सुखाचिया लागीं करितों उपाव । तों अवघेंचि वाव दिसों येतें ॥१॥
करितां तळमळ मन हें राहिना । अनावर जाणा वासना हे ॥२॥
अवघेंचि साकडें दिसोनियां आलें । न बोलवें तें भलें कोणा पुढें ॥३॥
चोखा म्हणे मी पडिलों गुर्हाडीं । सोडवी तातडी यांतूनियां ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.