चांदण्या रात्रीत बसलो होतो एकदा,
विचारांच्या चक्रात गुंतलो होतो एकदा,
सहज नजर माझी आकाशाकडे गेली,
डोळ्यावर माझ्या एक चांदणी चकाकली,
चटकन मनाशी मी संवाद साधला,
म्हणालो छोट्याशा चांदणीला प्रकाशाने हात दिला,
प्रकाशाच्या हाताने चकाकत होती कशी,
जनू प्रकाश फक्त तिच्या अन तिच्याच पाशी,
या उसन्या प्रकाशाचा गर्व तिला आला होता,
ज्या वेळी कळाले तिला फार उशीर झाला होता,
चांदणीचा त्या आता तारा झाला होता,
आणि आकाशाकडून जमिनीकडे त्याचा तोल गेला होता.
शैलेश आवारी
2005
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.