बदनाम लेम्प मेन्शन १८६० मध्ये बांधले गेलेसेंट  लुइस , मिसौरी च्या एक प्रसिद्ध परिवार लेम्प्स जो जगातील सर्वात मोठ्या ब्रेव्रीस चे मालक होता त्यांचे हे घर होते. नशाबंदी होईपर्यंत हा परिवार सुखात होता परंतु असे म्हंटले जाते कि १९२० च्या दशकात नशाबंदी कायदा लागू झाला आणि लवकरच लेम्प्स परिवार फसवणुकीचा शिकार बनला. ज्यामध्ये रहस्यमयी प्रकाराने परिवारातील सदस्याचा मृत्यू झाला. ४ जणांनी आत्महत्या केली आणि एक हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला. हे सर्व प्रकार या घराच्या आताच घडले.

 

इमारतीच्या बाजूलाच लेम्प ब्रेवरी आहे. ब्रेवरी एका नैसर्गिक गुहेच्या वर आहे जिकडे बिअर चा साठा केला जात असे आणि  येथे पूर्वीच्या काळात मिसिसिपी नदीतून गुलामांचे येणेजाणे होत असे. आज लेम्प इमारत आणि ब्रेवरी इतके भयंकर भुताटकीचे ठिकाण शोधून सापडणार नाही.

 

लेम्प परिवारातील लोकांचा मृत्यू झाल्यानंतर नशेबंदीच्या कायद्यामुळे ब्रेवरीचा धंदा बुडाला आणि इमारतीची सुद्धा पडझड झाली. काही वर्षांनी जेव्हा बांधकामासाठी ठेकेदाराला बोलावले गेले तेव्हा विचित्र घटना सुरु झाल्या. औजार गायब होऊ लागले, वस्तूंची जागा आपोआप बदलू लागली किंवा फेकल्या जाऊ लागल्या त्यामुळे त्यांनी घाबरून काम सोडून दिले. त्यानंतर रेस्टोरंट म्हणून वापर होणाऱ्या या इमारतीत कर्मचारी आणि पाहुणे यांनी सामान उडणे, विनाकारण आवाज, पियानो आपोआप वाजणे असे प्रकार आणि भुते देखील पहिली. लाईफ या पत्रिकेने या घराला अमेरिकेतील सर्वात भयानक भूतबंगला असे नाव दिले आहे.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel