मानवी प्रतीरक्षक विषाणू कमतरता (एच.आय.व्ही.) च्या संक्रमणा नंतरची स्थिती म्हणजे एड्स. यामध्ये मनुष्य आपली नैसर्गिक प्रतिकारक क्षमता हरवून बसतो. एड्स स्वतःमध्ये कोणताही आजार नाही, पण याने पिडीत मनुष्याचे शरीर इतर संक्रमणात्मक आजार जे जीवाणू आणि विषाणू यांच्यामुळे होतात, त्यांच्यापासून नैसर्गिकरित्या संरक्षण करण्याची किंवा त्यांना नैसर्गिकरित्या प्रतिकार करण्याची क्षमता हरवून बसते. कारण एच. आय. व्ही. (ज्या व्हायरस मुळे एड्स होतो) मानवी शरीरामध्ये असलेल्या रक्तामध्ये उपस्थित रोगप्रतिकारक पेशींवर आक्रमण करतो. म्हणूनच एड्स ने ग्रस्त व्यक्तीच्या शरीरात रोग प्रतिकारक क्षमतेचा सतत क्षय होत गेल्यामुळे कोणताही संसर्गजन्य आजार, म्हणजे अगदी सामान्य सर्दी - खोकल्यापासून ते अगदी क्षयरोगासारखा आजार त्याला सहजपणे होऊ शकतो आणि त्यांचा इलाज करणे अतिशय कठीण होऊन जाते. एच. आय. व्ही. संक्रमण झाल्यावर त्याची परिणती एड्स मध्ये होण्याला ८ ते १० वर्षे किंवा त्याहीपेक्षा अधिक काळ लागू शकतो. एच. आय. व्ही. ने ग्रस्त व्यक्ती अनेक वर्षांपर्यंत या रोगाच्या कोणत्याही लक्षणांशिवाय राहू शकतात.
एड्स म्हणजे आजच्या काळातील आरोग्याशी संबंधित असलेली सर्वांत मोठी समस्या आहे. थोडक्यात ही एक महामारी आहे. एड्स ची बाधा होण्याची मुख्य करणे ३ आहेत - असुरक्षित शरीर संबंध, रक्ताची देवाण - घेवाण किंवा मातेच्या गर्भातून बाळाला होणारा संसर्ग. नेशनल एड्स कंट्रोल प्रोग्रॅम आणि संयुक्त राष्ट्रसंघ एड्स दोघांचाही मत आहे की भारतात ८० ते ८५ टक्के एच. आय. व्ही. संसर्ग हा असुरक्षित विषमलिंगी (स्त्री-पुरुष) यौन संबंधातून पसरत आहे. असं मानलं जातं की एच. आय. ची. चा विषाणू सर्वांत आधी आफ्रिकेतील एका खास जातीच्या माकडामध्ये सापडला होता, आणि तिथूनच तो संपूर्ण जगभर पसरला. या रोगावर आतापर्यंत इलाज सापडलेला नाही. संपूर्ण जगात यावर संशोधन चालू आहे. १९८१ मध्ये एड्स चा उगम झाल्यापासून आतापर्यंत जगभरात ३० कोटींपेक्षा आधी लोकांना यामुळे प्राण गमवावा लागला आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel