एड्स म्हणजे "अक्वायर्ड इम्यूनो डिफिशियेंसी सिंड्रोम" एच.आय.व्ही. विषाणूच्या संसर्गामुळे होणारी एक स्थिती आहे. यात माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती निकामी बनते. एड्स हा रोग नाही पण एक शारीरिक स्थिती आहे. एड्‌स झालेल्या माणसाला इतर संसर्गजन्य रोगांची सहज लागण होऊ शकते. एच.आय.व्ही. रक्तातील रोगप्रतिकारक पेशीं लिम्फोसाईट्सवर आक्रमण करतात. एड्स पीडितांच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता हळूहळू कमी होत गेल्याने सर्दी, खोकल्यासारखे साधे तसेच क्षयासारखे भयंकर रोग होणे शक्य असते. त्यांवर इलाज करणेही अवघड होते. एच.आय.व्ही. संसर्गापासून एड्स होईपर्यंत ८ ते १० वर्षांपेक्षाही अधिक काळ लागू शकतो. एच.आय.व्ही. ने ग्रस्त व्यक्ती अनेक वर्षांपर्यंत काहीही लक्षणांशिवाय राहू शकते.

एड्स वर्तमानकाळातील सर्वांत मोठ्या स्वास्थ्यसमस्यांपैकी एक आहे. एड्सच्या संसर्गाची तीन मुख्य कारणे आहेत - ""असुरक्षित लैंगिक संबंधातून", "बाधित रक्तातून" तसेच बाधित आईकडून अर्भकाला. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रॅम आणि यूएनएड्स यांच्यानुसार भारतात ८० से ८५ टक्के संसर्ग असुरक्षित विषमलैंगिक (हेट्रोसेक्शुअल) संबंधांतून पसरत आहे. भारतात आजपर्यंत एड्‌सकडे दुर्लक्ष झाले आहे. एच.आय.व्ही. विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील खास प्रजातीच्या माकडात सापडला आणि तेथूनच सगळ्या जगात पसरला असे मानले जाते. इ.स.१९८१ मध्ये सुमारे ५ कोटी लोक एड्‌सचे बळी ठरले आहेत असा अंदाज आहे. अजूनही एड्‌सवर इलाज सापडलेला नसल्याने जगभरातील संशोधक त्यावर काम करत आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel