चित्रांमध्ये दिसू शकणारी भुते सामान्यपणे तीन प्रकारात मोडतात, प्रकाशग्रह, चक्र किंवा पूर्ण शरीर दर्शन. अनेकदा चित्रात पाहण्यात आलेली भुते यांच्या आकृतीचे स्पष्टीकरण देण्यासाठी काही वेगळे कारण दिले जाते त्यामुळे पुन्हा पुन्हा घडणाऱ्या घटनेची व्यवस्थित पडताळणी होणे आवश्यक आहे.

प्रकाशग्रह प्रकाशाचे एक प्रतिबिंब असते जे कोणत्याही मूळ स्त्रोताच्या अस्तित्वाशिवाय फोटोमध्ये दिसून येते. जास्त करून ते पांढरे किंवा निळे असतात आणि एक किंवा एकाहून अधिक सुद्धा असू शकतात. जर त्यांचा व्हिडीओ बनवला तर त्यांच्या हालचाली टिपता येतात. काही शोधकर्ता यांना जुन्या काळातील अध्यात्मिक उर्जा मानतात. काही म्हणतात कि हे प्रकाशग्रह हवेत मिसळलेले कान आहेत जे कॅमेऱ्याच्या प्रकाशात चमकतात आणि दिसतात. पण या स्पष्टीकरणावरून हे नाही सांगता येत कि असे प्रकाशग्रह प्रत्येक फोटोत का दिसत नाहीत. जर हि गोष्ट खरी असती तर कॅमेऱ्यात त्यावेळी काढलेल्या प्रत्येक फोटोत प्रकाशाग्रह दिसले असते. चक्र किंवा प्रकाशाचे ढग काही फोटोमध्ये दिसून येतात. अस्पष्ट दिसणाऱ्या छोट्या आकारापासून मोठ्या पारदर्शी आकारापर्यंत या चक्रांना अध्यात्मिक उर्जेचे स्त्रोत मानले जाते. जसे श्वासातून प्रकाश दिसणे किंवा लेन्स समोर सिगरेटचा धूर दिसणे किंवा केस या  सर्व फोटोतील गोष्टी इतर कोणत्यातरी वस्तूचे अस्तित्व दर्शवतात. परंतु फोटोत दिसून येणारी चक्राची हे उदाहरणे सहजपणे स्पष्ट करता येत नाहीत.

 सर्वात आश्चर्यकारक असते फोटोत संपूर्ण शरीर दिसणे. या दुर्लभ फोटोंमध्ये ओळखीचे लोक किंवा प्राणी दिसून येतात. मित्र आणि नातेवाईक असे फोटो पाहून लोकांना सहज ओळखू शकतात. पूर्ण शरीर सामान्यपणे नकळतपणे फोटोत पृष्ठभूमीवर दिसून येतात. काही वेळा ती इतकी स्पष्ट दिसतात कि असे वाटते कि फोटो काढणाऱ्या माणसाशी काही संवाद करत आहेत असे वाटते. असे वाटते कि ते फोटोत पोज देत आहेत, जणू काही ते हि गोष्ट मान्य करत नाहीत कि त्यांचा मृत्यू झाला आहे आणि तीच कामे ते करायचा प्रयत्न करतात जी ते मृत्युपूर्वी करत असत. अनेकदा अशी उदाहरणे पहिली गेली आहेत ज्यात एखादा मृत सैनिक किंवा वायुसैनिक आपल्या जीवंत साथीदारांसोबत आकृती स्वरुपात दिसून आला आहे आणि युद्धाच्या वेळी आपल्या मित्रांशी तयार झालेले संबध ते संपवू इच्छित नाहीत. काही वेळा अशी उदाहरणे पाहण्यात आली आहेत ज्यात हि भुते कॅमेऱ्यात त्यांच्या नकळत कैद झाली आहेत आणि आपली दैनिक कामे करत आहेत. अशावेळी प्रश्न पडतो कि भुताला आपला व्हिडीओ केला जातोय हे ठाऊक होते कि ठाऊक असूनही नसल्यासारखे ते आपल्याला दाखवत आहे. साधारणपणे असेच वाटते कि भूतांना माहित असते कि त्यांचा फोटो काढला जातोय परंतु हे निश्चित सांगू शकत नाही. असे किमान एक डझन फोटो उपलब्ध आहेत आणि या अलौकिक अनुभवाचा सबळ पुरावा आहे. परंतु जसे मी आधी सांगितले कि भुतांच्या असण्याचे काही प्रमाण नाही कारण फोटोंमध्ये एडिटिंग सुद्धा करता येऊ शकते. त्यामुळे हे स्पष्ट होते कि आधुनिक तंत्रज्ञानामुळे कितीही भुते फोटोत दिसली तरी पुरेशा पुराव्या अभावी त्यांचे आस्तित्व संशयास्पद राहील. एक दिवस जिन्यावरून उतरणाऱ्या भुताचा स्पष्ट फोटो लोक गांभीर्याने घेणार नाहीत कारण वैद्यानिक दृष्ट्या पुरावा कितीही विश्वसनीय असो जर तो  रेकोर्ड किंवा टेप वर असेल तर लोक नेहमीच त्याच्यावर शंका उत्पन्न करत राहतील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel