देवावर प्रेम सर्वांनाच आहे.
...पण 'त्याच्या घरी' जायची
घाई मात्र कुणालाच नाही.
आपल्या घरात सर्वांनाच देव हवा.
...पण त्याच्या घरी आपण जायच्या
विचाराने मात्र मनात धडकी भरते.
देव आपल्या घरी आला म्हणजे,
'सण, उत्सव आणि आनंद.'
आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे,
'दुःख, शोक.'
देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा.
आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणूनही आटापिटा.
देवाघरून येणं म्हणजे 'जन्म'.
देवाघरी जाणं म्हणजे 'मृत्यु'.
दोन्हीही अटळ आहेत.
पण ह्या दोघांमधली जी 'गंमत' आहे,
त्यालाच तर 'आयुष्य' असे नाव आहे.
- व. पु. काळे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.