रामसेतू ज्याला इंग्रजीमध्ये एडम्स ब्रिज देखील म्हटले जाते, भारत (तामिळनाडू) च्या दक्षिण पूर्व समुद्र किनाऱ्याचे रामेश्वरम द्वीप आणि श्रीलंकेचा उत्तर पश्चिम तटावर मानणार द्वीप यांच्यामध्ये चुना आणि दगड यांनी बनलेली एक शृंखला आहे. भौगोलिक आधारे लक्षात येते की एकेकाळी हा सेतू भारत आणि श्रीलंका यांना भूमार्गाने आपसात जोडत होता. हा सेतू जवळ जवळ १८ मैल (३० किमी) लांब आहे.
असे मानले जाते की हा सेतू १५व्या शतकापर्यंत पायी पार करण्यायोग्य होता. एका चक्रीवादळामुळे हा पूल आपल्या मूळ रुपात राहिला नाही. रामसेतू पुन्हा चर्चेत आला तो नासा द्वारे उपग्रहाच्या सहाय्याने घेण्यात आलेली छायाचित्रे प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध झाली तेव्हा. समुद्रावर सेतू निर्माण करणे हा रामाचा दुसरा सर्वांत मोठा रणनैतिक विजय म्हणता येऊ शकेल, कारण समुद्राकडून रावणाला कोणताही धोका नव्हता आणि त्याला विश्वास होता की हा विराट समुद्र पार करून त्याला कोणीही आव्हान देऊ शकत नाही.
गोस्वामी तुळशीदास यांच्या नुसार जेव्हा दशानन रावणाने समुद्रावर सेतू बनल्याची बातमी ऐकली तेव्हा त्याची दहाही तोंडे एकाच वेळी बोलून गेली - बांध्यो जलनिधि नीरनिधि जलधि सिंधु बारीस, सत्य तोयनिधि कंपति उदधि पयोधि नदीश’. मानस च्या या दोह्यामध्ये आपल्याला समुद्राचे १० पर्यायी शब्द देखील मिळू शकतात. मानस आणि नासा यांच्या व्यतिरिक्त महाकवी जयशंकर प्रसाद यांच्या कवितांमध्ये देखील रामसेतू असल्याचे संकेत मिळतात - सिंधु-सा विस्तृत और अथाह, एक निर्वासित का उत्साह, दे रही अभी दिखाई भग्न, मग्न रत्नाकर में वह राह|