विषय छंद पण दरवळो सर्वत्र सुगंध...
ह्या लाँक-डाऊन च्या सुमारास मनाच्या तीजोरीला व बुद्धीच्या कौशल्यतेला ही लागत असलेल्या वैचारीक लाँकडाऊन पासन स्वत:च्या बचावासाठी छंदांकडे मन वळवण प्रभावकारी योग्य माध्यम आहे अस मलाही वाटलं.
विचारांना शब्दबद्ध करण्याचा नाद व त्यातुन मनाला मिळणारा डोक्याचा साद ज्यातुन एकच विचार चकाकला की का केवळ मन-रंगमंचावरच हे वैचारीक वातावरण निर्माण करायच, कुपमंडुक न होता अवकाशमयी जगापुढे आपल्याही विचारांची पणती प्रज्वलीत करून पहावी व सातत्याच्या प्रयत्नमयी इंधनातुन तीला प्रज्वलित ठेवाव..
याच हेतुतुन हा उपक्रम मनाला पटतोय..
पण लेखणकर्ता केवळ शब्दांची गुंफण करतो तीला अमुल्यता ही वाचणकर्त्याकडणच मिळतं असते..
म्हणुन निर्णय वाचणकर्त्यांवरच.....
थोडक्यात...
ज्ञानेद्रियांमार्फत मिळणाऱ्या सहजगत्या अनुभवांना बुद्धीची समंजस साथ मिळाली की विनोद, विडंबना, शोकांतीका असे अनेक भाव उद्भवतात ज्यातुन कल्पनेची नव दृष्टी अनुभव अवकाशात उंचावते, हा भाव प्रस्तुत लेखणातुन एक नवोदित लेखणप्रेमी आपल्यापुढे सादर करतेया..
धन्यवाद..
अपेक्षा ज्ञानेश्वर कोठे...