॥ श्रीगणेशाय नमः ॥
राजा म्हणे ऋषी अवतार जाण ॥ चंडिकेचे सांगितले आपण ॥ यांची प्रकृती तुम्ही ब्राह्मण सज्ञान ॥ सांगाया प्रधान योग्य आहां ॥१॥
म्यां देवी पूजावी कोण्या रीती ॥ कोण्या स्वरूपें ब्रह्ममूर्ती ॥ विधियुक्त सांगा मजप्रति ॥ मज शरआण्गताप्रती यथावत ॥२॥
ऋषी म्हणें हें परमहस्य ॥ सांगतों न सांगायाचें कोणास ॥ तूं भक्त यास्तव अवश्य ॥ राजा सर्वस्व तुजलागीं ॥३॥
महालक्ष्मी सर्वा आदि जाण ॥ परमेश्वरी जे कां त्रिगुण ॥ अलक्ष्यलक्ष्य स्वरूप आपण ॥ सर्वही व्यापून असे ते ॥४॥
मातुलिंग गदाढाल ॥ पानपात्र कांती सोज्वळ ॥ नागयोनी लिंगा अमळ ॥ शिरकमळीं प्रकाशे ॥५॥
प्रभा फांके तप्त सुवर्ण ॥ कांचनाचें आगीं भूषण ॥ अखिल शून्य आपुल्या जाण ॥ टाकी भरून तेजें तें ॥६॥
शून्य हे अवघे लोक ॥ परमेश्वरी पाहे सकळिक ॥ परमरूप धरी कौतुकें ॥ अति तमे देख अत्यद्भुत ॥७॥
ते चिरिल्या काजळा ऐसी जाण ॥ दाढा उज्ज्वल उत्कृष्ट वदन ॥ ते नारी विशाल लोचन ॥ कटी सान झाली ऐसी ॥८॥
खङ्गशिर ढालपात्र ॥ शोभायुक्त भुजा चार ॥ गळा शोभे कबंध हार ॥ सर्प थोर गळां तोही ॥९॥
ते बोले महालक्षीसी ॥ उत्तम स्त्रीते तामसी ॥ नामकर्म माते मजसी ॥ देईं तुजसी नमन माझें ॥१०॥
महालक्ष्मी बोले तियेसी ॥ दिव्य लोचना तामशीसी ॥ देईन मी तुज नामासी ॥ कर्तव्य जे कर्मासी असेल तेही ॥११॥
महामाया महाकाळी जाण ॥ महामारी क्षुधातृष्णा म्हणून ॥ निद्रातृषा एकवीरा हे खुण ॥ कालरात्रीदुरत्यया संपूर्ण हे नामें ॥१२॥
नाम हे कां तुझी देख ॥ ठेविलें असें कल्याणकारक ॥ कर्मावरूनि जो जाणें सम्यक ॥ जो उच्चरी भोगील सुख परम तो ॥१३॥
ते महालक्ष्मी ऐसें बोलून ॥ स्वरूप राजा उत्कृष्ट जाण ॥ अति शुद्ध सत्त्वें संपूर्ण ॥ चंद्रतेजासमान गुण धरिती झाली ॥१४॥
अक्षमाळा वज्रधारी ॥ वीणा पुस्तक अक्षयीं करीं ॥ ते झाली परम नारी ॥ नामेंही निर्धारी लक्ष्मी ठेवित ॥१५॥
महाविद्या महावाणी ॥ वाचा भारती सरस्वती म्हणूनी ॥ आद्याब्राह्मी महाधेनू अभिधानी ॥ वेदगर्भा बुद्धिदानी ठेवूनि नामें ॥१६॥
मग महालक्ष्मी झाली बोलती ॥ म्हणे हे कालीसरस्वती ॥ तुम्ही व्हावें पुत्रवंती ॥ दोघें दोघें निश्चिती आपुलाल्या ऐसें प्रसवा ॥१७॥
महालक्ष्मी ते ऐसें बोलून ॥ स्वयें उत्पन्न केलें एक मिथुन ॥ हिरण्यगर्भ सुंदर जाण ॥ स्त्रीपुरुष दोन कमलासनी ॥१८॥
ब्रह्मविधी विरंची धाता ऐसी ॥ नामें ठेविलीं तया पुरुषासी ॥ श्री पद्मा कमला लक्ष्मी ऐसी ॥ नामें त्या स्त्रीसी ठेविली ॥१९॥
महालक्ष्मी भारती आपण ॥ स्वयें उत्पन्न केलें एक मिथुन ॥ तयाचीं हीं रूपें जाण ॥ नामें सांगेन तुजलागीं ॥२०॥
नीलकंठ आरक्त बाहू सुंदर ॥ श्वेतमुख चंद्रशेखर ॥ प्रसवली पुरुषवर ॥ महाकाळी गौरस्त्रीसही ॥२१॥
रुद्र शंकर स्थानू म्हणून ॥ तो कपर्दी त्रिलोचन ॥ त्रयीं विद्या काम धेनू जाण ॥ शास्त्रीं भाषा नामें निर्माण क्षरास्वरा ॥२२॥
सरस्वती ही स्त्री गौरी ॥ राजा कृष्णपुरुष वैखरी ॥ उत्पन्न करिती झाली सुंदरी ॥ नामें बरी सांगेन त्याचीं ॥२३॥
कृष्णविष्णुहृषीकेश जाण ॥ वासुदेव आणि जनार्दन ॥ उमा गौरी सती चंडी म्हणून ॥ सुंदरी संपूर्ण सुभगा सुखा ॥२४॥
ऐसें तिनें पुरुषासी ॥ नामें ठेविलीं तयासी ॥ हे समज एक ज्ञानियासी ॥ नकळे इतरांसी अज्ञाना ॥२५॥
विद्यात्रयीं राजा ब्रह्मयासी जाण ॥ महालक्ष्मी करी पत्नी अर्पण ॥ महादेवासी गौरी देऊन ॥ वासुदेवार्पण करी श्री ते ॥२६॥
ब्रह्मयापत्नीसहवर्तमान ॥ अंड त्यानें केले निर्माण ॥ रुद्रानें टाकिलें फोडून ॥ गौरीसहित जाण पराक्रमी तो ॥२७॥
अंडामध्यें प्रधानाधिक ॥ करितां झाला राजा देख ॥ सर्व हें महाभूतात्मक ॥ जग सकळिक स्थावरजंगम ॥२८॥
तयाचें पालनपोषण ॥ लक्ष्मीसहित करी जनार्दन ॥ संहार करी तया ईशान ॥ गौरीहर जाण महेश ॥२९॥
महालक्ष्मी राजा भूपती ॥ सर्व लोकमयी ईश्वरी म्हणती ॥ पापपुण्याची नियंती ॥ सव लोकांप्रती स्वामिणी तो ॥३०॥
ते सकार आणि निर्विकार ॥ तेचि झाली नामें अपार ॥ नामाचा राजा हा प्रकार ॥ कोणासमोर न सांगावें ॥३१॥
देवीविजय कथारहस्य ॥ सुमेधा ऋषी सांगे सुरथास ॥ तेच कथा भागोरी ऋषीस ॥ ऋषी संतोषें सांगे मार्कंडेय ॥३२॥
नित्यानंदे वेडेवांकुडे ॥ श्रोत्यासी म्हणे केली बडबड ॥ क्षमा करावें बोलण्या बोबडें ॥ करावें काड बालकाचें ॥३३॥
श्रीदेवीविजय ग्रंथकथन ॥ केलें मार्कंडेयपुराणसंमताने ॥ झाला चतुर्दशाध्याय संपूर्ण ॥ तुला अर्पण जगदंबे असो ॥३४॥
इतिश्रीदेवीविजय ग्रंथ चतुर्दशाध्याय समाप्त ॥श्री॥श्री॥श्री॥
॥ श्रीदेवीविजय चतुर्दशाध्याय समाप्त ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.