बुद्धिमान लोकांनो ... आपले धन त्याच लोकांना द्या जे त्या योग्यतेचे आहेत, बाकी कुणाला देऊ नका ... मेघांकडून शोषले गेलेले समुद्राचे पाणी नेहमी गोड असते ...
चाणक्य, एक महान शिक्षक, राजकारणी, देशभक्त, ज्ञानी आणि धर्मशास्त्री होते आणि त्यांना भारत आणि पाश्चिमात्य देशातील विद्वान अद्भुत अद्वितीय मानत असत. भारत देशात राजकारण आणि धर्म नियंत्रित करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. भारतातील राजघराण्यातील अनेक राजे आणि अनेक बड्या प्रस्थांचे ते गुरु होते. चाणक्य त्या महान व्यक्तींपैकी एक आहेत, ज्यांनी अनेक चढ - उतार आणि सामाजिक तसेच राजकीय बदल यांच्या मधून भारताला एक नवी दिशा दाखवली.
चाणक्य लिखित साहित्य -
अर्थशास्त्र -
जेव्हा चाणक्यांनी अर्थशास्त्र लिहिले, त्या वेळी देशाला मर्यादित अर्थव्यवस्था आणि सरंजामशाही अशा अडचणींनी घेरलेले होते. संस्कृती आणि स्थानिक राजकारण देशातील व्यापार आणि व्यावसायिक संबंधांचे निर्णय करत होती. चाणक्यांनी शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा घटक मानला. आजही शेती हाच भारताच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात प्रमुख हिस्सा आहे.
चाणक्य नीति -
या पुस्तकात श्लोकांच्या माध्यमातून चाणक्यांनी आपले ज्ञान लोकांपर्यंत पोचवले आहे. नीतिशास्त्र (आचारसंहिता) जीवन जगण्याचा आदर्श मार्ग दाखवतो.
त्यांनी देशभरातील समस्या मुळापासून नाहीशा करण्यासाठी अपार प्रयत्न केले.
आज जगभरात चाणक्य यांना त्यांच्या क्रांतिकारी आणि भविष्यवादी शिकवणीसाठी मैनेजमेंट गुरु ही पदवी बहाल करण्यात आली आहे.