सर्व देवींची पूजा करण्याची परंपरा आहे. परंतु महालक्ष्मी ही आदिशक्ती आहे व तिची पूजा प्रथम करावी. ही पूजा दररोज ज्यांना करणे जमत नसेल त्यांनी शरदऋतू म्हणजे अश्विन - कार्तिक या महिन्यात अवश्य करावी. चैत्र, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, पौष यामहिन्यांत पूजा केल्याने अधिक पुण्य लाभते. नवरात्र, शाकंभरी - देवी - उत्सव, गौरीपूजन, अन्नपूर्णादेवी - उत्सव अशा प्रसंगी श्रीदेवीविजय याचे पठन नियमित करावे.
देवीस अत्यंत आवडत्या वस्तू येणेप्रमाणे आहेत : - अर्ध्यदान, सुवासिक फुले, धूप, गंध, दीप, होम, बलिदान ( बलिदानाच्या परंपरेच्या पद्धती आता बदलत असून आता त्या ऐवजी प्रतिकृती करून कणिक किंवा इतर पदार्थांचे होमहवन करतात. ), ब्राह्मणभोजन, षोडशोपचारे पूजा जे नवरात्र उत्सव करतील व श्रीदेवीविजयाचे पठण, श्रवण करतील, त्यांना शस्त्रे, अग्नी व पाणी यांपासून जीवास धोका पोहोचत नाही. ललितापंचमी, दुर्गाष्टमी, महानवमी तसेच सरस्वतीपूजन ( षष्ठी ) या दिवशी जे पठण व श्रवण करतील, त्यांच्या घरी धनधान्यसमृद्धी, शांतता राहील व शत्रूभय, राजभय राहणार नाही. तसेच बालबाधा झाली असेल तर ती नाहीशी होईल. जे नियमित पूजा व श्रीदेवीविजयाचे श्रवण - पठण करतात, त्यांना देवी प्रसन्न होऊन, त्यांची सर्व मनोकामना पूर्ण होते. मात्र देवीविजयाचे अर्धवट पठण करू नये. पठण - श्रवण जमले नाही, पूजाविधी जमला नाही तर दोन्ही हात डोक्याशी जोडून देवीस मनःपूर्वक नमस्कार करावा व हात छातीशी जोडून देवीदर्शन घ्यावे. श्रीदेवीविजयाचे पठण स्त्रियाही करू शकतात. परंतु त्यांनी आपल्या पतीस शक्यतो श्रवणस्थानी आणावे. पति - पत्नींनी यथाविधी पूजा - पठण करावे, म्हणजे महापुण्य लाभते. नवरात्री याचे पठण खालीलप्रमाणे करावे :-
आश्विन शुद्ध प्रतिपदा : पहिला अध्याय, आश्विन शुद्ध द्वितीया : दुसरा अध्याय, आश्विन शुद्ध तृतीया : तिसरा अध्याय, आश्विन शुद्ध चतुर्थी : चौथा अध्याय, अश्विन शुद्ध पंचमी : पाचवा व सहावा अध्याय, आश्विन शुद्ध षष्ठी : सातवा व आठवा अध्याय, आश्विन शुद्ध सप्तमी : नववा व दहावा अध्याय, आश्विन शुद्ध अष्टमी : अकरावा, बारावा व तेरावा अध्याय, आश्विन शुद्ध नवमी : चौदावा, पंधरावा व सोळावा अध्याय व देवीस्तवन करावे. शाकंभरी नवरात्रात दुर्गाष्टमी व चतुर्दशी व नवव्या दिवशी जो पठण - श्रवण करेल, तो सर्व विपत्ती, बाधा, भीती वगैरेंपासून दूर राहून, तो भोगसंपन्न व सुखी पुण्यात्मा होईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel