एक काळ असा होता की देशाची प्रगती थोडीशी खालावलेलीच होती. आणि त्यात एका खेड्यात एक तरुण नक्षलवादी व्यक्ती राहत होता. ज्याचं नाव "आयुष" होतं. तो स्वत:बद्दल नेहमी कुतूहलात रहायचा. बऱ्यापैकी गरीबचं आणि दयाळूदेखील होता. आणि मुख्य म्हणजे त्याला "मडकी" अर्थात "माठ" घडवण्याची आवड होती. त्याची महत्वाकांक्षा अशी होती की, ज्याप्रमाणे कृष्णाने द्रोपदीला एक भांड दिलतं ज्यात भात कितीही बनवला तरी संपत नसे तसं काहीतरी मलाही बनवायचं आहे. तो अडाणी असल्याने त्याला फारं काही कळतही नसायचं. त्याचा अगदीच भाबडा समज होता आणि त्याने चुकून एका रात्रीत स्वप्न पाहिले की, एका म्हातार्‍याने त्याला जादूची छडी दिली. आणि ती छडी माठ पूर्ण बनवून झाल्यावर त्यावरून एकदा गोलाकार फिरवली की तो माठही अगदी पाहिजे तितकं अन्न सहज उपलब्ध करून देऊ लागला. आणि मग हळूहळू गावातील गरीब लोकांच्या मदतीसाठी त्याचा वापर तो करू लागला. गावातील लोकांसाठी हे फारच वेगळं होतं. त्या दिवसापासून, जेव्हा जेव्हा गरीब लोकांना मदतीची आवश्यकता होती त्याने केली आणि ती करताना त्याच्या एक लक्षात आले. त्याने अनुभवले की लोकांना आज वेगवेगळ्या इतर अडचणी उद्भवत आहेत. लोकांची वीज, पाणी, आणि इतर बाबतीत थोडीशी ससेहोलपट होत आहे. परंतु लोकं हल्ली या गोष्टींची तक्रार म्हणून करत नव्हते. कारण लोकांना हवं ते हवं तेवढं मिळू लागलं होतं, ते म्हणजे "अन्न". लोकं अगदी निर्धास्त झाले होते, लोकांना काम करणं म्हणजे जिकारीचं फुकाटचं कष्ट वाटू लागलं होतं. आणि अशातचं एक श्रीमंत पण जरा उन्मत्त असलेला राजेंद्र आयुषकडे मदतीसाठी आला. आणि त्याने चक्क आयुषला शंभर घडे (माठ) असेच बनवून दे गरज पडली तर पैसेही देईल असे सांगितले.  पण आयुष मात्र कुठेतरी स्वत:मधे जे चाललयं त्याने समाधानी नव्हता. कारण द्रोपदीला जरी कृष्णाने काही दिलं असलं तरी तिने तिच्या जन्मात तिचं "कर्म" कधीही शुल्लक आहे समजून थांबवलं नव्हतं. पण इथे गाडात उलटा चालू होता. लोकांना आराम मिळू लागला होता, त्याने लोकांना किमान उपाशी तरी राहू नयेत हा विचार डोक्यात ठेवून ती मडकी घडवली होती.  पण प्रश्न पडला आता पुढे करायचं काय नी कसं? कारण त्याला जितका त्या छडीचा उपयोग माहित होता तितकेचं तिची विरूद्ध बाजूही माहित हवी होती पण ती त्याला माहीत नव्हती कारण वाईटाची बात चिंतणाऱ्या गोष्टीचा माणूस पहिल्या दृष्टीक्षेपात कधीच विचारही करत नाही; पण आता गरजही त्याचीच होती. अन्यथा चंगळवाद फोफावला असता. मग त्याने एक युक्ती शोधत त्याच्याकडे आलेल्या श्रीमंत व्यक्तीला अद्दल घडवायची ठरवली आणि त्याने अशी पन्नासचं मडकी बनवली जी प्रत्येक एकात केवळ एकच भाताच शित तयार करतील तेही अगदी अर्धा पाऊण तास लावतं. त्यानंतर तो श्रीमंत व्यक्ती आला आयुषने त्याला समजावले माझी कला अगदीच निकृष्ट झाली आहे तुम्ही उगाच कशाला याच्या नादी लागता परंतु तो श्रीमंत व्यक्ती तरीही ते पन्नास माठ घेऊन गेला. माठांमधून मिळणाऱ्या अन्नाची गत बघून तो श्रीमंत व्यक्ती अगदी बावचळून गेला व गावभर त्याने डिंडोरा पिटावला की, आयुषची कला आता लोप पावली आहे. त्यामुळे गावातल्या इतर सर्वच लोकांना थोडीशी भिती मनात घर करून गेली. ज्यांनी ज्यांनी आरामाच्या सवयी स्वत:ला लावल्या होत्या त्या प्रत्येकाने हळूहळू प्रत्येक दिवसं थोडं का होईना काम करणं चालू केलं आहे. प्रत्येकाला त्याच्या मुळ रूपात पाहून आयुषही सुखावला आहे. माणसाला "अन्न" मिळालं म्हणून कदाचित अगदीच सर्वगुणसंपन्न आयुष्य जगू शकतो असा भाग नसतो. माणूस जन्मात कष्ट आणि मेहनतही तितकीच घ्यावी लागते हेच खरं जीवणं आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel