भाषा ही एखाद्या कुटुंबाप्रमाणे असते.असे मानून प्रत्येक भाषेचं वेगळं वैशिष्ट्य असतं. हे ही मान्य यामध्ये उपभाषा, पोटभाषा, बोलीभाषा, लिपी या सगळ्यांचा गोतावळा फेर धरत भाषा आपले अस्तित्व दर्शवत जाते. अगदी मराठीत ही अनेक बोलीभाषा कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी, मराठवाडी, कोकणी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर, बगलांनी, नंदुरबारी, खानदेशी अशा अनेक त्या सगळ्यांचाच आज सन्मान.
परंपरा आणि सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्याचं कार्य भाषेच्या माध्यमातून केलं जातं. भाषेमुळेच संस्कृतीची देवाणघेवाण होते.
इंग्रजी भाषेचा प्रसार झालेला आपल्याला दिसत आहे.अगदी पहिल्या भेटीतच एकमेकांना हस्तांदोलन करून हाय, असे म्हटले जाते.कामकाजाच्या ठिकाणीही इंग्रजी भाषेतच कागदपत्रांचे व्यवहार केले जातात पण असे असले तरी काही मराठी वृत्तपत्रे मराठी भाषेला प्राधान्य देवून इंग्रजी शब्द टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत असे दिसते हे उल्लेखनीय.
मराठी भाषेचे अलंकार ल्यालेली मराठी साहित्य परंपरा आणि साहित्यिक या सगळ्यांचाच सन्मान अभिवादन करताना हा मराठी भाषा दिवस आज २७ फेब्रुवारी या तारखेला कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून उत्साहात साजरा होतोय खास दिवस.
ह्यादिवसाची महती बिशद करताना मराठीतील आद्यग्रंथ म्हणून `ज्ञानेश्वरीचा' उल्लेख आवर्जुन करावा लागेल . मातृभाषेचे महत्त्व ओळखून ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील भगवद्गीता प्राकृत भाषेत अनुवादित केली. मातृभाषेबद्दल असणारा आदरभाव व्यक्त करताना ज्ञानेश्वर म्हणतात, "माझा मऱ्हाटीचि बोलु कवतुके परी अमृतातेही पैजेसी जिंके ॥'.. मराठी एक समृद्ध भाषा म्हणता येते.
म मराठीचा म मातृभाषेचा म्हणत भाषेला आईचे स्थान प्राप्त होते ..मायबोली आम्ही तिचे पांग फेडू ...आपली
भाषा हे संवादाचे माध्यम असते,ती भाषा पण हा संवाद कोणाकोणात होतो आहे, हे समजून घेतल्याशिवाय भाषेची प्रक्रिया पूर्ण होत नाही. दोन व्यक्तिंमधला संवाद वेगळा, दोन कुटुंबामधला संवाद वेगळा, दोन भिन्न भाषकांमधला संवाद वेगळा आणि विविध समूहांमधला संवाद वेगळा. अशा विविध प्रकारच्या संवादासाठी विभिन्न भाषा वापरल्या जातात. या भाषांमध्ये परस्पर देवाणघेवाण असते, ती असायलाच हवी. भाषा जिवंत असल्याचे ते महत्त्वाचे लक्षण आहे.
आता या कोरोनाच्या काळात वर्क फ्राँम होम मुळे लोक सतत घरातच राहणार .अनेक शाळा-महाविद्यालयांनी ‘लर्न फ्रॉम होम’ सारख्या घोषणा करत शिक्षणही ....मग अशावेळेस भाषेच्या मुक्तकोशामधे काही नवीन शब्दही आरुढ करावे लागतील का असे वाटले
.घरातूनच काम म्हणजे घरातील माणसांशी प्रत्यक्ष आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जगाशी अप्रत्यक्षरित्या संवाद साधणार आहेत. त्यांच्या या घरातील आणि जागतिक संवादाची भाषा ही मग वेगवेगळी असेल का ??
मग मातृभाषा फक्त बोलीभाषा आपापसांत बोलता नाच उपयोगात येईल का? असे अनेक प्रश्न मनात आले.
आजची आपली तरुण पिढी, त्यांची आनंद व्यक्त करण्याची पद्धत वेगळी माहिती-तंत्रज्ञानाचे युग त्यावरील प्रेम, करमणूक प्रधान समाजरचना त्यात असे ही दिन-विशेष साजरे करावेत ते विशेष नवीन कल्पना नी कृतीनी.,.असे मला वाटते “वाढवू मराठी,गाजवू मराठी".
मराठी भाषेला अभिजात मराठी चा दर्जा देताना मराठी भाषेचा असलेला मराठी मनाचा न्यूनगंड कमी होईल अशी अशा व्यक्त करूयात.
© मधुरा धायगुडे
२७ फेब्रुवारी
मराठी भाषा दिवस