खुप दिवस झाले एक कथा लिहायची होती...... म्हणजे ती खुप भारी असेल की नाही माहिती नाही पण जे समाजात चालत आहे त्याबद्दल असेल. आजपर्यंत बऱ्याच लेखकांनी ह्यावर लिहिलं आहे म्हणून कोणी ऑब्जेक्शन ही घेऊ शकत........बघुयात ते आपण पुढे.......



खूप मुलीसोबत अस घडत आपण प्रेम करतो पण अस काहीतरी होत की आपण त्याच्यासोबत लग्न करू शकत नाही........




मग ज्याच्यासोबत आपली गाठ बांधली जाते. तिथंच आपलं आयुष्य मन मारून राहावं लागतं...


त्यात आपलं अस ""अस्तित्व ""च नाही राहत.🙏🙏🙏🙏

आणि आपण तरी कसा घाययचा त्याचा शोध ????

सगळ्या वाटा संसाररुपी गेटने बंद केल्या जातात..... स्वतला विसरून घरासाठी स्वतला आपण वाहून घेतो..... अन आपली ओळखच विसरून जातो.....





स्थळ अर्थातच पुणे.....

कारण मी इथली आहे म्हणून इथलं सगळं मला माहिती आहे.... चुकीचं काही लिहिलं जाणार नाही......





आई- तुला हे लग्न करावंच लागेल......

नाही मला एकदा त्याला भेटू द्या........😢😢😢😢
प्लिज मी पाया पडते तुमच्या...........
अस नका वागू ......तो खूप चांगला आहे प्लिज.........


बाबा- तुला सांगितलेलं कळत नाही का...?????

बाबा एकदा माझं एकूण घा.......

काय घेऊ तुझं एकूण........
मिहीर हिला मरुस्तोवर मार...... जोवर ही लग्नाला तयार होत नाही.....


शंतनू- बाबा इतके कठोर नका  वागू.....😢😢😢😢तिला काय म्हणायचं एकूण तरी घ्या.........



तू शांत बस..... आणि चालता हो इथून.......... घराची इज्जत वेशीवर टांगायला निघाली आहे ही..... कार्टी....
हिला जन्माला येताच मारून टाकायला हवं होतं.......ह्यासाठी मंगल मला पोरगी नको होती........


बाबा......😢😢😢😢


अजिबात मला बाबा महण्याचं नाही...... तुझ्या तोंडातुन माझं नावही घायची नाही.......


तुला लाज नाही वाटली अस परजातीच्या पोरासोबत लफड करताना........



बाबा तो खूप चांगला आहे.... एकदा त्याला भेटुन तर बघा......😢😢😢😢😢



आई- अजूनही तुला त्याची पर्वा आहे म्हणजे........ आणि मिहीर तो पट्टा इथं....... आज हीच कातडं फोडून नाही काढलं ना तर माझं नावही मंगल नाही.........


आई नको.......😭😭😭😭😭😭😭😭ग......


अंजली मोबाईल घे काढून तिचा आणि ते सिम फेकून दे.........



ती खूप गयावया करत होती पण त्यांना तिची दया येत न्हवती.........



मिहीर- तुला काय वाटलं...... तू बाहेर शेण खाशील आन आम्हाला समजणार नाही.........



तुझा तो यार आहे ना त्याला तर आज मी जिवंत सोडणार नाही........
आज तो मेला पाहिजे........


प्लिज दा त्याला नको  करुस काही मी तुम्हाला जस वाटेल तसे करेल.......त्याची काही चूक नाही..........


तुझ्यावर काहीच विश्वास नाही राहिला आमचा...... कलंक आहेस ह्या घराला तू..........


जो मुलगा तुला बघायला येणार आहे ना ....... गपगुमाण त्याच्याशी लग्न करायचा......
अंजलीच्या नात्यातील आहे....... म्हणून जास्त खोलात ते जाणार नाहीत......


हम्मम्म्मम्म्म........😢😢😢😢



अंजली- मुलगा थोडा स्ट्रिक्ट आहे तर जरा जपून..... उगाच त्याला कानाचा कूस लागून देऊ नकोस.......
आधीच झाली तेवढी नाचक्की खूप ये आमच्यासाठी........


मी तयार आहे पण प्लिज त्याला काही करू नका.......



आई- अजून घेतलसच का त्याच नाव म्हणून  आई आणि मिहीर ने मिळून तिला मारून मारून त्यानी लग्नाला तयार केलेच.......

संपूर्ण अंगाला पट्याचे व्रण उमटले होते........


काही वेळाने तिला चक्कर यायला लागली शंतनूला तिची अवस्था बघवत न्हवती पन तो हतबल होता..... कसबस त्याने त्यांना बाहेर ओढून नेले...... आणि तिच्याजवळ बसला.......


शाल्मली..........😢


शंतनू दादा...........



सोनू नको ना ग ...........इतका त्रास करून घेऊ.........सोड त्याचा विषय मिहीर द्दा त्याला  मारून टाकेल.... तू नको घेउस त्याच नाव.......



हम्मम्म्म ..... मी काय चूक केली दादा......
प्रेम करण  गुन्हा आहे का रे??????


हो आपण ज्या घरात राहतोय त्यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे.... त्यासाठी ते तुझा आणि त्याचा जीव ही घ्याला मागेपुढे बघणार नाहीत......


काय माहिती जो  येणार आहे तो तुला या नरकातून बाहेर काढू शकेल.........

जाऊ दे😭😭😭😭😭😭😭 .........मी ठीक ये ...........मला कोनाकडूनच कोणतीच अपेक्षा आता उरली नाही.....यापुढं माझं आयुष्य जस त्यांना वाटत तसच मी जगेल........


शंतनूने तिच्या आंगला औषध लावून दिले........ पाठीवर निशाण बघूनच त्याला रडू कोसळले.........


तिला मेडिसिन अन हळदी दूध देऊन त्याने झोपवलं.......


संध्याकाळी तो तिला जेवायला ताट घायाला लागला तर कोणीही तिला जेवण द्यायचं नाही असं स्पष्ट बाबांनी सांगितले............

राहु द्या उपाशी म्हणजे अक्कल ठिकाणा वर येईल.............
प्रेम करतात ये.............. अब्रुचे धिंडवडे काढले नतद्रष्ट कार्टीने......एकदा का हीच लग्न झालं तर मी काशीची यात्रा करेल.........

अंजली सुनबाई.....

हो मामांजी......


त्या मुलाचा होकार यायला हवा जितका पाहिजे तितका हुंडा देऊ आपण...... आणी लग्न 15 दिवसांत उरकण्याची जबाबदारी तुमची........


हो मामांजी........☺️



त्यांच्या शब्दापुढे जाणार कोण होत.......??????
ती रात्र आणि दुसरा दिवस त्यांनी तिला उपाशीचं ठेवलं..........

कोणाच्याही नकळतपणे मध्यरात्री शंतनूने तिला दूध मात्र पाजलं.........परत औषध लावून दिली........



तिसरा दिवस.......


आज थोडंस तिला बर वाटत होतं...... दोन दिवस त्यांनी तिला उपाशी ठेवलं होतं ....
तीच आंग खूप ठणकत होत.......... पण आज मुलाकडचे बघायला येणार होते.......... म्हणून आईनी तिला डोक्यावरून आंघोळ करून घायला सांगितली.......

आणि थोडं जेवन ही दिले.......

घरातल्या कुत्र्याला तरी बरी वागणुक दिली जाते त्याच्यापेक्षा ही वाईट वागणूक तिला सगळे देत होते.......

शब्दगणिस शिव्या, टोमणे........ हेळसांड......पन ती गप्प होती......
आधीही गप्पच असायची पण आता तिने खुप मोठी चूक केली होती........

प्रेम केलं होतं..........
कोणावर तरी जीवापाड.......


आईने तिला साडी नेसायला दिली आणि दरडावून आज काही केलं तर त्याचे दुष्परिणाम त्याला भोगायला लागतील हेही सांगितले.........


तीही तयार झाली......... अंगावरचे व्रण लपवण्यासाठी फुल्ल स्लीवसचा ब्लाउज  घातला......


चेहऱ्यावर मेकअप चोपडला.......
जेणेकरून बोटाची निशाण बुजली जातील........ओठावर गडद लिपस्टिक लावली.... मारा मुले फुटलेले ओठ लपवण्यासाठी.....
कानात छोटेसे टॉप्स, गळ्यात ठुशी, हातात कडे, कपाळी छोटीशी टिकली, डोळ्यात काजल, पिंक लिपस्टिक,केस थोडेसे बांधून मोकळे सोडले...........

तशी दिसायला ती छानच होती...... पण हे जर हे लग्न मनापासून करायला तयार असती तर चेहऱ्यावर प्रसन्नता असती.... आणि ती सुंदरता अधिकच उजळुन आली असती........


5.4इंच ऊंची, गोरी, चॉकलेटी डोळे,  मध्यम बांधा, तबियत नाजूकच, नकट नाक पण तिला ते शोभून दिसायच.....गुलाबी ओठ, केसांचा लेअर कट.......


अंजली- शाल्मली...........

पाहुणे  आलेत.......


हो वहिनी झालं........


जरा चेहऱ्यावर हसू ठेव त्याच्यासोबत फिरताना कस दात काढत बोंबलत फिरयाचीस......
माझ्या नातेवाईकांना समोर लाज ठेव माझी म्हणजे मिळवलं........


तिने मान हलवली.... आणि अंजलीच्या पाठिमागे निघाली............


तसा मीहिर आला......


अहो आम्ही येतच होतो.........तुम्ही कशाला आले......


तू जा मी येतो हिला घेउन..........


बर......... लवकर या......

आणि हो येताना डोक्यावर पदर घेण्याच कष्ट करा बाईसाहेब......


हो वहिनी............




हे बघ सोनू तुझा दुष्मण नाहीये मी...... पण घराच्या अब्रुपुढे मला सगळं नगण्य आहे......

तू काहीही अस करणार नाहीयेस जेणेकरून हे लग्न मोडेल...........


आणि जर तू काही चलाखी करून त्या मुलाला काही सांगण्याचा प्रयत्न केलस तर माझ्या इतका वाईट कोणीच नसेल.......


हो दादा तुम्ही म्हणासाल तसच होईल😢😢😢😢



सोनू आधी होता ग तुझ्यावर विश्वास पण आता नाही....


हे बघ........


त्याने तिला जे दाखवलं ते बघून तिच्या पायाखालची जमीनचं सरकली.......



त्याची ही अवस्था आहे ना त्याला तू जबाबदार आहेस शाल्मली..... आता जर तुला ती जिवंत हवा असेल तर हे लग्न कर..... नाही तर आता फक्त त्याचे हातपाय तोडलेत नंतर त्याला पूर्णच तोडल..........

2 - 3 महिने तरी तो हॉस्पिटलमध्ये पडून राहील याची काळजी मी घेतली आहे......पण तू काही केलंस तर तो कायमचा जीवाला मुकल......


प्लिज नको दादा...... मी पाया पडते तुझया..........😢😢😢😢😢😢


बघू किती चांगलं वागतेस ते समजलच की........


चल घे डोक्यावर पदर.......डोळ्यातील पाणी ही आता सुकून गेलं होतं ......कसबस स्वतला सावरून तीने पदर घेतला........


मिहीर तिला घेऊन खाली आला......


खाली मुलगा त्याचे आई, वडील, आणि छोटी बहिण बसले होते.........


मुलाची आई- ये बाळ......


अंजली- काकू ही माझी नणंद शाल्मली......


वन्स पाया पडा..........


शाल्मलीने जाऊन सगळ्या पाया पडली........ती इतकी बिथरली होती की  मुलाच्या ही पाया पडली.......



अंजली- अहो वन्स..... आतच कुठं त्याच्या पाया पाडताय........☺️☺️
घाबरल्यात हो त्या जास्त....पहिलीच वेळ आहे ना.......


मुलाचे बाबा- असू दे ......असू दे......

सॉरी .......😢😢😢😢😢शाल्मली पट्कन त्याला सॉरी म्हणून बाजूला येऊन उभी राहिली......


तो मात्र ब्लॅंकच झाला.....
जस तीने त्याच्या पायाला स्पर्श केला एक वीज अशी त्याच्या आंगत संचारली होती................
खुप नाजूक, मऊ हाताचा स्पर्ष त्याला झाला होता.......

आजवर त्याने नाही म्हणल्यातरी 20-25 पोरी नापसंत केल्या होत्या........


स्वाभावाने कडक होता......... सिरीयस होता........ पहिल्यापासूनच......मस्ती, हसन, खिदळत  त्याला आवडत न्हवत........


मुलाची आई- बेटा शाल्मली ये माझ्याजवळ बस इथं......


तिने तिच्या आईकडे बघितलं तर त्यांनी नजरेनेच तिला जा म्हणून सांगितले.......


ती चूपचाप त्यांच्या जवळ जाऊन बसली.........


चहापाणी झालं...........


नाव... काय बाळ तुझं?????


शाल्मली.........😢😢😢😢


वन्स पूर्ण सांगा.......😈😈😈😈😈



सॉरी............


शाल्मली मोहन धुमाळ........
ती घाबरतच बोलत होती....... पण आवाजात कमालीचा गोडवा होता.......


तो तिच्याकडे बघतच होता............तिला न्याहाळत होता........


शिक्षण.......


MA......., Economics......


जॉब करत होतीस ना?????


हो म्हणजे.....😢😢😢😢😢😢तिने


अंजली- आग काकू करत होत्या त्या पण आम्हीच सोडवला..... आता लग्नाचं बघायच चालू झाल..... कोणाला आवडत कोणाला नाही............
म्हणून सोडवला.......


बरररर.......झालं घरातलं पण काही कमी असत का?????मला तर हे मुलींनी जॉब केलेल पटत नाही.... उगाच घराकडे दुर्लक्ष होत......


त्यांचे विचार एकूणच शाल्मलीच्या डोळ्यात पाणी तरळलं


स्वयंपाक येतो ना तुला........


हो येतो........


मुलाची बहिन- नॉनव्हेज ही येत ना तुम्हाला......


गुड्डू अस मध्ये बोलू नये......


सॉरी आई........


ते मी.......😢😢😢😢😢😢


घर काम येत ना??????


हो येत......


दादा तुला काही विचारायचं आहे का?????

आई आग दादा काय म्हणतेस.......


बर बाई....... शाल्मली हा आमचा रोहन
( रोहन माझा पहिला वाहिला crush)


शाल्मली अजूनही मान खाली घालूनच होती........


अहो जरा बघा तरी आमचा दादा छान दिसतो....


वन्स बघा की.......अंजली जरा दम देतच बोलली........


तिने हळूच मान वर बघितले......


भारदस्त अशी त्याची personality होती.......
6 फूट ऊंची, थोडासा निमवर्णी गोरा,  काळेभोर डोळे, सरळ नाक, stuble beared......त्याचं स्वभाव असा होता की चेहऱ्यावरचे भाव कोणाला कळत न्हवते.....मनात काय चालू आहे हे कोणालाच तो कधी कळू देत न्हवता......








मग कसा वाटला पहिला पार्ट........

कॉमेंट देऊन नक्की सांगा..... आनि ही जस जमलं तस मी लिहिला की पार्ट पोस्ट करत जाईल.......

आवडली........ नाही आवडली तरी तुमच्या कॉमेंट नक्की द्या.........☺️☺️☺️☺️

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel