दोन दिवसा पुर्वीची घटना.माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीचा मुलगा POSITIVE निघाला. शहरातल्याच एका खाजगी रुग्णालयात त्यास दाखल करण्यात आले.कुटूंबातील एकमेव कमवता.वृध्द आई-वडील ,पत्नी व दोन मुले.कोणीही नातेवाईक इच्छा असुनही मदद करायला धजावत नव्हते कारण कोरोना अशावेळी मैत्रीचें दहा हात धाऊन आले.त्यांनी सर्व सुत्रे आपल्या हाती घेतले.डाँक्टरांच्या सांगण्या प्रमाणे प्लाझ्मा व रेमेडिसीव्हीर ई.औषधांची सोय करुन दोन मित्र त्याच्या घरी जावून सर्वांचे टेस्ट करुन घेतले. सुदैवाने ते सर्व NEGATIVE निघाले.त्यांनी VIDEO-CALL वरुन त्यांच्यात संवाद घडवून आणला.त्यांचा मित्र कुटूंबात परत आला.Thank you FRIENDS . हि सत्य घटना संक्षीप्त स्वरुपात आपणा समोर मांडण्याच कारण म्हणजे मित्र. हो जीवाला जीव देणारे मित्र,अशा कठिण काळात,खंबीरपणे सोबत असणारे मित्र,कुटूंबाच्या चेह-यावर हास्य फुलवणारे मित्र आणि हो देवदूतही चेष्टा,मस्करी,खळखळून हसायला लावत वेगळ्या विश्वात नेणारे,मित्रच असतात. चला तर आपणही देव शोधत बसण्या पेक्षा ह्या आणि अशा माणसातल्या देवांना सहकार्य करुन विनम्रपणे अभिवादन करत म्हणूयां मित्रायनमः

( वि.विनंती... क्षमा असावी पण आपल्या पैकी कोविड मधून ठिक होऊन त्यास २८ दिवसाहून अधीक दिवस झाले असतील तर आपला प्लाझ्मा एखाद्या कोविड रुग्णाचा जीव वाचवू शकतो )

जनहितार्थ

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel