हजारो वर्षांपासून मनुष्याला जगाची आणि स्वता:ची निर्मितीबद्दल नेहमीच कुतुहूल वजा अनेक प्रश्न पडले आणि त्यांच्या उत्तरांच्या अभावी देव नावाची काल्पनिक गोष्ट निर्माण झाली. आज विज्ञानाने अशा जवळजवळ सर्वच मुलभूत प्रश्नाची  उत्तरे शोधून काढली आहेत आणि त्या आधारे देवाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. ज्या देव आणि धर्माच्या संकल्पनेने मनुष्यप्राण्यांना एकमेकामध्ये लढवून अतोनात हानी केली त्या देव आणि धर्माचे अस्तित्व संपलेले कधीही चांगलेच. आणि त्यासाठी विज्ञानाच्या या उत्तरांची किवा संशोधनाच्या माहितीचा जनसामान्यामध्ये प्रसार करणे फार महत्वाचे आहे हाच उद्देश समोर ठेवून हा माहितीवजा लेख लिहित आहे.  लेखामध्ये मुखत्वे मनुष्याला पडणाया याच मुलभूत प्रश्नाची वैज्ञानिक उत्तरे सोप्या भाषेत देत आहे.  सर्व माहिती एकत्रित वाचून तर्क केल्यास सहज समजून येईल कि जग आणि जीवनाची निर्मिती या पूर्णतः वैज्ञानिक किवा नैसर्गिक घटना क्रमांचा परिणाम आहे आणि देवाचा त्यात काहीच सहभाग नाही आणि देव फक्त कल्पना मात्र पात्रे आहेत.

जगाची उत्पती कशी झाली ?
जगाची उत्त्पती हा एक वैज्ञानिक घटना क्रम आहे या घटनेला BIG BANG असे संबोधले जाते.  जगाच्या अगदी सुरुवातीला म्हणजे १४ बिलियन वर्षांपूवी विश्व (Universe) हे अतिउष्ण असा आगीचा एक छोटा गोळा होता आणि त्याचे सतत प्रसरण होत होते काही वर्षानंतर ते थोडे थंड झाले आणि त्याच्या उर्जेचे रुपांतर हे विविध अनु रेणू मध्ये झाले उदा प्रोटोन, न्यूटोन आणि इलेक्ट्रोन.  सर्वात पहिले हायड्रोजन, हेलियम आणि लिथियम चे अनु निर्माण झाले आणि हे एकत्रित येऊन तारे, ग्रह निर्माण झाले.  याच घटनेला BIG BANG म्हणतात. 
विश्वची निर्मिती हि एकदाच झालेली घटना नाही तर ती नित्य चालणारी बाब आहे पृथ्वीसारखे अनेक ग्रहांची आणि तार्यांची  निर्मिती सतत चालू असते.

पृथ्वी कशी निर्माण झाली ?
बिग ब्यांग नंतर वातावरणातील धूळ हळूहळू पृथ्वीवर साचत जाऊन तिला बाह्य आवरण मिळाले.  जेव्हा नवीनच पृथ्वी ग्रह निर्माण झाला तेव्हा पृथ्वी विविध वायू आणि ज्व्यालामुखी यांनी भरलेला तप्त गोळा होता आणि या ज्वालामुखीचे नेहमी स्फोट होत होते. ३.८ बिलियन वर्षांपूर्वी पृथ्वीचे तापमान १०० डिग्री सेल. पर्यंत खाली आले. आणि पृथ्वीचे बाह्य आवरण ठोस झाले आणि ज्यावर आपण सध्या राहत आहोत.

पृथ्वीचे वातावरण कशाचे बनले आहे ?
वातावरण म्हणजे पृथ्वीच्या अवतीभोवती असलेले वायूंचे आवरण.  या वातावरणाशिवाय पृथ्वीवर जीवन निर्माण झाले नसते.  वातावरांतील एक पंच्मौंश (One fifth) भाग हा ऑक्सिजन तर बाकी बराचसा नायट्रोजन आहे. 
पुर्थ्वी प्रमाणे वातावरण सुद्धा अनेक लेयर नि बनले आहे. सर्वच प्राणी आणि वनस्पती सर्वात खालील थरात राहतात ज्याला troposphere म्हणतात. विमाने troposphere च्या बाह्य आवरण उडतात.  Stratoshpere, mesosphere, ionosphere आणि exosphere हि आवरणे troposphere च्या वर आहेत. 

पृथ्वी स्वता: भोवती का फिरते –
जगाची निर्मिती जेव्हा झाली तेव्हा फक्त विविध वायू आणि धुळीचे कण निर्माण झाले. ह्या भौतिक  कणांना एकमेकाबद्दल आकर्षण होते त्यांमुळे ते एकत्र येऊन त्यांना मोठे आकारमान मिळाले आणि ग्रह आणि तारे निर्माण झालेत.  ज्या क्षणी हे कण एकत्र आले तेव्हाच ते स्वताभोवती फिरायला लागले. जसजसे त्यांचे आकारमान मोठे होत गेले तसतसे हे फिरण्याची गती वाढत गेले.  त्यामुळे पृथ्वी प्रमाणे सर्व ग्रह स्वत: भोवती फिरतात.

पृथ्वीवर जीवनाची सुरुवात कशी आणि पाण्यातच का झाली ? 
सुरुवातीला झाडी आणि प्राणी हे समुद्रात निर्माण झाले कारण जीवनाला पोषक वातावरण जमिनीवर नव्हते. सुरुवातीला वातावरणात श्वसनाला पुरेसा ऑक्सिजन नव्हता.  तसेच ओझोन चे आवरण नव्हते जे सूर्याच्या अतिनील या हानिकारक किरणांना जमिनीवर येण्यास मज्जाव करतात. उथळ समुद्र जेव्हा कोरडे झाले तेव्हा सर्वात पहिले वनस्पती आणि झाडे यांनी पाण्याबाहेर म्हणजे जमिनीवर आपले अस्तित्व टिकवले आणि वाढवले आणि .त्यांनी सूर्यप्रकाश आणि पाणी यापासून अन्नपदार्थ तयार करणे चालू केले ( Photosynthesis) आणि त्यामुळे वातावरणातील ऑक्सिजन वाढला आणि ओझोन ची लेयर वाढली.विंचू सारखे प्राणी जे हवेतील ऑक्सिजन श्वसनाद्वारे घेत होते, तयार झाले. आणि मग इतर वेगवेगळे प्राणी आणि वनस्पती तयार होत गेले..

आपण श्वसन करत असलेला ऑक्सिजन कोठून येतो ?
वायू रुपात ऑक्सिजन पृथ्वीवर सुमारे ३.५ बिलियन वर्षांपूर्वी तयार झाला.  त्या वेळी, सूर्याच्या अतिनील (UV) किरणांनी वातावरणातील पाण्याच्या अनुचे (molecules) चे विघटन केले आणि त्यातून ऑक्सिजन आणि हायड्रोजन बाहेर पडले.  परंतु यातील बराचसा ऑक्सिजनचा लगेच विविध मुलद्रव्यांशी (substances) संयोग झाला आणि वायुरूपात ऑक्सिजन जास्त वेळ राहू शकला नाही. 
ऑक्सिजन समुद्रात सुद्धा निर्माण झाला. समुद्रातील निळे शेवाळने (blue algae)  प्रकाश-संश्लेषण (photosynthesis) करणे चालू केले तेव्हा ऑक्सिजन तयार झाला.  या शेवाळाने सूर्यप्रकाश आणि कार्बन डाय ओक्साईड चे रुपांतर उर्जेत केले.  या प्रक्रियेत वायुरूपात ऑक्सिजन तयार होऊन वातावरणात जमा झाला.  अंदाजे एक बिलियन वर्ष पूर्वी एकूण वातावरणात ४ % ऑक्सिजन होता. 

तारा (Star) काय आहे ?
तारा हि खगोलीय गोष्ट आहे जे सूर्यासारखे चमकतात किवा प्रकाश देतात. बरेच तारे स्पष्ट प्रकाशतात तर काही कमी प्रमणात. तारे लाल तर काही निळे सुद्धा असतात. तारे हे हायड्रोजन ग्यासचा एक मोठा चेंडू / गोळा आहे जो स्वताच्या गुरुत्वाकर्षण मुले एकमेकांशी बांधलेला असतो. प्रकाश परावर्तन / चमक साठी जी उर्जा लागते ती ताऱ्याच्या मध्यभागी होणार्या हायड्रोजनच्या आणूचा संयोग होऊन हेलियमचे आणू तयार होण्याच्या प्रक्रियेत तयार होते.  तारे सुद्धा कधी न कधी नष्ट होतात.

तारा कसा नष्ट होतो (Supernova) ? :
जेव्हा हैड्रोजन आणि हेलियम यांचा संयोग ताऱ्याच्या मध्यभागी (Core) होतो तेव्हा हा संयोग जवळ जवळ १० बिलियन वर्षे चालतो. मग काही काळानंतर सर्व हायड्रोजन या प्रक्रियेत संपतो. आणि हेलियम चे रुपांतर कार्बन मध्ये होते होते.   

यानंतर काय होईल हे त्या ताऱ्याच्या द्रव्यमान (Mass) वर अवलंबून असते. जो पर्यंत हा संयोग थांबत  नाही तो पर्यंत छोटा तारा सूर्यासारखा एक लाल गोळा होतो नंतर विस्फोट होऊन पृथ्वोसारखा मोठा होतो. खूप मोठे तारे जसे सूर्यापेक्षा २० पटीने जड त्यांचे प्रसारण होऊन आणि विस्फोट होऊन नष्ट होऊ शकतात.
यालाच सुपरनोव्हा (Supernova) म्हणतात. या विस्फोतातील अवशेष एकतर पुन्हा तारे किवा ' ब्ल्याक होल' (Black Hole) बनतात.

सूर्य तळपताना का दिसतो ?
सूर्य मुखत्वे हायड्रोजन चा बनलेला आहे. त्यामुळे सूर्याच्या आतील वातावरणात हेलियम असतो. हायड्रोजन आणि हेलियम यांचा संयोग खूप मोठ्या प्रमाणात उर्जा निर्माण करत असतो. हीच उर्जा सूर्याच्या गाभार्याचे तापमान ८ मिलियन डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवते. सूर्याच्या पृष्टभागावरील तापमान ५५०० डिग्री सेल्सिअस आहे.  सूर्य हि उर्जा Radiation च्या रुपात सोडत असतो आणि हेच Radiation मुले सूर्य तळपताना दिसतो. 

समुद्री वादळे (Tsumani) का निर्माण होतोत ?
समुद्राच्या तळाशी जेव्हा भूकंप होतात किवा दरड कोसळते तेव्हा सुनामी निर्माण होतात.  भूकंप मुले समुद्र तळातील जमीन मोठ्या प्रमाणात आपली जागा बदलते आणि त्यामुळे पाण्याचे शेकडो किलोमीटर जाडीच्या स्थर निर्माण होऊन त्यात हालचाल होते आणि वार्याची उर्जा सोबत येऊन मोठ्या मोठ्या लाटां तयार होतात आणि सुनामी येतात. 

पर्वतांची निर्मिती कशी झाली ?
१. भूगर्भातील जमिनीचे स्तर (Tectonic Plates) भूकंपासारख्या घटनांनी एकमेकांवर आदळतात तेव्हा. एक स्तर खाली सरकला जातो आणि आपोआपच वरील स्तर हे पर्वत बनले जातात. उदा. Andes पर्वत.
२. जेव्हा दोन महाद्वीप (Continentals) एकमेकांवर आदळतात जेव्हा भूगर्भातील जमिनीचे स्तर बेंड वरच्या बाजूला ( उलटा V आकारात ) / वाकले जातात आणि जमिनीच्या वर जो उभार तयार होतो त्याला आपण पर्वत / डोंगर        म्हणतो.  ३५ मिलियन वर्षांपूर्वी हिमालयाची निर्मिती सुद्धा अश्याच प्रकारे झाली. 

जगाचा अंत होईल का ?
होय, जगाचा अंत एखाद्या दिवशी होईल, पण ते कसे होईल या बद्दल नक्की असे आत्ता सांगता येणार नाही.  हे दोन प्रकारे होऊ शकेल.  पहिल्या प्रकारात बिग ब्यांग ने जगाचा जो सतत प्रसारण होत आहे ते हळू हळू संथ होईल शेवटचा तारा नष्ट होईल आणि तो BLACK HOLE मध्ये जाईल.  जग हे रिकामे होईल (ग्रह तारे काहीही नसतील) आणि भीषण थंडी निर्माण होईल.  दुसर्या शक्यते मध्ये जेव्हा जगाचे प्रसारण थांबेल तेव्हा ग्रह आणि तारे एकमेकांवर आदळतील आणि जग हे खूप छोटे आणि अति उष्ण होईल आणि नष्ट होईल. 

हेच नक्की मुलभूत प्रश्न असतील जेव्हा आदि मानवाला त्याची उत्तरे सापडली नाही आणि त्यामुळे त्याला वाटले असेल कि ह्या सर्व गोष्टी अपोआप निर्माण होणे शक्य नाही आणि त्या नक्कीच कोणी विश्वनिर्मात्याने किवा देवाने निर्माण केल्या असतील.  आणि यातून देव नावाचे पत्र निर्माण झाले.  आज विज्ञान इतके प्रगत झाले आहे कि संशोधनात स्पष्ट झाले आहे कि विश्वाची निर्मिती साठी देवाची गरजच नव्हती. आणि हेच कारण आहे कि जगातील नास्तिक लोकांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. 

आशा आहे आपणास हा लेख माहितीपूर्ण आणि उपयोगी वाटेल.  आपणास या विषयासंदर्भात काही शंका किवा उपप्रश्न असेल तर मला 1kiran_shinde1@rediffmail.com या इमेल वर लिहा. 

लेखं- किरण दिलीप शिंदे , संगमनेर / पुणे
(मोबाईल- ९९०२०९९९३५ )

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel