भगवान विष्णूची एक मूर्ती 'कल्प विग्रह', द्वापार युगाशी संबंधित, कार्बन दिनांक २६४५० वर्षे, CIA कडे होती.

एका तिबेटी भिक्षूने सीआयएला कल्प विग्रह मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी सुपूर्द केली आणि काही महत्वाच्या सूचना दिल्या. सीआयएने कल्पविग्रह मूर्तीवर काही प्रयोग केले. प्रयोगा अंतर्गत निरनिराळ्या व्यक्तींना असे पाणी पिण्यास दिले गेले ज्यामध्ये कल्प विग्रह मूर्ती नऊ दिवस बुडवून ठेवली होती. हे पाणी पिणाऱ्या सर्वांच्या जीवनाबाबत निरीक्षणे नोंद  केली असता असे आढळून आले की ते सर्व विलक्षण दीर्घ आयुष्य जगले. अनेकांनी वयाची ११० वर्षे  ओलांडली होती.

वर्ष २००८ मध्ये सीआयएच्या निवृत्त अधिकार्‍यांनी प्रसारमाध्यमांसमोर हा प्रयोगांचा थेट निष्कर्ष उघड केला तेव्हा संपूर्ण वैज्ञानिक जगतासाठी हा एक धक्कादायक शोध होता.मूर्ती पाण्यात बुडवून ठेवून पाणी प्रभारित करण्यात आले आणि वेगवेगळ्या राज्यातील लोकांना पिण्यासाठी प्रभारित  केलेले पाणी देण्यात आले. त्यावेळी अधिकाऱ्यांना परिणाम काय असेल हे माहित नव्हते. काही काळानंतर हा प्रयोग बंद करण्यात आला आणि नोंदी करण्यात आल्या. या नोंदी सीआयएच्या फायलींच्या ढिगाऱ्यात कोठेतरी दफन करून ठेवल्या गेल्या.

एका सेवानिवृत्त सीआयए अधिकाऱ्याकडून ही माहिती जगासमोर आली. कल्प विग्रह मूर्ती आता बेपत्ता आहे आणि शेवटच्या नोंदीत ती मूर्ती तो आयटी क्षेत्रातील एका कर्मचाऱ्याकडे किंवा हैदराबाद (आंध्र प्रदेश, भारत) येथील एका  सॉफ्टवेअर क्षेत्रातील व्यक्तीकडे असल्याचे सांगण्यात आले.


कल्प विग्रह ही साधारण ४७.१० ग्रॅम इतक्या वजनाची एक लहानशी पितळी मूर्ती आहे जी शंकराच्या मूर्तीसारखी दिसणारी मूर्ती आहे. मूर्तीतील देवता गुडघे टेकून किंवाएका गुडघ्यावर बसलेली आहे. मूर्तीच्या डोक्यावर एक सर्प आहे. आकृतीच्या उजव्या हातात एक चकतीसारखे गोलाकार शस्त्र आहे जे  कदाचित हिंदू पौराणिक कथांमधील "सुदर्शन-चक्र" असावे. मूर्तीच्या गळ्यात मण्यांची एक माळ होती. दुसऱ्या बाजूला तीन भुजांमध्ये  साप, शंख आणि चकती धारण केले आहेत. ती मूर्ती सुमारे ५.३ सेमी उंच आणि सुमारे ४.७  सेमी रुंद होती. तिचा अंडाकृती पाया २.५ सेमी लांब आणि १.७ सेमी रुंद होता.

हि विष्णुंची कल्प विग्रह मूर्ती उच्च प्रतीच्या धातूच्या रेषा असलेल्या लाकडी पेटीमध्ये ठेवलेली होती. या पेटीचे झाकण बिजागरी आणि प्राचीन पद्धतीच्या कडी कोयंडा पद्धतीने कुलुपबंद केलेले होते. या लाकडी पेटीमुळेच उत्सुकता वाढली, कारण पेटीत जेमतेम ८ x ८ x ८  इंच इतकीच जागा होती. तर तिच्या पाचही बाजू एकत्र बांधण्यासाठी वापरण्यात आलेले लाकडी तुकडे प्रत्येकी ८ इंच जाड होते! त्या पेटीचे झाकण लाकडाचे होते त्याची जाडीही सुमारे ६ इंच होती.हे सागवान लाकूड सर्व बाजूंनी १ इंच जाडीच्या कांस्यसदृश मिश्रधातूच्या प्लेटद्वारे संरक्षित केले गेले होते. ज्याने बाहेर आलेल्या गंजापासून बॉक्सचे सागवान लाकूड बर्‍यापैकी संरक्षित केले गेले होते. धातूच्या प्लेटला सागवानी लाकडात तत्सम धातूच्याच मिश्रधातूच्या खिळ्यांनी ठोकून बसवले होते. जरी अनेक खिळे  गहाळ झाले असले तरी शिल्लक खिळ्यांनी धातूचे आवरण बऱ्यापैकी घट्ट धरून ठेवले होते.

पेटी वरून पाहून असे सूचित होत होते की ती दीर्घ काळासाठी जमिनीत पुरली असावी. पेटीच्या बाह्यधातू आवरणावर गंज साफ करताना उठलेले ओरखडे स्पष्ट दिसत होते. एवढ्या मजबूत आणि टिकाऊ पेटीत इतक्या काळजीपूर्वक जतन केल्या गेलेल्या या छोट्याशा पुतळ्याला खूप महत्त्व आहे यात शंका नाही.

पण सोबतच्या हस्तलिखिताच्या भाषांतरानंतर कल्पविग्रह मूर्तीच्या बाबतीत घडणाऱ्या घटनांनी अचानक गूढ वळण घेतले. सी आय एने यु-सि-आर-एलचे रेकॉर्ड जप्त केले होते. ती लाकडी पेटी आणि हिंदू मूर्ती कल्प विग्रह या सर्व बाबींवर मौन पाळण्यात आले होते.

"एसटी सर्कस मस्टंग-०१८३ "  हे सीआयए ऑफिस रेकॉर्डमधील यादीतून काढून टाकण्यात आले.
 
सीआयए मधील कोणीतरी ती पेटी आणि त्यातील सामग्रीमध्ये रस घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी बरेच महिने निघून गेले. आत सापडलेले एक दुर्मिळ हस्तलिखित आणि विलक्षणपणे कालमानपरत्वे जीर्ण झालेली पेटी आणि तिच्यावरील लक्षणीय अद्वितीय नक्षीकामाने त्यांना पेटीच्या लाकडाची रेडिओकार्बन चाचणी करण्यास प्रवृत्त केले.

त्या पेटीवरील लाकडी पट्ट्या आणि पृष्ठभाग यांमध्ये काही प्रमाणात नैसर्गिक गंज आणि झीज जरी दिसून आली, तरी आतमध्ये लहान पितळी मूर्ती आणि तिच्याबद्दल लिहिलेले हस्तलिखित सुरक्षित होते.इतके जुनाट साहित्य असूनही हवेतील क्षार आणि आर्द्रता पेटील शिरले नव्हते.

सोबतचे प्राचीन ऋग्वेद निर्मितीच्या अगोदरच्या काळातील संस्कृत हस्तलिखित सीआयएने मोठ्या कष्टाने भाषांतरित केले. काही भारतीय आणि नेपाळी तज्ञांची मदत घेऊन देखील हस्तलिखिताच्या अर्थाचा उलगडा होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला.त्यांनी असा निष्कर्ष काढला की ही भाषा हिंदू धर्माच्या आद्य-ऐतिहासिक कालखंडातील आहे. जेव्हा कोणतीही लिखित भाषा अस्तित्वात नव्हती आणि वेददेखील मौखिकदृष्ट्या पुढील पिढ्यांना शिकवले जात असत असं गैरसमज पश्चिमी वैज्ञानिकांच्या वर्तुळात दृढ होता.हे हस्तलिखित संस्कृतशी मिळतेजुळते असल्याचे दिसून आले, परंतु याआधी कोणत्याही पुरातत्वशास्त्रज्ञ किंवा इतिहासकाराला अशा प्रकारचे हस्तलिखित आढळून आलेले नव्हते. सोबतच्या हस्तलिखितात मूर्तीच्या नावाचा उल्लेख आहे - "कल्प महा-आयुषम रसायन विग्रह" जे सीआयए फाइल्समध्ये संक्षिप्त रूपात "कल्प विग्रह" असे नमूद केले आहे.

कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी ऑफ रेडिएशन लॅबोरेटरी, बर्कले यांनी दिलेल्या निकालाने सीआयएचे अधिकारी चक्रावून गेले. जीर्ण झालेली लाकडी पेटी आणि मूर्तीची पुरातनता मनाला भिडणारी होती. साधूने दावा केल्याप्रमाणे ती मूर्ती या युगातील नव्हती. अर्थात ती मूर्ती द्वापार युगाच्या कालखंडातील होती, ज्यामुळे ती अस्तित्वात असलेली सर्वात जुनी मानवी कलाकृती ठरली.

कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या रेडिएशन प्रयोगशाळेद्वारे रेडिओकार्बन (सी-१४) डेटिंगचा प्रयोग त्या जड ९ इंच जाडीच्या लाकडाच्या पेटीच्या बाजूंवर आणि झाकणावर केला गेला ज्यामध्ये ते सापडले होते जे २६,४५० ख्रिस्त पूर्व या आसपासचा कालखंड दर्शवितात. जे आज २८,४५० वर्षांहून अधिक पुरातन आहे आणि हिंदू पौराणिक धर्मग्रंथातील कुरुक्षेत्र युद्धापेक्षा सुमारे २३,३०० वर्षे जुने म्हणावे लागेल. इतिहासातील कोणतीही उत्खनन सापडलेली ज्ञात प्राचीन संस्कृती इजिप्शियन, मेसोपोटेमिया किंवा सिंधू खोरे ६००० वर्षांपूर्वी अस्तित्वात नव्हते.

१९९६ साली केलेल्या तपासणीत कल्प विग्रह मूर्ती गहाळ झाल्याची बातमी समोर आली. आणखी तपासाअंती अशी माहिती समोर आली ज्यात कल्प विग्रह मूर्तीची तस्करी करून ती मूर्ती अमेरिकेतून भारतात आणली गेली आहे. अगदी अलीकडच्या काळातील माहितीनुसार कल्प विग्रह मूर्ती सध्या हायद्राबाद येथील एका आयटी कर्मचाऱ्याकडे ती मूर्ती आहे. सीआयए ने या मूर्तीचे चार वेगवेगळ्या बाजूनी काढलेले फोटो इंटरनेटवर प्रसारित करून या मूर्तीच्या पुन:प्राप्तीसाठी रोख रकमेचे मोठे बक्षीस जाहीर केले आहे.      

कल्प विग्रह मूर्तीबद्दल तुमचे काय मत आहे? तुम्हाला याबद्दल अधिक माहिती आहे का? आम्हाला कमेंट करून सांगा.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel