धाडस आणि मूर्खपणा यात खूप थोडा फरक असतो.......एवढ्या रात्री जंगलात जायचा निर्णय तर मंगेश ने घेतला होता....त्याचा दृष्टीने तो खूप मोठ धाडस करत होता.....पण तो धाडस नव्हे तर मूर्खपणा करत होता......

चालत चालत एकदाचा तो त्या साइट वर पोहचला.....जिथे दिवसा कामाची धावपळ असायची.....आता मात्र सर्वत्र शांतता पसरली होती.......ऐकू येणारी शांतता....आणि होता फक्त अंधार.....कुट्ट अंधार......मंगेशने खिशातून छोटी टॉर्च बाहेर काढली......त्या टॉर्चचा मंद प्रकाशात तो एक एक पाऊल पुढे टाकू लागला.......आणि जाऊ लागला जंगलाकडे......रिमझिम पाउस अजूनही चालू होता.......अचानक वातावरणाने आपल रूप बदललं.....आणि कमालीची थंडी वाढली......वार्यामने थोडा वेग वाढवला......त्यामुळे गारवा आणखी वाढला....पण हा गारवा भयानक होता.....मंगेश चा मनात आता मात्र थोड्याशा भीतीने जागा बनवली होती.....तरीही तो पुढे पुढे चालत होता.......

अचानक त्याचा पाय कशावर तरी पडला......तो दचकला.....थांबला......त्याचा लक्षात आल.....काहीतरी वेगळीच वस्तु त्याचा पाया जवळ आहे.....त्याने हळूहळू टॉर्च खाली घेतली....आणि पाहू लागला काय आहे.....क्षणभर तर तो दचकलाच.....ह्रदयाचे ठोके वाढले.....कारण पायात एक माणूस पालथा पडला होता.....ज्याने काळ्या रंगाचे कपडे घातले होते........मंगेश विचारात पडला.....एवढ्या रात्री इथे कोण पडलय..?? जीवंत तरी आहे का....
असा विचार करून त्याने वाकून त्याचा खांदा हलवला...."ओ भाऊ...."
त्याचा शरीराची थोडी हालचाल झाली.....

चला जीवंत तरी आहे.....असा विचार करून मंगेश ने त्याचा खांदा पकडून उठवायचा प्रयत्न केला पण.........एकदम खट......आवाज झाला आणि त्याचा खांदा तुटून त्याचा हातात आला.....जणूकाही एखाद्या खेळण्यातील बाहुला असावा......तुटलेल्या हातातून आणि त्या शरीरातून रक्ताची धार लागली.......मंगेश ने तो हात किंचाळत बाजूला फेकला.....चार पावले मागे सरकला....आणि टॉर्च ने त्या माणसाकडे पाहू लागला.......तो माणूस हळूहळू विव्हळत सरलं झाला......त्याचा चेहरा पाहून मंगेश ला घामच फुटला.....चेहरा इतका भयानक होता की त्या अंधार रात्रीत कोणीजरी पहिला असता तरी त्याची भीतीने गाळण उडाली असती.......
त्याचा चेहर्याअवर विचित्र वार होते...जणूकाही नखाने बोचकरल होत.....त्या जखमेतून सतत रक्त वाहत होत....जखम इतकी खोल होती की आतील हाड सुद्धा दिसत होत......अर्धे ओठ तर गायबच होते.......चावून तोडल्यासारखे......
पण एक गोष्ट होती ज्याने मंगेश पूर्ण हादरलाच........त्या माणसाचा चेहरा अगदी त्याचा सारखाच होता......आणि कपडे पण त्याचा सारखेच......
मंगेश समोरच दृश्य पाहून भेदरला होता.....पण तो पुन्हा भानावर आला....कारण ते धड स्वताला एका हाताने पुढे खेचत....सरपटत.....त्याचाच दिशेने येत होत.......आणि गुरगुरत होत......वेदनेने विव्हळत होत.......आणि म्हणत होत...."माझी मदत कर....मदत कर..."

मंगेश घामाने पूर्ण भिजला होता.....भीतीमुळे पायातील पूर्ण त्राण निघून गेले होते.....तो तसाच मागे सरकत होता....पण मागे काही होत.....ज्याचा मुले तो तिथेच तटला.......पण ते धड आता एकदम जवळ आल होत....आणि दूसरा हात उंचावून त्याने मंगेशला पकडायचा प्रयत्न केला........मंगेश ने किंचाळून डोळे बंद केले आणि चेहरा दोन्ही हाताने झाकून घेतला........तो विव्हळण्याचा आवाज बंद झाला होता.......पुन्हा एकदा सगळीकडे शांतता पसरली होती.....
मंगेश ने हळूच डोळे उघडले......समोर काहीच नव्हते.....तो उठून उभा राहिला....जवळच पडलेली टॉर्च उचलली त्या प्रकाशात इकडे तिकडे पाहू लागला पण कुठेच काही नव्हतं......त्याने मागे पहिलं तर समोर ट्रक होता....काय होत ते..?? भास..?? की सत्य....?? मंगेश ला काहीच कळेना....काहीही असो मला प्रतापरावांना भेटून सर्व सांगायला हव....असा विचार करून तो ट्रक मध्ये बसला.......किती भयानक भास झाला होता मला.....मंगेश स्वत:शी बोलला...
पण ट्रक चा जवळच तो तुटलेला हात पडला होता.....जो मंगेश ने किंचाळून फेकला होता....पण तो त्याला दिसला नव्हता......अचानक त्या तुटक्या हाताने पंजा वर केला......आणि पुन्हा निश्प्राण होवून खाली पडला.......
इकडे मंगेश ने ट्रक चालू केला......आणि खूप वेगाने चालवू लागला....त्याला लवकरात लवकर प्रतापरावांकडे जायचं होत....अचानक त्याने ब्रेक मारला कारण समोर त्याचा वाडा होता.....तो खाली उतरला....पण टॉर्च हातातून खाली पडली....म्हणून त्याने ती उचलली आणि पुढे पहिलं तर त्याचा पायाखालची जमीनच सरकली कारण समोर वाडा नव्हताच....होत ते घनदाट जंगल...भयाण शांतता.....जिथे तो थोड्याच वेळा पूर्वी होता......
तो जोरात किंचाळला......

"खि खि खि खि खि.........."
एक भयाण हसण्याचा आवाज ती शांतता चिरत मंगेश चा कानावर येऊन पडली.......त्याचे सर्वांग हादरले.....
तो ओरडला....."को....कोण आहे....??"
क्षणभर सर्वत्र शांतता पसरली........
"अव्ववव्वव.......अवव्ववाव......"
खि खि खि खि खि................................."

पुन्हा एकदा भयानक हसण्याचा आवाज वातावरणात घुमला......
या आवाजाने त्याचा छातीत धडकी भरली.....
तो किंचाळला...."कोण आहे....समोर का येत नाही..."
जीवन आणि मरणाचा उंभरठ्यावर असलेल्या व्यक्ति चा चेहर्याावर जो भाव असतो तोच भाव आता मंगेशचा चेहर्यािवर होता.....
तो मागे सरकत सरकत टॉर्च ने काही दिसतय का ते पाहत होता......
अचानक त्याचा खांद्यावर कोणीतरी हात ठेवला....तो दचकून चार पावले पुढे सरकला आणि मग मागे वळून टॉर्च ने पाहू लागला.......
त्या अंधारात एक धिप्पाड आकृती त्याला दिसली......ज्याने पूर्ण अंगावर काळे कपडे घातले होते....कदाचित रेनकोट होता तो.....डोके भिजू नये म्हणून डोक्यावर बॅककॅप घातली होती.......
मंगेश थरथरत्या आवाजात बोलला...."कोण आहेस तू.....जा इथून.....मला मारू नकोस....."
"साहेब....मी आहे धुला....."
धुला समोर येत बोलला.....

समोर धुलाला पाहून मंगेश ला हायस वाटलं......त्याने सुटकेचा श्वास सोडला....आणि डोळ्यातून आलेले पाणी पुसत उत्साहात बोलला......,"अरे धुला....तू इथे काय करतोय...."
धुला गंभीर आवाजात बोलला....'' साहेब तुम्ही एकटे जंगलात येणार होता म्हणून तुमची खूप काळजी वाटत होती म्हणून तुम्हाला शोधत शोधत मी पण आलो...."
मंगेश ला आता धुलाचा आधार वाटत होता.....तो बोलला...."धुला तू म्हणत होता ते बरोबर आहे....इथे खरच काहीतरी आहे...."
धुला दबक्या आवाजात बोलला...."हो साहेब......खूप वाईट आत्मेचा वास आहे इथे.....जी कदाचित आपल्याला इथे काम करू नाही देणार....."
"मला प्रतापरावांना भेटून सर्व सांगायला हव.......पण कस सांगू इथून निघन पण अवघड झालाय..."मंगेश चिंतेचा स्वरात बोलला.....
"फोन करा ना त्यांना...."धुला सहजच बोलला.....
मंगेशने त्याचाकडे पहिलं आणि विचार केला इतका सोपं मार्ग मला कसा नाही सुचला......भीतीने मेंदू पण काम करायचं बंद करतो हेच खर......असा विचार करत त्याने मोबाइल काढला.....
"शीट यार....नेटवर्क नाहीये...." अस म्हणत त्याने धुला कडे पहिलं.......
पण धुला तिथेच नव्हता.......अचानक एक मोठा चीत्कार त्याचा कानावर पडला.......
"हा तर धुलाचा आवाज आहे....."अस म्हणत तो आवाजाचा दिशेने जाऊ लागला....
पळत पळत तो जाऊ लागला......आणि अचानक कशाला तरी ठेस लागून पडला.....टॉर्च पण हातातून सटकळी.....
इतक्यात त्याचा मोबाइल वाजला.....त्या आवाजाने तो दचकलाच......त्याने पहिलं तर धुलाचा फोन होता.....
त्याने पटकन उचलला आणि बोलला..."अरे धुला कुठे आहेस तू.....ठीक तर आहेस न...??
तिकडून धुलाचा आवाज आला....,''साहेब काळजी करू नका.....मी ठीक आहे...आताच थोड्या वेळा पूर्वी मी मेलो......आता तुमचा नंबर आहे..."
मंगेश ने ते ऐकून किंचाळत मोबाइल फेकून दिला.....टॉर्च उचलून पहिलं तर जवळच धुलाच प्रेत पडलं होत......

"खि खि खि खि खि.............हसत धुलाच प्रेत उठून बसल.....चेहरा निस्तेज.....डोळे पांढरे....जबडा फुटलेला आणि त्यातून वाहणार रक्त.......आणि अंगावर ते रेनकोट.....
मंगेश त्याला पाहून पळून जाऊ लागला......
तेवढ्यात मागून घोघरा आवाज आला....."माझा इच्छे शिवाय तू कुठेच नाही जाऊ शकत....."
आणि पुन्हा एकदा हसू लागला......
त्या आत्म्याने धुलाचा प्रेतात प्रवेश केला होता.....
"मला मारू नकोस.....मी काय बिघडवलय तुझ....??? मंगेश विनवणी करत बोलला....
"माझा जागेवर येऊन मलाच विचारतो काय बिघडवल..??? अस बोलत त्याने मंगेश छातीवर जोरात लाथ मारली....
काड.....आवाज झाला .....मंगेशचा बरगड्या मोडल्या होत्या......तो वेदनेने विव्हळत होता....
"ही जमीन माझी आहे....पंधरा वर्ष कैद करून ठेवलं होत मला......."
अस बोलत त्याने मंगेश चा चेहरा नखाने पूर्ण ओरबाडून काढला......त्याचा नखात मंगेश चा चेहर्या"चे कातडे निघून आले......मंगेश किंचाळत होता......
"रिसॉर्ट बांधणार ना इथे......बांधा.....बांधेपर्यंत कोणाला काही करणार नाही......नंतर मात्र माझाच राज्य असेल त्यावर........"
अस बोलत त्याने मंगेशचा खांदा पकडून उपसून काढला......रक्ताचा चिळकंडया उडू लागल्या......
त्या आत्मेची गर्जना ऐकून की काय......जोर जोरात विजा चमकू लागल्या.......मुसळधार पावूस पडू लागला.....सोसाट्याचा वारा सुटला.......
पण त्या आत्मेच अजून समाधान नव्हतं झाल.....कारण मंगेश चे श्वास अजून चालू होते.......त्याने आपले दोन्ही हात एकदम त्याचा पोटात मारले......
एका मोठ्या चित्कारासह मंगेश ने त्याचा जीव सोडला.......
त्या आत्मेणे दोन्ही हाताने त्याचे आतडे बाहेर ओढून काढले.......तेच  तोंडात सारात दोन्ही हात आकाशाकडे करत जोरात किंचाळला.....,"मी आलेय....."
त्याचा आवाज पूर्ण जंगलात घुमला.......विजा अजूनही कडाडत होत्या......आणि पावसानेही वेग वाढवला होता.....
येणार्याव संकटांची ही फक्त सुरवात होती.......

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please login to comment. Click here.

It is quick and simple! Signing up will also enable you to write and publish your own books.

Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to क्रिष्णा आणि एक झपाटलेल रिसोर्ट


Bhay ithale sampat nahi. Marathi horror story.
Detective alfa and dekhava.
Detective Alfa and a step into darkness.
Halloween Marathi Horror Story
Detective Alpha and the moonlight murder
Khuni Kon ? World famous murders in Marathi
डीटेक्टिव अल्फा आणि रत्नजडीत खंजीराचे रहस्य
Detective Alfa and the old house. Story by Saurabh Wagale.