"हे बघा मंगेश गावी गेलाय कायमचा.....त्याने ही नोकरी सोडलीय......धुळा आणि नार्या सोन्याचा हंडा घेऊन पळून गेलेत......इथे भूत-प्रेत वगैरे काही नाही....तुम्ही कामाला लागा....."
प्रतापराव सर्व मजुरांना समजावून सांगत होते......
मजूर पण मजबूरी म्हणून पुन्हा कामाला लागले......
"काय घडलं असेल रे इथे आधी....?? एक मजूर काम करत करत दुसर्या मजुराला बोलला......
"आपल्याला कस माहीत असणार.....एक तर आपण आलोय लांबून पोट भरायला......आणि कोणाला विचारव म्हटलं तर गाव पण ओसाड......हे रिसॉर्ट बनल की होईल पुन्हा रहदारी सुरू...." दूसरा मजूर काम चालू ठेवत बोलला.....
"पण अस म्हणतात की इथे आधी एक मोठा वाडा होता......जो जळून खाक झाल.....त्या वाड्यात राहणार्या बाई चा आत्मा भटकतो इथे......."
मजूर ऐकीव गोष्टी सांगत होता....."
एवढं बोलून तो गप्प झाला आणि खाली बघून काम करू लागला......

दिवसमागून दिवस जात होते.....रिसॉर्ट च काम जोरात चालू होत......पण आता पहिल्या सारखा अडचणी येत नव्हत्या......न कसले भास होत होते......मजूर जुन्या सर्व घटना विसरून जोमाने काम करत होते.....
इकडे त्या बाटली मध्ये ती आत्मा भुंग्याचा रूपात आराम करत होती.....कारण रिसॉर्ट पूर्ण झाला की तिला थैमान घालायचा होता......

बघता बघता वर्ष होवून गेल.....रिसॉर्ट च काम पूर्ण झालं.....

आजूबाजूला घनदाट जंगल आणि त्या जंगलात निसर्गाचा सानिध्यात बनलेलं ते रिसॉर्ट.....
आणि आज त्या रिसॉर्टच उद्घाटन होत......
"वेलकम टु रिसॉर्ट सर..."
अस बोलत येणार्या प्रतेक व्यक्तिच गेट जवळ उभी असलेली सुंदर तरुणी बुके देऊन स्वागत करत होती......
गेट मधून आत येताच समोर होती सुंदर इमारत.....आणि त्यावर सुंदर अक्षरांनी लिहल होत....

"RESORT MY HORROR EXPERIENCE"

ज्यावर लाल रंगाची लाइट जळत होती....अस वाटत होत जणूकाही प्रतेक अक्षरातून रक्ताचे थेंब खाली पडत आहेत....रिसॉर्टचा दारावर मोठी मानवी कवटीच चित्र होत.....ज्याचा डोळ्यात लाल लेजर लाइट चमकत होती.....सर्वजण वाट पाहत होते.....दार उघडण्याचा.........इतक्यात एक भयानक आवाज करत हॉल चा दरवाजा आपोआप उघडला गेला........
दारातच प्रतापराव उभे होते.....त्यांनी सर्वांच स्वागत केल.....
प्रतापरावांसोबत अजुन एक देखणा तरुण काळा सूट घालून उभा होता.........तो ही सर्वाच स्वागत करत होता....
"वेल्कम टु रिसॉर्ट mhe सर......आय अॅम सुबोध......मॅनेजर ऑफ धिस रिसॉर्ट....."
सर्वजण हॉल मध्ये आले होते.....सर्वजण हॉल चे सौदर्य पाहत होते.....खूप सुंदर हॉल होता....हॉल चा भिंतीवर भीतीदायक पेंटिंग लावले होते.......त्याला आतून लायटिंग असल्याने ते उठावदार दिसत होते......मधोमध झुंबर होत....त्यालाही हॉरर मास्क लटकवत सोडलं होत....सर्व हॉल मध्ये मंद लाल रंगाची लाइट लावली होती....ज्याने वातावरण आणखी भीतीदायक झालं होत......एवढं असूनही प्रतेक जण एंजॉय करत होता........

"अटेंशन प्लीज......"
त्या आवाजाने सर्वजण शांत झाले....आणि आवाजाचा दिशेने पाहू लागले.....
प्रतापराव सुंदर सूट घालून उभे होते....
"लेडीज अँड जेंटलमन......वेल्कम टु रिसॉर्ट माय हॉरर एक्सपिरियंस......
पूर्ण हॉल मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला......
"किती फनी नाव आहे ना...." एक मुलगी हळूच दुसर्या मुलीला बोलली....
ती पण हसत बोलली..."हो न.....काही रोमॅंटिक नाव द्यायचं सोडून हे काय.....म्हणे हॉरर एक्स्पीरियन्स........"
दोघी हसू लागल्या......
प्रतापराव पुढे बोलू लागले......,"तुम्हा सर्वांना हा प्रश्न पडला असेल की मी हे अस भयानक नाव या सुंदर रिसॉर्ट ला का दिल....??
सगळ्यांनी होकारार्थी मान डोलावली......
"हा रिसॉर्ट पूर्ण भारतातील एकमेव रिसॉर्ट आहे.....जिथे तुम्हाला भय रसचा आनंद घेता येईल......इथे राहिल्या नंतर जेंव्हा तुम्ही बाहेर  पडाल.....तेंव्हा सर्वांना ओरडून सांगाल......इट्स माय हॉरर एक्स्पिरीयन्स........."
पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला.......
"आता मी सांगेन या जागेचा इतिहासा बद्दल......
पूर्ण हॉल शांत झाला.......सर्वांना या जागेचा इतिहास ऐकायचा होता.....
एक नजर पूर्ण हॉल वर टाकून प्रतापराव पुढे सांगू लागले.....
"16 वर्षा पूर्वी या जागेला शापित मानल जायचं.......एका दुष्ट आत्मेचा वास होता इथे.......एका बाई ची आत्मा होती ती.......त्या बाई च नाव........" प्रतापरावांनी पुन्हा एकदा हॉल वर नजर फिरवली......
सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली होती......
प्रतापरावांनी नाव सांगितलं.......
"मंजिरी....."
त्याच क्षणी अचानक पूर्ण रिसॉर्ट ची लाइट गेली.....पूर्ण रिसॉर्ट अंधारात बुडाल.....अचानक घडल्याने मुली घाबरून ओरडू लागल्या.....माइक पण बंद झाल्याने प्रतापराव ओरडून सर्वांना शांत बसण्याचे आवाहन करू लागले.....पण त्या गोंधळात त्यांचा आवाज कोणालाच पोहचात नव्हता......
अचानक जोरजोरात विजा कडाडू लागल्या......
सोसाट्याचा वारा सुटला......मुसळधार पाऊस पडू लागला....हॉल मध्ये अंधार आणि बाहेर पाऊस लोकांना काहीच कळत नव्हतं काय करावं ते......

अचानक एक आवाज त्या अंधारात घुमू लागला........
गुण....गुण.....गुण....गुण......
कोणाला काहीच कळेना कसला आवाज आहे....जणूकाही एखादा भुंगा त्या हॉल मध्ये फिरत होता...........10 मिनिटे असाच चालू राहील आणि अचानक सर्व थांबलं.......आकाश निरभ्र झाल.....पाऊस पूर्ण बंद झाला.......वातावरण एकदम शांत झाल.......एकदम सगळीकडे पुन्हा प्रकाश पसरला.....लाइट आली होती......

सर्वजण लगेच हॉल मधून बाहेर पडू लागले आणि निघून जाऊ लागले........प्रतापरावांना काहीच कळत नव्हतं अचानक झाल तरी काय......सुबोध जवळच उभा होता......पूर्ण हॉल रिकामा झाला होता.......
अचानक सुबोध ची नजर कोपर्यात गेली......तिथे एक मुलगी झोपली होती......
सुबोध घाबरत बोलला......,"सर.....ते बघा...."
प्रतापरावांनी समोर पहिलं आणि लगेच उठून दोघे तिचा जवळ गेले......
तिचा मानेतून रक्त येत होत.......तिथे एक छिद्र पडल होत.....जणू काहीतरी धारदार वस्तूने मानेवर वार केलाय......
रक्ताची धार आता वाढली होती.......
अचानक त्या मुलीने डोळे उघडले.........
तिचा पांढर्या डोळ्यांचा शिरा हळूहळू लाल होवू लागल्या.........आणखी लाल......
तिचा डाव्या डोळ्यातून रक्ताचा एक थेंब पापणीतून खाली आला.....लगेच दूसरा थेंब......मग तिसरा.....चौथा.....
डोळ्यातून रक्ताची धार वाहू लागली......आणि अचानक स्प्रिंग सारखा डोळा बाहेर आला.....आणि त्यातून चीत्कार करत एक भुंगा डोळ्यातून बाहेर पडला......आणि उडून निघून गेला......
त्या मुलीने शेवटचे हात पाय झाडले.......आणि शरीर शांत झाल......
सुबोध आणि प्रतापराव हे भयंकर दृश्य पाहून चार हात मागे सरकले.......सुबोध तर किंचाळू लागला......
प्रतापराव स्वत:वर ताबा ठेवत बोलले...,"हे पुन्हा कस बाहेर पडल......"
ते लगेच उठले....सुबोध कडे पाहत बोलले...,"इन्स्पेटर कदम ला बोलावून घे....प्रकरण दाबून टाकायला सांग नाहीतर रिसॉर्ट ची बदनामी होईल....."
एवढं बोलून ते लगेच निघाले....हॉस्पिटल चा दिशेने......

हॉस्पिटल मध्ये पोहचल्या नंतर ते त्या रूम मध्ये जाऊ लागले जिथे तो भुंगा बाटलीत बंद करून ठेवला होता.....
पण त्या रूम मध्ये खूप गर्दी होती....आणि पोलिस कसली तरी तपासणी करत होते.....
इंस्पेक्टर कदम ही तिथेच होते आणि एका सुंदर नर्स समोर बसले होते.....आणि तिचा डोक्यावरुन हात फिरवत होते........प्रतापराव तिथे आले......आणि बोलले...,"कदम काय झाल...??
कदम त्यांचाकडे पाहत बोलले.....,"तुम्ही इथे…??? इंटरेस्टिंग......"
"अहो काय झाल ते सांगा आधी...."प्रतापराव वैतागत बोलले....
कदम हात तसाच नर्स चा डोक्यावर ठेवून बोलले....,''आपले डॉक्टर साहेब......गेले ते......वर.....कायमचे...."
"ओह माय गॉड....."बोलत प्रतापराव खुर्चीवर बसले.....
नंतर रागाने कदम कडे पाहत बोलले...,"मग तुम्ही खुनाचा तपास करायचा सोडून....हिला काय गोंजारत बसलाय..."
नर्स हे ऐकून पुन्हा रडू लागली......
कदम तिला समजावत बोलले...,"अरे रेरे ....नका रडू....नका रडू..."
नंतर प्रतापराव कडे पाहत बोलले...,"अहो मी कामच करतोय......इंटरेस्टिंग काम.....म्हणजे या मॅडम नि स्वत: त्यांचा डोळ्यांनी डॉक्टर ला मरताना पाहिलय....."
प्रतापराव हे ऐकून उठले....नर्स चे खांदे पकडून बोलले...,"कसा मेला डॉक्टर....??
नर्स अजूनही गप्प च होती....
प्रतापराव ओरडले....,"बोल न लवकर...."
कदम त्यांना थांबवत बोलले...,"अहो प्रतापराव काय करताय...?? ही पद्धत आहे का सुंदर मुलींशी बोलायची....."
कदम नर्सला पाण्याचा ग्लास देत बोलले...,"हे बघा घाबरू नका.....मी आहे ना तुमचाजवळ......बोल आता....काय काय झाल ते...."
नर्स ने मग सांगायला चालू केल......
दुपारी पेशंट कमी होते.....डॉक्टर माझाकडे आले आणि बोलले तुला कसला आवाज येतोय का........?? मी नाही बोलले......
मग ते काही बडबड करत या रूम कडे जाऊ लागले......मी पण त्यांचा मागे जाऊ लागले.....डॉक्टर रूम मध्ये आले आणि कपाट उघडल आणि त्यातून एक काचेची बाटली बाहेर काढली.....त्यात एक काली वस्तु होती.....डॉक्टर त्याला निरखून पाहू लागले......आणि बोलले..,"'तूच आवाज करतोयस न........थांब तुला कापून टाकतो.....खूप त्रास दिलास तू मला........"

अस म्हणत त्यांनी जवळची सूरी उचलली.....आणि बाटलीच झाकण उघडून त्याला टेबल वर ठेवलं......त्या वस्तूला सुरीने कापणार इतक्यात तो जीव जागा झाला आणि अचानक चीत्कार करत डॉक्टर चा तळहातात घुसला.....त्यांचा हातातून रक्ताचा चिळकांडया उडू लागल्या.......आणि बघता बघता तो किडा त्याचा हातात शिरला.....डॉक्टर जोरजोरात ओरडू लागले......तडफडू लागले....दुसर्या हाताने त्यांनी तो हात पकडला होता.....त्याचा हातावर एक गाठ दिसत होती.....जी हळू हळू वरचा दिशेने जात होती.....जणूकाही तो भुंगाच हात पोकरत पोकरत वर चालला होता.....डॉक्टर अजूनही किंचाळत होते......

अचानक ती गाठ गळ्या जवळ आली.....त्यांचा तोंडातून रक्त येऊ लागलं......त्यांनी छातीवर हात ठेवला......आणि अचानक छाती फोडून तो भुंगा बाहेर पडला आणि चीत्कार करत खिडकीतून निघून गेला..........डॉक्टर तिथेच रक्ताचा थारोळ्यात पडले होते.......

नर्स एवढं बोलून पुन्हा रडू लागली......

कदम प्रतापराव सोबत बाहेर येऊन उभे राहिले......
"इंटरेस्टिंग.......' कदम सिगरेट काढत बोलले.....
"रिसॉर्ट मध्ये पण एक जण असाच मेला......'प्रतापराव थंड आवाजात बोलले.....
कदम ची सिगरेट हातातच राहिले......
सिगरेट पेटवून एक झुरका मारला.....
"आज रिसॉर्ट मध्ये जाऊन पाहावं लागणार...आज रात्री मी जाईन रिसॉर्ट मध्ये....माझा सोबत असा माणूस द्या ज्याला या रिसॉर्ट चा कोपरा न कोपरा माहीत आहे........." कदम काहीसा विचार करत बोलले.....
प्रतापराव यावेळी मात्र धोका पत्करायला तयार नव्हते....
"नको.....रिसॉर्ट काही दिवस बंद ठेवू......मग बघू....."
एवढं बोलून ते निघून जावू लागले......आणि पुन्हा मागे वळून कदम कडे रोखून पाहत बोलले......
"उद्या वाड्यावर या.....त्या जागेबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे....जे मी तुम्हाला खूप आधी सांगायला हव होत......."

एवढं बोलून प्रतापराव निघून गेले.....

पण आज रात्री कदम नि रिसॉर्ट वर जायचं ठरवलच होत......
कदाचित कदम पण तीच चूक करत होते जी चूक मंगेश ने केली होती.....
सिगरेट चा एक झुरका ओढून त्यांनी हवेत सोडला आणि बोलले.....
"इंटरेस्टिंग......."

धूर असाच हवेत मिसळून गेला.....जशी ती आत्मा हवेत गायब होते..........

पण येणार्या काळात तिचा इतिहास उलगडणार होता.........मंजिरीचा..........

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please login to comment. Click here.

It is quick and simple! Signing up will also enable you to write and publish your own books.

Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to क्रिष्णा आणि एक झपाटलेल रिसोर्ट


Bhay ithale sampat nahi. Marathi horror story.
Detective alfa and dekhava.
Halloween Marathi Horror Story
Detective Alfa and a step into darkness.
Detective Alpha and the moonlight murder
Khuni Kon ? World famous murders in Marathi
डीटेक्टिव अल्फा आणि रत्नजडीत खंजीराचे रहस्य
Detective Alfa and the old house. Story by Saurabh Wagale.