लहान मुलांचा खुराक

घरतल्या मोठ्या वडीलधाऱ्या माणसांनी मुलांच्या आहाराकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. मुलाचे आरोग्य मुख्यतः त्यांच्या आहारावर अवलंबून असते. जसा आहार तसे आरोग्य. मुलाला निरोगी आणि सशक्त बनवण्यासाठी चांगला आहार आवश्यक आहे. अगदी लहान बाळांसाठी, आईच्या दुधापेक्षा चांगला आणि पोषक दुसरा कोणताच आहार नाही. एक मात्र नक्की, गरज भासल्यास गाईचे दूध ही तान्ह्या बाळास देता येते. शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दुधात असतात असे विज्ञान सांगते. म्हणूनच मुलांना जास्तीत जास्त दूध पिण्यासाठी मिळेल याची काळजी घेतली पाहिजे. लहान मुलांना चहा-कॉफी देऊ नये. यामुळे मुलांचे पचन बिघडते आणि विविध आजार संभवतात. तेलात तळलेल्या मसालेदार भाज्याही देऊ नयेत. खाद्यपदार्थ पाहून मुलाचे मन अस्वस्थ होते आणि मुलं हट्टीपणा करतात, अश्याने त्यांचा स्वभावही हट्टी होऊ लागतो. म्हणूनच मुलाला वेळेवर व पौष्टिक खाण्याची सवय लावली पाहिजे.

आहार देताना, मुलाला स्वतःच्या हाताने आणि आनंदाने खाऊ द्या. त्याला बगुलबुआ आला म्हणवून किंवा धमकी देऊन खायला घालण्याचा प्रयत्न करू नका. आवश्यकतेपेक्षा जास्त खाल्ल्याने, मुलाची तब्बेत बिघडू शकते. मुलाला आवश्यकतेपेक्षा जास्त खायला दिल्यास मूल एकतर खादाड होईल किंवा अपचनाच्या विविध तक्रारी वाढतील. या गोष्टींची काळजी घ्या. मुलाच्या आहारात पंचरसाचे जेवण असेल याची काळजी घ्या. लहानपणा पासून मुलांना सगळ्या प्रकारच्या भाज्या, फळे, खाण्याची सवय लावा. हे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे.

सखी

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel