"तुम्ही पाणिनी पटवर्धन आहात? " पाणिनी समोर बसलेल्या त्या तिशीतल्या तरुणीने पाणिनीला च प्रश्न केला.

"तुम्ही ईशा गरवारे आहात हे खरं असेल तर मी पाणिनी पटवर्धन आहे हे खरं आहे." पाणिनी म्हणाला

तिचे डोळे पाणिनी कडून हो या उत्तराची अपेक्षा करत होते ,ते एकदम स्तब्ध झाले आणि पाणिनी चे उत्तरं ऐकून तिला एकदम हसू फुटले.

"मी अडचणीत आहे." ती म्हणाली.

पाणिनी ने थंडपणे मान डोलावली, रोजचीच प्रश्नोत्तरे.रुटीन मधील.त्याला आपल्या उत्तराचे काहीच वाटले नाही म्हणून ती नाराज झाली.

"मला वाटलं तेवढं तुम्ही मला सहज सहकार्य करत नाही.या आधी अनेक वकिलांशी मी चर्चा.... " ईशा म्हणाली  आणि एकदम थांबली.

पाणिनी पटवर्धन तिच्या कडे पाहून हसला.उठून उभा राहिला आणि आपले हात टेबलावर रेलून उभा राहिला.."ज्या,ज्या वकिलांचा सल्ला तू घेतला असशील या आधी, त्यांची महागडी ऑफिसेस असतील, त्यांच्या हाताखाली इकडून तिकडे लगबगीने फिरणारे त्यांचे सहाय्यक असतील.अशा वकीलांना तू बराच पैसा दिला असशील पण त्या बदल्यात त्यांच्या कडून तुला काहीही मिळाले नाही म्हणून तू इथे आलीस ना? त्यांनी तुझ्या  पैशा कडे बघून फक्त तुझ्या पुढे माना तुकवल्या असतील. "  पाणिनी म्हणाला

तिची नजर खाली गेली.पाणिनी काय बोलतो आहे हे ती लक्षपूर्वक ऐकू लागली.

ती त्याच्या ऑफिस मधे येण्या पूर्वी स्वागत कक्षात बसलेली असतांना सौम्या सोहोनी शी झालेले संवाद त्याला आठवले.

"स्वतःला ईशा गरवारे म्हणवणारी एक तरुणी बाहेर आल्ये सर." सौम्या म्हणाली होती.

"म्हणवणारी असा शब्द का वापरलास सौम्या? तुला नाही वाटत ती ईशा गरवारे आहे? " पाणिनी ने विचारले होते.

सौम्या ने नकारार्थी मान हलवली होती.

"ती मला खोटारडी वाटते सर. तिने मला आत आल्यावर २२७१ दक्खन  रस्ता असा पत्ता दिला होता,मी लँड लाईन च्या टेलीफोन डिरेक्टरी वरून नाव आणि पत्ता शोधला.तिने दिलेले नाव आणि पत्ता एकमेकांशी जुळत नाहीत."

"तरीही मी भेटून घेतोच " पाणिनी म्हणाला होता ,हट्टाने.

 "तुम्ही माझे बॉस आहात सर, पण तरीही मी सांगते, तिचे कोणतेही काम स्विकारण्या पूर्वी तुम्ही तिची माहिती काढावी." सौम्या ने त्याला सावध केले होते.

"संशय? " पाणिनी ने विचारले होते.

"नक्कीच." सौम्या त्याला सावध करून बाहेर गेली होती आणि तिने ईशा ला आत पाठवले होते.

हे सगळं पाणिनी ला आठवलं.

"मी इतर वकिलांपेक्षा वेगळा आहे.मला धंदा मिळतो कारण मी माझ्या अशिलासाठी  लढतो.आणि खरंच भांडतो."  पाणिनी म्हणाला  “मला कधीही कोणीही एखाद उद्घाटन करण्यासाठीवगैरे  बोलावत नाही

आणि मी अद्याप कधीही  कोणाच्या मालमत्तेची कोर्टा मार्फत चौकशी करून घ्यायचे काम केले नाही की गहाण खत तयार केल्याचे काम केले नाही.फौजदारी गुन्हे हे माझं आवडत क्षेत्र आहे आणि त्यात मी तरबेज आहे. माझ्या डोळ्यातले भाव किंवा माझा चेहेरा पाहून कोणी माझ्याकडे येत नाही. लोक माझ्याकडे येतात कारण ते मी  जे काय काय करू शकतो त्या साठी मे त्यांना हवा असतो.. "

तेव्हा तिने त्याच्याकडे पाहिले. " मग तुम्ही  नेमकं काय करता, मिस्टर पटवर्धन?" तिने विचारले.

. "मी लढतो!"

तिने जोरात होकार दिला. “नेमके तेच हवंय मला " ती म्हणाली.

तो पुन्हा त्याच्या फिरत्या खुर्चीवर बसला, आणि सिगारेट पेटवली. वातावरण

 जरा शांत झालं होतं.

"ठीक आहे," तो म्हणाला. "आपण बराच वेळ  वाया घालवलाय. आता जरा जमीनीवर ये. आणि तू कोण आहेस ते मला सांग आणि तू माझ्याकडे कशी आलीस हे मला आधी सांग. कदाचित आपण त्या मार्गाने बोलायला सुरुवात  केल्यास ते आपल्यासाठी सोपे होईल. " पाणिनी म्हणाला

ती वेगाने बोलू लागली, जणू काय बोलायचं आहे याची तिने  तालीम केली आहे

."माझ लग्न झालेल आहे. माझे नाव ईवा गरवारे आहे आणि मी 2271 दक्खन रस्ता  येथे राहते मी.

माझ्याकडे असलेल्या वकिलांशी मी फारशी चर्चा करू शकत नाही अशी समस्या आहे.  माझ्या एका मित्राने मला  तुमच्या बद्दल सांगितले. ती म्हणाली की तुम्ही  सर्व सामान्य वकीलापेक्षाखूप वेगळे आहात"

ती क्षणभर गप्प राहिली आणि मग विचारले: "हे खरे आहे का?"

पाणिनी पटवर्धनने मान हलवली.

"मला असं वाटतं," तो म्हणाला. “बहुतेक वकील ज्युनिअर  आणि गुप्तहेरांना कामावर ठेवतात आणि

पुराव्यांविषयी माहिती मिळवतात. मी तस करत  नाही, या  साध्या कारणासाठी की मी ज्या प्रकारची प्रकरणे हाताळतो त्यात मी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. मी  फार नाही प्रकरण हाताळत,

पण जेव्हा मी  काम करतो तेव्हा मला चांगले पैसे दिले जातात आणि मी सहसा चांगले रिझल्ट ही  देतो.

जेव्हा मी एका डिटेक्टिव्हची नेमणूक करतो, तेव्हा त्याला फक्त एक विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी नियुक्त करतो मी . "

तिने पटकन आणि उत्सुकतेने होकार दिला. आता संवादाला चांगली सुरुवात झाली असे तिला  वाटलं .

“तुम्ही काल रात्री सागरिका  रिसोर्ट येथे होल्ड-अप बद्दल पेपरमध्ये वाचले?

काही पाहुणे  होते, मुख्य जेवणाच्या खोलीत, आणि काही खाजगी खोल्यां मध्ये

एका माणसाने पाहुण्यांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला आणि कोणीतरी गोळ्या झाडल्या त्याला. "

पाणिनी पटवर्धनने होकार दिला. "मी वाचल ते पेपर ला," तो म्हणाला.

"मी त्यावेळी तिथे होते." ईशा म्हणाली.

पाणिनी ने खांदे उडवले.. "गोळीबार  कोणी केला याबद्दल काही माहित आहे?"

तिने क्षणभर तिने नजर  खाली केली आणि नंतर पुन्हा वर पाणिनी कडे बघून म्हणाली,. “नाही,"

त्याने तिच्याकडे बारिक डोळे करून पाहिले

"ठीक आहे," ती म्हणाली, "जर तुम्ही माझे वकील होणार असाल, तर मी तुम्हाला  सत्य सांगते"

पाणिनी ने मानेने होकार दिला . ती खुष झाली.

“बोल पुढे." त्याने तिला सांगितले.

“आम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण पडू शकलो नाही. सर्व प्रवेशद्वारा वर नजर ठेवण्यात आली होती. असे वाटते गोळीबार  पूर्वीच  कोणीतरी पोलिसाना फोन केला होता, जेव्हा होल्ड-अप सुरू होते तेव्हाच केला होता. आम्ही बाहेर पडण्यापूर्वी पोलिसांनी सगळा ताबा घेतला होता.

"आम्ही  म्हणजे कोण ?"  पाणिनी म्हणाला.

ती तिच्या बुटाच्या टोका कडे तंद्री लावून बघत होती., मग दचकलेल्या आवाजात म्हणाली: "हृषीकेश बक्षी."

पाणिनी  हळूच म्हणाला: “हृषीकेश बक्षी  म्हणजे जो ...उमेदवार ... ? "

"तोच." ईशा म्हणाली.

"तू तिथे त्याच्याबरोबर काय करत होतीस?"

"जेवण आणि डान्स."

"बरं पुढे काय झालं?" त्याने चौकशी केली.

"ती म्हणाली, “आम्ही परत  जेवणाच्या खोलीत गेलो आणि तपासणीला आलेल्या पोलिसांच्या नजरे पासून जरा दूर राहिलो . बाहेर पोलीस अधिकार्‍यांनी साक्षीदारांची नावे घेण्यास सुरुवात केली होती.तिथला पोलीस हृषीकेश बक्षी  चा मित्र होता.त्याला जाणीव होती की त्या होल्ड अप च्या आणि गोळीबाराच्या जागी आम्ही होतो अशी बातमी पेपरात येणे म्हणजे बक्षी च्या कारकीर्दीला घातक ठरेल. म्हणून त्याने आम्हाला  खाजगी जेवणाच्या खोलीत मध्ये राहू दिले सर्वकाही संपेपर्यंत. आणि नंतर त्याने आम्हाला मागचा दरवाज्या मधून बाहेर काढलं "

"कोणी तुला पाहिल का?" पाणिनी ने विचारले.

तिने मान हलवली. "मला नाही वाटत.."

"ठीक आहे," तो म्हणाला, "पुढचं सांग."

तिने त्याच्याकडे पाहिले आणि अचानक म्हणाली, "तुला फिरोज लोकवाला माहित आहे का?"

त्याने मान हलवली. "त्या मिर्च  मसाला  नावाच्या अंकाचा संपादक?"  पाणिनी म्हणाला.

तिने तिचे ओठ घट्ट मिटले आणि शांतपणे डोके हलवले

"त्याचे काय?" पाणिनी पटवर्धनने विचारले.

"त्याला याबद्दल माहिती आहे," ती म्हणाली.

"तो प्रकाशित करणार आहे ही भानगड?" त्याने विचारले.

तिने होकार दिला.

“तुम्ही त्याला विकत घेऊ शकता," तो म्हणाला.

"नाही," ती म्हणाली, "मी करू शकत नाही. तुम्हाला करावे लागेल. "

"हृषीकेश बक्षी का करू शकत नाही?" त्याने विचारले.

"तुम्हाला समजत नाही का?" ती म्हणाली. “हृषीकेश बक्षी एका विवाहित महिले सोबत सागरिका  रिसोर्ट मध्ये होता  ही गोष्ट कबूल करेल एक वेळ पण बातमी छापू नये म्हणून  त्याने पैसे चारले ही बातमी पेपरात येणे  ही गोष्ट सहन नाही करू शकत. तस झालं तर त्याचे निवडणुकीतले विरोधक त्याला अडकवतील."

पाणिनी पटवर्धनने टेबल वर बोटे वाजवून ताल धरल्या सारखं केलं..

"आणि मी ही भानगड  मिटवावी अशी तुझी इच्छा आहे?" त्याने विचारले.

" अशीच  माझी इच्छा आहे."

"तुम्ही  जास्तीत जास्त किती खर्च करायला तयार आहात?"  पाणिनी म्हणाला.

ती त्याच्याकडे झुकून  पटकन बोलली. " ऐका," ती म्हणाली, " मी तुम्हाला काही सांगणार आहे. नीट काय आहे ते लक्षात ठेवा,पण मला कसे कळले ते विचारू नका. मला वाटत नाही की आपण फिरोज लोकवाला ला पैशाने  खरेदी करू शकतो.आपल्याला त्याच्या वरच्या अधिकाऱ्या कडे जावे लागेल. फिरोज लोकवाला मिर्च मसाल्याचा   मालक असल्याचे  नाटक करतो.पण तो मालक नाहीये.ते कोणत्या प्रकारचे प्रकाशन आहे हे तुम्हाला माहिती आहे. फक्त ब्लॅकमेलिंग साठी बातम्या छापते ते मासिक."

"मिस्टर पटवर्धन, त्यांच्या दिमतीला अनेक चांगले वकील आहेत ते त्यांना काहीही लफडी झाली तरी वाचवतात. मूळ मालकाला दूर  ठेवण्याचा प्रयत्न करतात  तरीही  पण जर काही झालं तर फिरोज लोकवाला सर्व दोष घ्यायला तयार असतो.मूळ मालका पर्यंत तो जाऊ देत नाही याची धग."

ती बोलायची थांबली.

"मी ऐकतोय."  पाणिनी म्हणाला

तिने परत सांगायला सुरुवात केली, “हृषीकेश तिथे असल्याचं त्यानी शोधून काढलंय.त्याच्या बरोबर स्त्री कोण होती हे त्यांना समजलेले नाही पण तो तिथे होता ही बातमी ते छापणार आहेत.आणि पोलिसांकडे आग्रह धरणार आहेत की  हृषीकेश ची साक्ष काढण्यात यावी.त्या गोळीबारा बाबत काहीतरी भानगड आहे,रहस्य आहे. असं वाटतंय की होल्ड अप करणाऱ्याला तसं करायला भाग पाडण्यात आलं होतं, त्याला त्यात अडकवून त्याला मारणे सोपे जावे म्हणून, म्हणजे त्याची फारशी चर्चा ही होणार नाही. तिथे हजर असणाऱ्या प्रत्येकाला पोलीस चांगलंच फैलावर घेणार आहेत."

"आणि तुला नाही घेणार फैलावर? "  पाणिनी म्हणाला.

"नाही,आम्हाला दोघांनाही ते या भानगडीच्या बाहेर ठेवणार आहेत..मी तिथे होते ते कोणालाच  माहीत नाही. पोलिसांना माहित्ये हृषीकेश होता तिथे.  मी त्याला खोट च नाव सांगितलय."

"ठीक आहे, एक गोष्ट आधीच स्पष्ट करून घेऊ, तू हृषीकेश चं राजकीय आयुष्य सांभाळण्याचा प्रयत्न करते आहेस? "  पाणिनी म्हणाला.

तिने अर्थपूर्ण नजरेने त्याच्या कडे पाहिले. "मी मोकळे पणाने सांगते,पटवर्धन,मी त्याला नाही ,मला स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करते आहे."

"या सगळ्याला पैसे लागतील."  पाणिनी म्हणाला

तिने तिची पर्स उघडली.  "त्या तयारीनेच आल्ये मी." ईशा म्हणाली.

तिने पर्स मधून करकरीत नोटा काढून पाणिनी कडे दिल्या.

"हे काय म्हणून समजायचे? "  पाणिनी म्हणाला.

"तुमची फी म्हणून.जेव्हा तुम्हाला अंदाज येईल की हे मिटवायला किती खर्च येणार आहे तेव्हा मला संपर्क करा तुम्ही."

"फोन वरून? "  पाणिनी म्हणाला.

"नाही...नाही.. ते धोक्याचं आहे.तुम्ही मला फोन नका करत जाऊ.मीच तुम्हाला संपर्क करीन. तुम्ही पेपरात छोट्या जाहिरातीत एक मजकूर छापा. ‘ .तडजोड  झाली आहे.’  आणि त्या खाली तुमचे नाव टाका. म्हणजे फक्त इनिशियल. ते वाचलं की मी तुमच्या ऑफिसात येऊन भेटेन."

"मला ब्लॅकमेलर ला पैसे द्यायला अजिबात नाही आवडत.मी दुसरा काहीतरी पर्याय काढीन."  पाणिनी म्हणाला

"दुसरा काय असू शकतो मार्ग? " ईशा ने शंका व्यक्त केली.

"अत्ता तरी मला माहीत नाही.पण अनेकदा वेगळे मार्ग असतात."  पाणिनी म्हणाला

“" मी तुम्हाला फिरोज लोकवाला बद्दल एक टिप देऊन ठेवते. त्याच्या भूतकाळात काहीतरी घडलंय ज्याची त्याला भीती वाटत्ये, ते नक्की काय आहे ते मला माहित नाही. कदाचित त्याला तुरुंगात पाठवले गेले असेल, किंवा असे काहीतरी."

 त्याने तिच्याकडे पाहिले.

"तुम्ही त्याला चांगले ओळखता असे दिसते."  पाणिनी म्हणाला

तिने  नकारार्थी मान हलवली. "मी त्याला माझ्या आयुष्यात कधीच पाहिले नाही."

" मग तुला त्याच्याबद्दल इतके कसं माहित? "

“मी तुम्हाला  सांगितलय ना की  मला असे विचारू नका" ईशा म्हणाली.

“मी असे म्हणू शकतो  का,की मी हृषीकेश बक्षी चा  वकील असणार आहे? " त्याने विचारले.

तिने जोरजोरात मान हलवली.

“तुम्ही असे म्हणू शकत नाही की तुम्ही  विशिष्ट अशा कोणाचे वकील पत्र घेणार आहात. पण हे  कसे हाताळायचे ते तुम्हाला माहिती आहे. मला  नाही. " ईशा म्हणाली.

"मी कधी सुरू करू काम?"  पाणिनी म्हणाला.

"लगेच."

पाणिनी पटवर्धनने त्याच्या डेस्कच्या बाजूला एक बटण दाबले . बाहेरच्या कार्यालयाचा दरवाजा उघडला आणि सौम्या सोहोनी एक वही  घेऊन  आत आली. ईशा अलिप्त, पणे बसली आपल्या खाजगी चर्चेची  नोकरांसमोर कोणत्याही प्रकारे चर्चा होऊ नये. अशी तिची इच्छा असल्याचे तिच्या देहबोलीवरून जाणवत होतं.

"तुम्हाला काही हवं होतं का?" सौम्या सोहोनी ने  विचारलं.

पाणिनी पटवर्धन  ने त्याच्या डेस्कच्या वरच्या उजव्या हाताच्या ड्रॉवरमध्ये  हात घातला.  आणि एक पत्र बाहेर काढलं. “हे पत्र,ठीक आहे, एक गोष्ट वगळता. मी त्यात मला  हवय ते मी लिहीन. आणि मग तू पत्र पुन्हा टाइप कर"

“मी पुढचे काही  दिवस महत्वाच्या कामासाठी बाहेर जाणार आहे. आणि मी नाही सांगू शकत अत्ता तरी की मी केव्हा ऑफिसला परत येईन. "

सौम्या सोहोनीने विचारले: "मी तुमच्याशी कुठे संपर्क साधू शकते?"

त्याने मान हलवली. "मीच तुझ्याशी संपर्क करेन," तो म्हणाला.

त्याने ते पत्र त्याच्या कडे घेतले   आणि पत्राच्या समासा मध्ये  काहीतरी खरडले. “मी जाण्यापूर्वी  हे  पूर्ण कर म्हणजे मी सही करून ठेवीन.." पाणिनी म्हणाला.

सौम्या पत्र घेऊन बाहेर पडली.पाणिनी ईशा ला म्हणाला, "या तुझ्या प्रकरणात मी नेमकं किती ताणायचं? "

"तुम्हाला काय वाजवी वाटेल?" तिने विचारले.

“अजिबात  नाही," तो खुशीत म्हणाला. "मला ब्लॅकमेलसाठी पैसे देणे आवडत नाही."

"मला माहित आहे," तिने प्रतिक्रिया दिली, "पण तुम्हाला काही अनुभव आला असेल."

" मिर्च मसाल्याला  काय जेवढे मिळतील तेवढे हवेच आहेत." त्याने तिला सांगितले, " जर त्यांना खूप हवे असेल तर मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करेन. जर ते वाजवी रकमेला तयार असतील तर मी ते हाताळू शकतो पटकन. "  पाणिनी म्हणाला

"तुम्हाला ते पटकन हाताळावे लागेल."

“ठीक आहे," तो म्हणाला, “आपण मूळ प्रश्नापासून दूर जात आहोत. किती रक्कम ?"

"मी पन्नास हजार रुपये जमवू  शकेन,".

"हृषीकेश बक्षी राजकारणात आहे," त्याने तिला सांगितले. “मी ऐकत असलेल्या सर्व गोष्टींमधून तो टाइम पास म्हणून  राजकारण करत फिरत नाहीये.त्याच्या मागे मोठा लोक संग्रह आहे. "

"तुम्हाला काय म्हणायचं आहे?" तिने त्याला विचारले.

“हेच की मीच मसाला   कदाचित पन्नास हजारात ऐकणार नाहीत.त्यांच्या दृष्टीने हा मोठा बकरा आहे पन्नास हजार म्हणजे हृषीकेश साठी  बादलीतले शंभर थेंब. "  पाणिनी म्हणाला

ती म्हणाली, "मी कदाचित दहा  हजार वाढवू शकेन."

“ती सुध्दा  एक चिमूटभर  वाढ असेल," त्याने तिला सांगितले.

तिने तिचा खालचा ओठ तिच्या दातांमध्ये चावला.

“समजा काहीतरी घडले  आणि मला तुमच्याशी संवाद साधण्याची आवश्यकता आहे असे वाटले  तर

पेपरमध्ये जाहिरात प्रकाशित होण्याची वाट  न बघता तर तुझ्याशी कसा संपर्क करू? "

तिने मान हलवली.

"तुम्ही करू शकत नाही. समजून घ्या मला. माझ्या पत्त्यावर माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नका  . मला फोन करण्याचा प्रयत्न करू नका. माझा नवरा  कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न करू नका."

"तू तुझ्या पती सोबत राहतेस?"

तिने त्याच्या कडे पटकन बघितले.

"नक्कीच. नाहीतर तुम्हाला देण्यासाठी  मला पैसे कुठे मिळतील?"

कार्यालयाच्या बाहेरच्या दारावर ठोठावलं गेलं  आणि सौम्या सोहोनी आत आली.

"तुम्ही सांगितलेले पत्र मी तयार केलंय.तुमच्या सवडीने वाचून सही करा." ती म्हणाली

 पाणिनी पटवर्धन उभा राहिला., अर्थपूर्णपणे ईशा कडे पाहिले.

“ठीक आहे, मिसेस गरवारे. मी माझ्या परीने सर्वोत्तम काम करेन. "

ती तिच्या खुर्चीवरून उठली, दरवाजाच्या दिशेने एक पाऊल टाकले, थांबली.आणि पाहिले

 पाणिनी ने टेबलावर ठेवलेल्या पैशाकडे पाहिले.

"मला   या पैशाची पावती मिळेल का?" तिने विचारले.   

"तुला हवी असल्यास मिळेल"

"मला वाटते की मला लागेल ती.."

"नक्कीच," तो म्हणाला, अर्थात्, "तुला तुझ्या  पर्स मध्ये ठेवण्याच्या दृष्टीने,

ईवा गरवारेला रिटेनरसाठी दिलेली आणि पाणिनी पटवर्धनने स्वाक्षरी केलेली पावती असा दाखला देतो." पाणिनी म्हणाला

तिने डोळे मिचकावले आणि मग म्हणाली: “हे असे करू नका. रीत सर पावती बनवा की या पावती धारकाने तुम्हाला नमूद केलेली रक्कम अदा केली आहे" ईशा ने सुचवलं

त्याने पटकन पैसे काढले, आणि सौम्या सोहोनी ला इशारा केला.

"सौम्या," तो म्हणाला, “हे पैसे घे.  जमा करून घे.  गरवारेला आपल्या रेकोर्ड चा  प्रिंट दे त्यात उल्लेख कर की सदर रक्कम रिटेनरपोटी  आहे. " पाणिनी म्हणाला

"तुम्ही मला सांगू शकाल की तुमची एकूण फी किती असेल?" ईशा ने विचारले.

, "हे कामाच्या रकमेवर अवलंबून असेल."   पाणिनी म्हणाला “थोडी जास्त पण वाजवी असेल. आणि ती निकालांवर अवलंबून राहील. "

तिने होकार दिला, एक क्षण संकोच केला आणि नंतर म्हणाली: “मला वाटते की माझं काम झालंय.

“सौम्या तुम्हाला पावती देईल," त्याने तिला सांगितले.

ती त्याच्याकडे पाहून हसली. "गुड डे."

" गुड डे," तो म्हणाला.

ती बाहेरच्या ऑफिस च्या दारापाशी थांबली, त्याच्याकडे मागे वळून बघितल.तो तिच्या पाठी मागे  उभा होता, खिशात हात घालून खिडकीतून बाहेर पहात होता,

पाणिनी पटवर्धन रस्त्यावर सुमारे पाच मिनिटे टक लावून पाहत राहिला. मग बाहेरच्या ऑफिसचा दरवाजा पुन्हा एकदा उघडला आणि सौम्या सोहोनी आली

"ती गेली," सौम्या  म्हणाली.

पाणिनी  तिचं बोलणं ऐकायला उत्सुक होताच.

"ती का खोटी आहे अस तुला वाटल?" त्याने विचारले.

सौम्या सोहोनी ने त्याला डोळ्यात रोखून  पाहिले.

"ती बाई," ती म्हणाली, "आपल्याला त्रासदायक ठरणार असं माझं मत आहे.."

"माझ्या दृष्टीने ती पन्नास हजार देणारी आणि शिवाय फी देणारी अशील आहे."  पाणिनी म्हणाला

“ती खोटारडी  आणि कुटिल आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याशी दुटप्पी डाव खेळणारी. स्वतःची काळजी घ्या सर.. " सौम्या पोट तिडकीने म्हणाली

पाणिनी पटवर्धनने तिच्या कडे कौतुकाच्या नजरेने पाहिलं.

 पाणिनी म्हणाला, "ज्या बायका स्वत:ला वाचवण्यासाठी पन्नास हजार खर्च करतात,त्या  बायकांमध्ये निष्ठा  असेल अशी अपेक्षाच करायची नाही. आपली ती एक ग्राहक आहे. "

सौम्या सोहोनीने मान हलवली आणि म्हणाली: “मला ते म्हणायचे नव्हते. मला हे  म्हणायचे होते तिच्यात काहीतरी चुकीचे आहे. ती तुमच्य पासून काहीतरी लपवत आहे आता; आपल्याला माहित असले पाहिजे ते.... काय आहे नेमके. ती तुम्हाला कशात तरी गुंतवत असावी सर.ती सगळ प्रकरण सोपं आहे असं दाखवतं असावी पण..."

 

"तिने माझ्यासाठी सोपे प्रकरण दिले असेल तर मी का काळजी करू?" त्याने विचारले. "ती एक  अशील आहे आणि माझ्या वेळेसाठी पैसे देत आहे.आणि मी वेळेत  गुंतवणुक करत आहे.असं समज. " पाणिनी म्हणाला

"तुम्हाला खात्री आहे की  तुम्ही फक्त वेळेत गुंतवणूक करता  आहात?" सौम्या सोहोनी म्हणाली,:

"का नाही?"  पाणिनी म्हणाला.

"मला माहित नाही," ती म्हणाली, "ती बाई धोकादायक आहे एवढंच मला अंतर्मन सांगतंय."

त्याचा चेहरा  बदलला नाही, पण त्याचे डोळे चमकले. "असेल पण मला संधी घ्यायची आहे, "त्याने तिला सांगितले. “माझ्या ग्राहकांनी माझ्याशी एकनिष्ठ राहण्याची अपेक्षा मी करू शकत नाही. ते मला पैसे देतात. एवढेच." पाणिनी म्हणाला

तिने त्याच्याकडे  विचित्र नजरेने बघितले  “पण तुम्ही तुमच्या ग्राहकांशी एकनिष्ठ राहण्याचा आग्रह धरता, मग ते कितीही वाईट असोत ,चुकलेले असोत.

 “नक्कीच,"पाणिनी म्हणाला "हे माझे कर्तव्यच आहे."

"आपल्या व्यवसायासाठी?"

“नाही," तो हळूच म्हणाला, “स्वतःला. मी पैशाने खरेदी केला गेलेला माणूस समजतो.. मी माझ्या ग्राहकांसाठी लढतो.बहुतेक ग्राहक सरळसोट नसतात. म्हणूनच ते स्वतः अडचणीत येतात. त्यांना बाहेर काढणे माझं काम आहे"

"हे न्याय्य नाही!" ती भडकली

“नक्कीच नाही," तो हसला. "हा व्यवसाय आहे."

. “मी गुप्तहेराला सांगितलय की  ती कार्यालयातून बाहेर पडताच तिच्यावर नजर ठेवा., " सौम्या पटकन विषय बदलत म्हणाली. "कनक ने सांगितलय की तो तिला बरोबर हेरून ठेवील म्हणून."

"तू  स्वतः कनक ओजसशी बोललीस ?"

"नक्कीच, अन्यथा मी तुम्हाला सांगितले नसतं की सर्व काही ठीक आहे."

"ठीक आहे," तो म्हणाला, "तू  त्या रिटेनरमधून तीस हजार  बँकेत भर आणि मला थोडी रक्कम देऊन बाकीचे ऑफिस च्या तिजोरीत ठेव, ती खरोखर कोण आहे हे आपण  शोधू आणि नंतर ठरवू पुढे काय ते." पाणिनी म्हणाला

सौम्या ने पाणिनी ला हवी ती रक्कम दिली. तेवढ्यात कनक ओजस आत आला.

"पाठलाग केलास तिचा? "  पाणिनी ने विचारलं

"ती खूप हुशार आहे पाणिनी." कनक म्हणाला.

"कशावरून? "  पाणिनी म्हणाला.  "तिचा पाठलाग करताना तू किंवा तुझी माणसं तिच्या लक्षात आली का?"

"मला नाही वाटत तसं." कनक म्हणाला.  "मी लिफ्ट च्या दाराजवळ उभा होतो.त्या ठिकाणाहून मला ती तुझ्या ऑफिस मधून बाहेर पडताना दिसणार होती.ती बाहेर येऊन लिफ्ट मधे बसायच्या आधी मी  आत शिरलो.ती तुझ्या ऑफिस कडे नजर ठेऊनच होती. कोणी ऑफिस मधून बाहेर पडतोय का ते पहात होती. तिला वाटत होतं की तू तुझ्या ऑफिसातली कोणीतरी मुलगी तिच्या मागावर पाठवशील.पण तुझ्या ऑफीस मधून कोणीच बाहेर आलं नाही तेव्हा  ती थोडी तणाव मुक्त झाल्याचे जाणवलं. "

"बरं, मग पुढे?" पाणिनी ने विचारलं.

"ती लिफ्ट मधून बाहेर आल्यावर रस्त्याच्या कोपऱ्या पर्यंत गेली.मी दोन तीन माणसे मधे ठेऊन थोडया अंतरावरून तिच्या वर नजर ठेऊन होतो.ती एका डिपार्टमेन्ट स्टोअर मधे शिरली.तिला काय करायचे ते बरोबर ठाऊक होते.ती लेडीज रूम मधे शिरली.बराच वेळ ती बाहेरच नाही आली म्हणून मला संशय आला.मी तिथल्या नोकराला विचारलं  की लेडीज रूम मधून एखादा रस्ता परस्पर बाहेर जातो का तेव्हा  तो म्हणाला  की तीन रस्ते जातात, एक कॉफी शॉप कडे, एक ब्युटी पार्लर कडे आणि एक ब्युटीक कडे."

"ती कुठे गेली नेमकी? "  पाणिनी म्हणाला.

"ब्युटी पार्लर मधे. तिथून ती दुसऱ्या दाराने बाहेर पडली, बाहेर तिची गाडी होतीच. थोडक्यात काय तर आपला कोणीतरी पाठलाग करेल ही शक्यता गृहित धरून ती पूर्ण तयारीनेच तुझ्या ऑफिस ला आली होती." कनक म्हणाला.

"आणि तिने तुला लेडीज रूम मधे जाऊन हातोहात तुरी दिली."  पाणिनी म्हणाला.

( प्रकरण १ समाप्त)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel