ब्रह्माविष्णूहरादिक मानसी ध्याती मानसी ध्याती ।

सुरवर किन्नर नारद तुंबर कीर्तनी गाती ॥ १ ॥

जय जय आरती श्रीगुरुस्वामी समर्था, दयाळा स्वामी समर्था ।

कयावाचाजीवें भावें ओंवाळिन आतां ॥ धृ. ॥

अगम निगम शेष स्तवितां संपली मतीं।

स्तवितां संपली मतीं ॥

तो तूं आम्हां पूर्णकामा मानवां प्राप्ती ॥ २ ॥

सुरवर मुनिवर किन्नर देवा तुझे स्थापीले, देव तुझे स्थापीले ।

षड्‌दर्शननिमित्तगुमानिपंथ चालिले ॥ ३ ॥

अपरंपरा परात्परा पार न कळे, पार न कळे ।

पतीतप्राणी पदा लागुनी कल्याण झालें ॥ ४ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel