रात्रीचा तो भयाण काळोख.......सगळीकडे सामसुम....पावसा चे पडणारे संथ पाणी.....मधेच वीज कडाडत होती.....एक       कच्चा रस्ता.....रस्ता नव्हे.... पायवाटच....पूर्ण निसरडा झालेला....पावसाचा पाण्यामुळे........आणि त्या रस्त्याचा दोन्ही
 बाजूला घनदाट जंगल.........मधेच एखाद्या झुडपातून एखादा साप सरपटत निघून जायचा......आणि त्यामुळे होणारी सळसळ अंगावर काटा आणत होती......

पण त्या काळोखातून कोणीतरी चालत होत.....अंधारातून वाट काढत....पावसा पासून बचावासाठी अंगावर
काळ्या रंगाचा रेनकोट होता......हातात काळ्या रंगाचे ग्लोव्ज घातले होते........जो त्याचा गुढग्यापासून बर्‍याच
खालीपर्यंत होता......पायात गनबूट......रेनकोट असून पण त्याने डोक्यावर छत्री घेतली होती.....गळ्यात मफलर
गुंडाळला होता.....आणि त्या चिखल झालेल्या रस्त्यावरून एक एक पाऊल टाकत तो चालला होता........त्याचा चालण्या  मुळे बूटचा एक वेगळाच आवाज येत होता........पच्च....पच्च....तो आवाज ती शांतता चिरत
होता.......कुठेतरी पोहाचायच होत त्याला.......लवकरात लवकर......

चालता चालता तो अचानक थांबला......आणि हळूच मागे मान फिरवली.....तोंडावर काळ कापड बांधलं होत त्याने.....ते
त्याने खाली केल.....सगळीकडे नजर फिरवून तो काही शोधू लागला.....पण अंधार इतका होता की त्याला काहीच दिसत
नव्हतं अगदी जवळच सुद्धा नाही....तो पुन्हा पुढे पाहून चालू लागला....त्याने चालण्याचा वेग वाढवला होता....चालता चालता तो कधी डावीकडे पाहायचा तर कधी उजवीकडे......त्याचा चेहर्‍या वर एक
प्रकारच भय आणि चिंता पसरली होती.....ते वातावरणच तस होत की कोणाचाही काळजाचा ठोका चुकेल......भयाण
अंधार....निर्जन रास्ता.....आणि त्या रस्त्यावर चालणार तो एकमेव माणूस........त्याचा ह्रदयाचे ठोके वाढले
होते.....कारण सतत त्याला अस वाटत होत की कोणीतरी त्याचा पाठलाग करतोय....

त्याने घड्याळ पहिलं 11 वाजले होते......''मला लवकरात लवकर पोहचाव लागेल.....सर्व सांगावं लागेल.....नाहीतर...
नाहीतर अनर्थ होईल....." तो स्वतशीच पुटपुटत वेगाने चालत होता......पण अचानक तो पुन्हा थांबला....
त्याचा चेहर्‍या.वरचे भीतीचे रंग आणखी गडद झाले.....त्याचा श्वासाचा वेग वाढला.....कारण त्याचा मनातून
अजूनही ती भीती गेली नव्हती की कोणीतरी त्याचा पाठलाग करतय...

तेवढ्यात एक वार्‍याची झुळूक आली आणि त्याचा चेहर्‍या ला थंड स्पर्श करून गेली.....अचानक आलेल्या त्या हवेमुळे  त्याचा अंगावर काटा आला....कदाचित त्याच वार्‍यामुळे जवळचा झाडाची पाने सळसळू लागली......
''कोण आहे....??? तो धीर एकटवून ओरडला.....

पण आवाज खूप दबका निघाला........त्याने इकडे तिकडे पाहिले....कुठेच कसलीच हालचाल नव्हती......
.होती ती फक्त भयाण शांतता.......
"कोण आहे....???? यावेळी आवाज मोठयाने निघाला....
.त्याचा प्रतिसाद म्हणून की काय त्या आवाजाची प्रतिध्वनि त्याचा कानावर पडली..........
आणि पुन्हा एक शांतता सगळीकडे पसरली........
"काय झालय मला….?? असा का वागतोय मी....??एवढा का घाबरतोय....?? डोळे बंद करून कपालावरून हात
फिरवत तो स्वतशी बोलत होता.......कदाचित कालपासून घडलेल्या घटणांमुळे.......हो त्याचाच परिणाम आहे
हा.....त्यामुळेच भास होत आहेत मला......पण....पण अस थांबून चालणार नाही....मला जाव लागेल........सर्व सांगावं
लागेल......''
असाच काहीसं बडबडत तो निघाला........


दुसरीकडे........
एक मोठा वाडा.....आणि त्या वाड्यात काही गावकरी मजूर लोक.....येऊन जमले होते.....आणि वड्यातील बाहेरचा हॉल
मध्ये वाट पाहत होते.....कोणाचीतरी....
.तेवढ्यात जिन्यावरून आरामात एक एक पाऊल खाली उतरत प्रतापराव आले.....ते येताच सर्व गावकरी हात जोडून उभे
राहिले......
प्रतापराव.......त्या गावातील सर्वात प्रतिष्ठित व्यक्ति....वय साधारण चाळीशीतल.....भारदार व्यक्तिमत्व.......
अंगावर शाल घेतली होती .त्यांनी .....हॉल मध्ये असलेल्या झोक्यावर ते बसले......एक कटाक्ष सर्वांवर
टाकत बोलले......"बसा....".
सर्वजण बसले.........
''बोला...इतक्या रात्री काय काम काढळत...?? प्रतापराव जवळच ठेवलेला हुक्का जवळ घेत बोलले....
त्यांचा या वाक्याने गावकर्‍यात कुजबूज सुरू झाली.....तू बोल.....तू बोल.....म्हणून एकमेकांना डिवचू लागले....
"काय झाल...?? बोला ना घडाघडा.......काय रे ..राजा......काय झाल....??
प्रतापराव गरजले......
सर्वजण शांत झाले...
.राजा हात जोडून उभा राहिला आणि बोलला...."साहेब....त्या जागी काही आहे साहेब..."
त्याचा या वाक्याने प्रतापराव सरल बसले....त्यांचे डोळे राजा ला खाऊ की गिळू या नजरेने पाहत होते......
काहीसा आवाज चढवून ते बोलले...,"काय आहे तिथे..???
राजा त्यांचा या वाक्याने घाबरला आणि अडखळत बोलला...."ती....ती... जागा शापित आहे.....तिथे ती दू...दुष्ट
आत्मा राहते..."
"गप्प बस".....प्रतापराव ओरडतच उठले....."मूर्ख कुठला.....अडाणी....भूत प्रेत काही नसतं.....कधी सुधारणार
रे तुम्ही लोक...."
सर्व गावकरी खाली मन घालून ऐकू लागले.....कोणाचीही हिम्मत होत नव्हती त्यांचा विरोधात
काही बोलायची.....
"त्या जागेवर चाललेल काम हे तुमचासाठी फक्त काम असेल....पण माझासाठी ते सर्वस्व आहे....तिथे मी बांधणार
आहे माझ स्वप्न........एक रिसॉर्ट.......ज्याचं नाव असेल...MHE.......म्हणजे माय हॉरर एक्सपिरियंस....
...या पूर्ण महाराष्ट्रातील आलीशान रिसॉर्ट......''
तेवढ्यात कसलातरी आवाज आला.....
कोणीतरी दारावर थाप मारत होत......
बाहेर पाऊस अजूनही चालू होता.....थंडी खूप
वाढली होती.....आणि भयाण शांतता होती.....कदाचित
येणार्‍या वादळा पूर्वीची शांतता........


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please login to comment. Click here.

It is quick and simple! Signing up will also enable you to write and publish your own books.

Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to क्रिष्णा आणि एक झपाटलेल रिसोर्ट


Bhay ithale sampat nahi. Marathi horror story.
Detective alfa and dekhava.
Detective Alfa and a step into darkness.
Halloween Marathi Horror Story
Detective Alpha and the moonlight murder
Khuni Kon ? World famous murders in Marathi
डीटेक्टिव अल्फा आणि रत्नजडीत खंजीराचे रहस्य
Detective Alfa and the old house. Story by Saurabh Wagale.