आरती सद्‌गुरुची ।

सुखल्पतरूची ॥

सच्चिदानंदनामें ।

गातां अतर्क्य रूपी ॥ धृ. ॥

देह हा सात वीती ।

ते मी ऎसीं प्रतीती ॥

नसोनियां विश्वकर्ता ।

दावी करूणामूर्ती ॥ १ ॥

देहात्म बुद्धि खोटी ।

नासोनियां कोटी कोटी ब्रह्मांड रचना हे ॥

दावी माझिये पोटीं ॥ २ ॥

संन्यासरुपें देवें ।

धरिलें वासुदेवे ॥

गुरुत्वें उद्धरींलें ।

तया देवाधिदेवें ॥ ३ ॥

ज्या मने आठवितों ।

मन तेंही तोची होतो ।

मी करूं काय आतां ।

माझे मीपणही तो ॥ ४ ॥

वामने बुद्धिदेही । देहाएवढी तेही ॥

स्वानंदसिंधु केली ।

जेथे दैव नुरे कांही ॥ ६ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel