रामायणातील रामाचा प्रतिस्पर्धी रावण, हा प्रत्यक्षात भगवान शंकरांचा परमभक्त होता. तो अत्यंत विद्वान होता, उत्कृष्ट शासनकर्ता होता आणि त्याचबरोबर तो कलाकार देखील होता. तो उत्तम रित्या वीणा वादन करीत असे. रावणाने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी नर्मदा नदीच्या तीरावर तपश्चर्या केली. त्यांना प्रसन्न करण्यासाठी तो वारंवार आपले शीर (मुंडके) कापीत असे. प्रत्येक वेळी जेव्हा तो असं करीत असे तेव्हा तेव्हा त्याचे शीर पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसे. असं १० वेळा झालं आणि शेवटी भगवान शंकर प्रसन्न झाले. शंकराने ती १० मुंडकी रावणाला भेट दिली. ही १० डोकी त्या ६ शास्त्रांची आणि ४ वेदांची प्रतीक आहेत ज्यात रावणाने प्रभुत्व प्राप्त केले होते. लंका जिंकल्यावर रावण पुन्हा भगवान शंकरांना भेटायला म्हणून कैलास पर्वतावर गेला जिथे शिवभक्त नंदीने त्याला आत जाण्यापासून अडवले. यावर चिडून रावणाने नंदीची खिल्ली उडवली, ज्यामुळे नंदीने त्याला शाप दिला की त्याची लंका एका माकडाच्या हातून नष्ट होईल. आपली श्रद्धा दाखवण्यासाठी रावणाने कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला. क्रोधीत होऊन भगवान शिवाने पर्वतावर आपल्या पायाचा अंगठा ठेवला आणि रावणाचा हात दबला गेला. त्याच्या किंकाळीने अखंड जग थरारून गेले. शंकराला खूष. करण्यासाठी रावणाने आपल्या नासा काढून शिवाचे गुणगान गायला सुरुवात केली ज्यामुळे शंकराने त्याला सोडून दिले आणि त्याला एक तलवार भेट दिली आणि त्याचे नामकरण रावण म्हणून केले ज्याचा अर्थ आहे "भयानक डरकाळी फोडणारा".
जेव्हा राम आणि त्याच्या सेनेने समुद्र पार करण्यासाठी पूल बांधला, त्यावेळी हवन करण्यासाठी पाचारण करण्यात आलेला पंडित होता रावण. अर्थात त्याला त्यावेळी हे माहित होते की हा पूल कोणत्या हेतूने बांधण्यात आला आहे. तरीही त्याने श्रीरामाला आशीर्वाद दिले.