१५ ऑगस्ट २०१७: अभिजीत डोंबिवलीकर -"तेहतीस कोटी देव खाली आणून त्यांना विचारा, ते सुद्धा सांगतील की तुम्ही हीच रुम घेतली पाहिजे. स्टेशनपासून दूर असलं म्हणून काय झालं? रुम बघा कशी ऐसपैस आहे ते. ए टू झेड, सगळे कुटुंब सुखी राहील इथे. जबान आहे आपली." रुम बघण्यासाठी आलेल्या ग्राहकाला अभिजीत सांगत होता.
"ते ठीक आहे, पण पाण्याचं काय? तो समोरचा दुकानदार म्हणत होता, या बिल्डिंगमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे." रुम बघायला आलेली व्यक्ती म्हणते.
"तो समोरचा पानाच्या टपरीवाला म्हणाला का?" अभिजीत विचारतो.
"हो, आता बोला." ती व्यक्ती पुढे म्हणते.
"तुमचा विश्वास माझ्यावर कमी आणि त्या टपरीवाल्यावर जास्त दिसतोय. तेहत्तीस कोटी देव खाली आणून त्यांना विचारा, हा अभिजीत डोंबिवलीकर खोटं बोलतोय का ते." अभिजीत म्हणतो.
"तसं काही नाही हो, रूम घ्यायची तर आजूबाजूला चौकशी करायला हवी ना! म्हणून आम्ही सहज म्हणून विचारलं त्याला." ती व्यक्ती म्हणते.
"कोण तो टपरी चालवणारा, आज आहे आणि उद्या नाही. स्वतःचा फायदा बघतात ते, माझं नाव काय?" अभिजीत विचारतो.
"अभिजीत डोंबिवलीकर." ती व्यक्ती म्हणते.
"नावातच डोंबिवली आलं ना! ₹ ३,००० खर्च करून आडनाव बदलून घेतलं ते खोटं बोलायला का?" अभिजीत म्हणतो.
"नाही म्हणा, चुकलं आमचं." ती व्यक्ती म्हणते.
"मग या रुमचं फायनल करायचं का?" अभिजीत विचारतो.
"रूमची किंमत जरा जास्त नाही का वाटत?" ती व्यक्ती विचारते.
"साहेब, तुमच्या बजेटमध्ये पाहिजे म्हणून आपण तुम्हाला ही रुम दाखवली. नाहीतर यापेक्षा महागातल्या कचकचीत रुम आहेतच की." अभिजीत म्हणतो.
"अहो पण तेवढी ऐपत नाहीये आमची." ती व्यक्ती म्हणते.
"काका, मग डाऊन साईडला बघायची ना रुम, इथे या रूमचा रेट सगळ्यात कमी आहे. उगाच माझा पण वेळ वाया जातोय." अभिजीत म्हणतो.
"म्हणजे डाऊन साईड ची सुद्धा ऐपत नाहीये, पण आमच्या मुलीला ज्या घरात देणार आहोत, त्यांना लग्नात हुंड्याऐवजी डोंबिवलीमध्ये एखादं घर हवं आहे, म्हणून…" ती व्यक्ती अभिजीतसमोर व्यक्त होते.
"बस का काका? ते चुकीचं वागताहेत म्हणून तुम्ही सुद्धा चुकीचं वागायचं? तुम्हाला माहित आहे ना! हुंडा देणं आणि घेणं कायद्याने गुन्हा आहे ते…" अभिजीत म्हणतो.
बोलत असताना त्याच्या मोबाईलवर ब्रेकिंग न्यूज हायलाईट होते, 'मुंबई विद्यापीठ येथे दहशतवादी हल्ला'
"हे बघा, काय मेसेज आलाय, आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मुंबई विद्यापीठावर दहशतवादी हल्ला झाला! अरे हा देश आहे कि मस्करी? अशा या शुभ दिवशी विद्येच्या घरी हल्ला व्हावा? एखाद्या मंत्र्याच्या घरी झाला असता तर आपल्याला पण बरा बाटला असता ना!" मोबाईलवर आलेली बातमी त्या गृहस्थाला दाखवत अभिजीत म्हणतो.
"अरे बाप रे!" बातमी पाहून ते गृहस्थ घाबरतात.
"ते दहशतवादी सोडा, आधी तुमचं बघा. मी म्हणतो, अशा घरात मुलगी द्यायचीच का, जिथे हुंडा मागितला जातो. अशी माणसं काय दहशतवाद्यांपेक्षा कमी असतात. ते अतिरेकी लोक एकदाच काय ती गोळी घालून संपवतात आणि आपली माणसं आपल्याला एव्हरी मिनिट मारतात." अभिजीत तीव्रतेने म्हणतो.
"तुमचं खरं आहे म्हणा, पण मुलीसाठी एवढं करावं लागतं." ते गृहस्थ म्हणतात.
"आपण कमिशन नाही घेतलं तर ही रुम तुमच्या बजेटमध्ये येईल का?" अभिजीत विचारतो.
"हो, पण कमिशन का नको?" ते गृहस्थ आश्चर्याने विचारतात.
"आपण पैशासाठी एवढा मरत नाही, वाटल्यास तेहत्तीस कोटी देवांना…"
"तुम्ही प्रत्येक वेळी देवांना का खाली आणता?"
"तुमच्या बजेट मध्ये बसतेय ना रुम, मग झालंच कि. कशाला उगाच एवढा विचार करता?" अभिजीत त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो. त्या गृहस्थाचे डोळे भरून येतात, दोन्ही हात जोडून ते अभिजीतचे आभार मानतात.
"अहो काका, हे काय करताय? असू द्या. चला, आपण रुमचं फायनल करू." असं म्हणून अभिजीत त्यांना घेऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी जातो.
वाटेत असलेल्या त्या पानटपरीवाल्याला 'आल्यावर तुला बघतो' अशी नजर दाखवत तो पुढे निघतो.
कागदपत्रांचे व्यवहार पूर्ण होत असताना अभिजीतला त्याच्या मित्राचा फोन येतो, "अरे लवकर डोंबिवली स्टेशनला ये, टेररिस्ट लोकांना कल्याणला नेणारी ट्रेन येतेय, लवकर ये टेररिस्ट बघायला."
"काय बोलतोस? ओरिजिनल टेरेरीस्ट? आलोच चल." असं म्हणून त्या गृहस्थांना आपल्या घरी बसवून अभिजीत दहशतवादी बघण्यासाठी डोंबिवली स्थानकात धाव घेतो. पण डोंबिवली स्थानकावर पोहोचून त्याला बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या ऐकू येतात. जो तो स्वतःला वाचवण्याच्या प्रयात्न्यात होता, आणि अभिजीतचे पाय नकळत रेल्वेस्थानकाच्या दिशेने जात होते.
अभिजीतचं आठव्या इयत्तेपर्यंतचं शिक्षण मिलिटरी स्कूलमध्ये झालं होतं. काही कारणास्तव तो आपलं पुढील शिक्षण डोंबिवलीला येऊन पूर्ण करतो. परिस्थितीमुळे जरी तो इस्टेट एजंट झाला असला, तरी बंदूक चालवणे, सैनिकांचे अपडेट्स अशा बऱ्याच गोष्टींबद्दल त्याला आकर्षण होतं.
प्लॅटफॉर्मच्या आणखी जवळ पोहोचल्यावर त्याला काही पोलीस लपून रेल्वेस्थानकावर जाताना दिसतात. तो देखील लपतच त्यांच्यापर्यंत पोहोचतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.