धर्म हा निर्मळ पाण्यासारखा असावा. जर त्या पाण्यात आपण डोकावून पाहिले तर, त्या पाण्याच्या तळापर्यंत हरेक वस्तु दिसली पाहिजे.ते पाणी आपण ओंजळीत घेतले तर काचासारखे निर्मळ व स्वच्छ दिसले पाहिजे. जेंव्हा आपण ते पाणी प्राशन्य केले तर त्याची चव ही अमृतालाही लाजवेल अशी असली पाहिजे.
हे सर्व गुण जर त्या पाण्यामध्ये असतील तर ते पाणी आपल्या शरीराला हानिकारक न ठरता गुणाकारच ठरेल. तसेच जर धर्मही त्या पाण्यासारखा निर्मळ व स्वच्छ असेल तरच तो संपूर्ण मानव कल्याणाकरीता हिताचा ठरेल.
जसे घाण, बदबूदार पाणी पिण्या अयोग्य असते तसेच जास्त शिस्तबद्ध व माणसासाठी धर्माचे नियम व अटी बंधनकारक असलेला धर्मही मानवकल्याणा करीता अयोग्य असते. एखादे तत्व मानवजाती साठी हानिकारक असून सुध्दा ते फक्त धर्म ग्रंथात आहे म्हणून आत्मसात करने म्हणजे धर्माचे गुलाम बनने होय.
जेंव्हा आपण जेवणासाठी भात बनवतो तेंव्हा ते तांदूळ सर्वप्रथम आपण ऐका मोठ्या प्लेट मधे घेऊन निसतो, त्यातला एकएक खडा बाजूला काढतो त्यानंतर ते तांदूळ स्वच्छ पाण्याने साफ करतो.ते तांदूळ खाण्या योग्य साफ झाले असे जेंव्हा आपल्या बुद्धीला नक्की होते तेंव्हाच आपण ते तांदूळ शिजवायला कूकर मधे टाकतो.
पण धर्मांच्या बाबतीत आपण असे करीत नाही.खूप जणांनी तर आपआपला धर्मग्रंथ वाचलाच नाही. जर वाचला तर त्याची चिकित्सा केली नाही, जर चिकित्सा केली तर ती आत्मसात केली नाही. खरे तर कुठलाही धर्म आपल्याला त्या धर्माची चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य देत नाही.धर्म सांगते मी जसा आहे जसाच्या तसाच मला आत्मसात करा. अन्यथा तुमच्यावर धर्मद्रोहाचा ठपका लावून तुम्ही धर्माबाहेर फेकले जाल.भारतीय राज्यघटनेने आपल्याला व्यक्ति स्वातंत्र्य दिले पण धर्माने आपल्याला तसे स्वातंत्र्य दिले नाही. त्यामुळे आपण आजही धर्मांच्या जोखडातच अडकलो आहोत. त्यातून सुटका करण्यासाठी सहसा कुणी धजावत नाही. कारण त्याला स्वतःचा विचार न करता पूर्ण परिवाराचा विचार करावा लागतो. धर्माचे ठेकेदार हे गिधाडा प्रमाणे धर्माचे उल्लंघन करणाऱ्यावर टपूनच बसलेले असतात.
जेंव्हा आपण एखाद्या ऊसाच्या शेतात जाऊन ऊस खातो तेंव्हा आपण तो बैलाप्रमाणे पूर्णच्या पूर्ण तोंडात घेऊन खात नाही. जरी बैलाला विचारशक्ति नसली तरी निसर्गाने त्याला पाचनशक्ती दिली आहे. त्यामुळे त्यांना त्या ऊसाचा त्रास होणार नाही. पण मानवाला विचारशक्ती दिली पण पाचनशक्ती मात्र कमकुवत दिली. त्यामुळे माणूस विचार करून त्या ऊसातील खाण्यायोग्यच खातो बाकीचे फेकून देतो.
जशी विचारशक्ति आपण ऊस खाताना वापरली तशीच धर्माचे नियम पाळतांनाही वापरावावी. आपल्या धर्मात मानवकल्याणाकरीता जे चांगले आहे. व्यवहार, व्यापार करण्यासाठी जे हितकारक आहे. तेच आपण धर्मातून घ्यावे. बाकीचे त्या ऊसाच्या सिलक्या प्रमाणे थुंकून टाकावे.कारण ते जानवराचे खाद्य आहे माणसाचे नाही.
आजकाल सर्वच धर्मामधे कमालीची रस्सीखेच दिसते. सर्वच धर्माचे ठेकेदार माझाच धर्म चांगला, माझाच धर्म मानवकल्याणासाठी हितकारक,माझाच धर्म जगाला तारणारा अशी आरोळी ठोकतांना दिसतात. हल्ली तर सारेच आपआपला धर्म विज्ञाना सोबत जोडताना दिसतात.
धर्माला विज्ञानासोबत जोड़ने म्हणजे LED लाईट सोबत गोडतेलाच्या दिव्याला जोड़ने होय !
अज्ञान आणि विज्ञान यात खूप फरक आहे हे सर्वप्रथम या लोकांनी समजून घ्यावे.
आजच्या सर्व लोक सुशिक्षित असल्यामुळे सर्वच धर्माचे ठेकेदार आपल्या धर्मातील अनिष्ट रुढी चालीरीती लपवून थोड्याकाही असलेल्या धर्मातल्या मानवकल्याणाच्या गोष्टी जगाला सांगतात. आणि हजारो वर्ष जुना मोडकळीस आलेला धर्माचा गाड़ा 21 व्या शतकातही शाबूत रहावा यासाठी प्रयत्न करतात.
अशा लोकांना बघून मला नेहमीच एक प्रश्न पडतो, खरच या 21व्या शतकात आपल्याला धर्माची गरज आहे का ???
संजय बनसोडे
पाटील आळी, घणसोली गाव
9819444028