच काही तरी दैवी शक्ति आहे असे त्याला बाटले. तो उठला. चूळ भरली आणि कोणा- च्याहि न कळत राजवाड्याच्या बाहेर निवून गेला. माझ्या नोकरपैिकी कोणी जर मला पाहिले तर काय म्हणतील! असा विचार करीत तो तबेल्यात गेला. आपला घोडा काढला आणि जंगलाच्या बाजूला निघून गेला. सुदैवाने त्याला कोणी पाहिले नव्हते म्हणून बरें. चोरीच करावयास निघालेला तो चोरा- प्रमाणे आपले तोंड झांकून घेतले त्यानें. चोराविषयी त्याच्या मनात विचार पोळू लागले. चोरी करणे हे सुद्धा एक कौशल आहे. किती विचार करून पावले टाकावी लागतात. त्यांना धैर्य आणि साहस कमालीचे असले पाहिजे. पुढील परिणामाला तयार राहिले पाहिजे. समजा लोकांच्या हाती सांपडलों तर त्यांचा मार खाण्याची तयारी पाहिजे. फाशीची शिक्षा जरी झाली तरी त्याला सिद्ध झाले पाहिजे. असे नाना त-हेचे विचार येऊन त्याचे मन राजा असून सुद्धा कचरू लागले. त्याला वाटले जर आपण चोरी केली आणि सांपडलो तर मार खावा लागेल. कदानित आपण कोण हे कळण्यापूर्वीच आपल्याला मारून टाकले तर! आणि चोर म्हणून आपल्याला कोणी पकडले आणि राजा असल्याचे त्याला कळले तर लोकांत किती अपमान होईल! छे! छे!! आपल्या ऐकठ्याच्याने हे काम होणार नाही. कोणा तरी चोराला गांठून त्याच्याशी दोस्ती केली पाहिजे. राजाच्या मनात विचार येत होते आणि तो जंगलांतून पुढे पुढे चालला होता.
तेव्हांच काव्या घोव्यावर स्वार होऊन येत असलेली एक व्यक्ति त्याला दिसली. 'इतक्या रात्रीचा कुठे निघालास ! काय नांव तुझें ?” राजाने विचारले. पण तो मनुष्य काही बोलला नाही. राजाने लागलीच आपली तलवार उपसली आणि हो तयार म्हणून त्याला सावध केलें. दोषांचे दंद्र सुरू झाले पहिल्याने त्यांनी पोव्यावरूनच युद्ध केले. पण मग खाली उतरून त्यांना युद्ध करावे लागले. थोड्याच वेळांत तो मनुष्य पडला. तो राजास म्हणाला-"तुझ्या सारखा योद्धा मी अद्याप पाहिला नाही. तुझें युद्ध कौशल्य अचाट आहे. तूं पाहिजे तर मला मारून टाक." 'तुला मारण्यांत माझा काहीहि फायदा नाही. तूंहि एक उत्तम योद्धा असावास असें वाटते. तुझ्यामुळे झाले तर माझें हितच होईल, काय तुझे नांवर" "माझे नांव सहदेव." स्याने सांगितले, "तर मग तूहि चोर आहेस! बरें झालें. चल आपण दोघे जण मिळून कोठेतरी जाऊन चोरी करूं, आपण राजवाड्यांत जाऊन चोरी कर या का!" राजाने विचारले. नाही. चांगल्या माणसांना मी कधी त्रास देत नाही. महाराजांना मी काहीहि त्रास देणार नाही, शूरसेनाच्या घरी जाऊं पाहिजे तर.” सहदेव म्हणाला. शूरसेन चांगल्या दरवायांपैकी एक होता आणि शिवाय रामाचा मेहुणा होता. “राजाविषयी तुझ्या मनांत फार आदर आहे! मग त्याच्या बहिणीच्या परांवर डाका घालावा म्हणून कसे वाटले तुला?" राजाने बिचारले. शूरसेनाच्या राजभक्ति पेक्षा माझी राजभक्ति निराळी आहे. मी वेळ पडल्यास राजासाठी प्राण सुद्धा देण्यास तयार आहे. मी असें ऐकले आहे की शूरसेनाच्या वागण्यामुळे राजाच्या बहिणीला काही सुख नाही.” सहदेव म्हणाला. हे ऐकतांच राजाला धक्का बसला. माईटहि वाटले. तो समजत होता की शूरसेन आपल्या बायकोवर फार प्रेम करीत आहे. 'चल. आज त्याच्याकडे जाऊन चोरी करू या.” राजा म्हणाला. दोघेहि घोछ्यावर बसून शूरसेनाच्या किल्लयांत शिरले. सहदेव चांगला वसलेला चोर असल्यामुळे पाहारेकन्यांचे डोळे चुकवून .
तो किल्ल्यांत शिरला. राजा त्याच्या या चातुर्यावर फार खूश झाला. तो मनांत म्हणाला-" जर का मी एकटाच असतो तर नकी पाहारेकन्यांनी मला पकडले असते." राजाला पाठीमागे घुटमळतांना पाहून सहदेवाने ओळखलें की आपला साथीदार अगदी नवा आहे. त्याने राजाला काळोखांत उभे केले. म्हणाला-" मी जाऊन चोरी करून येतो. तोपर्यंत येथून कोठे जाऊ नकोस." श्रोड्या वेळाने तो पैसे व दागिने एका गाठोड्यांत बांधून घेऊन आला. ते पाहून राजाला फार आश्चर्य वाटले. 'आपण येथून लवकर निघून गेलो नाही तर कदाचित पकडले जाऊं." राजा 'थांब ! अशी घाई करूं नकोस अजून एक चोरी करावयाची आहे. वरच्या मजल्यावर त्याच्या निजावयाच्या खोलीत शूरसेनाप रनजडित सोन्याचे खोगीर आहे. तें आपलें पाहिजे." सहदेव एवढे सांगून झटकन तेथून निघून गेला. तो सरळ दुसऱ्या मजल्यावर गेला. तेथे तो व त्याची बायको पलंगावर निजली होती. सहदेवानें खोगीर हळूच उचलले आणि जाऊँ लागला. पण तेवढ्यांत कसला तरी आवाज झाला. तो ऐकून शूरसेन उठला आणि "कोण आहे? तलवार कुठे आहे माझी" म्हणून ओरडला. काय झाले! कां ओरडलांत!" म्हणून त्याची बायको खडबडून जागी होऊन म्हणाली. "कोणी आल्याची चाहूल वाटली. आंत कोणी तरी आल्यासारखे वाटले." 'काही नाही हो. झाडाच्या फांधा बान्याने हलल्या असतील झालं. रोजच तुम्ही काही तरी स्वम पाहून उठतो. मनांत काही तरी असल्याशिवाय रोज असे तुम्ही उटणार नाही." बायको म्हणाली. "अशी घाई करू नकोस. उद्या माझी सर्व काळजी दूर होईल. उयां संध्याकाळ- पर्यत अर्षे राव्य माझ्या ताव्यांत येणार आहे." शूरसेन मोठ्याने हसून म्हणाला. "उया मी दरवारांत जाणार आहे. म्हणून म्हणालांत. परंतु राजा अर्धे राज्य देणार आहे म्हणून सांगितले नाहीत?" बायको म्हणाली. "देणार कोण? मी आणि माझे काही मिशनबार जाऊन राजाला मान राकन त्याचे राज्य बांहून घेणार." असे सांगून शूरसेनाने त्या कारस्थानांत कोण कोण आहेत त्यांची नावे सांगितली. "भलतंच! मी आपल्या भावाची हत्या होऊ देणार नाही." असे म्हणत ती उर्दू लागली. परंतु शूरसेनाने तिला अगदी बेदम मारले. थोड्या वेळाने पुन्हां दोप शांतपणे झोपली. सहदेव राजाकडे आला आणि सर्व ऐकलेला प्रकार सांगितला आणि म्हणाला- "दे माझी सलवार. स्वा राजद्रोबाला मारून रोतों जर गोवा मेळांत मी परत आलो. नाही तर मी मेलों असे समज व तूं निघून जा." खरे म्हणजे सहदेवाच्या बोलण्यावर राजाचा विश्वास बसला नाही. कारण शूरसेनावर त्याचा फार विश्वास होता. म्हणाला-"अरे, पण तुला काय करा- वयाचे आहे मध्ये पडून ! राजासाठी प्राण द्यायला तूं एक्दा जिवावर उदार को बरें होतोस. सांग! काय केले आहे राजाने तुझ्यासाठी!" "तूं मला प्राणदान दिलेस म्हणून, नाही तर तुलाच प्रथम मारले असते. आण माझी तलवार मला जाऊन त्या दुष्टाचा नाश करून येऊ दे." सहदेव म्हणाला. “नको. आपण जाऊन राजालाच सांगू या मग तो पाहील त्याला काय करावयाचे ते." राजा म्हणाला. 'माझ्या म्हणण्यावर राजा विश्वास करणार नाही. कारण मी चोर आहे व मला हद्दपार केले आहे. पाहिल्याबरोबरच माझे डोळे काढू टाकतील ते. मग माझे म्हणणे ऐकणार तरी कोण?" सहदेव म्हणाला. पण मला तर हद्दपार केलेले नाही. मी राजाला जाऊन सांगतो." राजा म्हणाला.
नंतर पुन्हाँ कोठे भेटावयाचे ते ठरवून दोघे आपापल्या मार्गाला लागले. पाहाट होण्यापूर्वीच कोणाच्या नकळत राजा आपल्या महालांत पोहोचला. तेव्हांच्या तेव्हा त्याने आपल्या सरदारांना बोलाविलें. अर्थातच त्या कारस्थालांत असलेल्यांना वगळूनच. तो म्हणाला-" मी सहदेवाला भेटलों होतो. त्यानेच मला या कारस्थानाचा सुगावा लावून दिला. शूरसेन त्यांचा मुख्य आहे." आपण शूररसेन व त्याच्या साथी- दारांशी लढून त्यांचे पारिपत्य केले पाहिजे." सर्व सरदार म्हणाले. "पण ते लोक एकदम हल्ला मुळी कर- णारच नाहीत. एकेक एकेक येतील, मग त्यासाठी एवंदी लढाई कशाला. तुम्ही सर्व- जण सुसज्ज रहा म्हणजे झाले. एकेकाला एकेक जण पुरे." राजाच्या सांगण्यापमाणे आलेल्या सर्व कारस्थानी सरदारांना कैद करण्यांत आले. त्यांची शखा काढून घेतली. शेवटी शूरसेन आला. त्याला पकडून राजा समोर आणले. त्याला समजले की त्याचे बाकीचे सर्व साथी- दार कैद झाले आहेत. तरीसुदा तो शांत- पणे म्हणाला-"हे काय प्रकरण आहे ?
अहो, मी तुमचा मेहुणा आहे. अशाच तम्हेने आपण आपल्या सरदारांचा आदर करता." “राजद्रोमांचे स्वागत असेंच करावयाचे असते." राजा म्हणाला. "कोणी हे तुम्हाला सांगितलें ! बोलवा पाई त्याला. ऐकू दे तरी?" मेहुणा म्हणाला. राजाने ठरलेल्या जागी एका माणसाला पाठवून सहदेवाला बोलावणे पाठविलें. सहदेबाला वाटले की आपला साथी- दार पकडला गेला आहे आणि आपल्याला पकडण्यासाठी त्याने राजाला आपले नांव सांगितले आहे. परंतु लगेच त्याच्या मनांत आले की काही झाले तरी राजा असा नीच नाही. म्हणून तो त्या माणसाबरोबर राजवाव्यांत गेला. तो म्हणाला-"महाराज, मी चोर आहे. मला आपण हद्दपार केले आहे. तरी सुद्धा आपल्या चांगुलपणावर विश्वास ठेवून मी येथे आलो आहे. केवळ आपल्या आज्ञेनें." 'काल ज्याला मी प्राणदान दिले त्याला आज मारीन !" राजा म्हणाला. 'काल महाराजच का होते?" त्याने आश्चर्याने विचारले. "होय. काल तूं मला चोरी करावयास शिकविलेंस. आज तुझ्याकडून आणखी एका गोष्टीची मदत मागावयाची आहे. तू या राजद्रोबार्शी युद्ध करतोस काय?" सहदेवाने ते कबूल केलें. बराच वेळ दोषांचे युद्ध झाल्यावर शेवटी शूरसेन मारल्या गेला. नंतर राजाने सहदेवावरचे सगळे आरोप दूर केले. शूरसेनाची जहागिरी त्याला दिली आणि पुन्हां त्याला आपला सरदार केले.