आयुष्याचा कराटे.........

सप्टेंबरचा बुधवारचा दिवस ,घरी महालक्ष्मी साठी आवराआवर व सर्वत्र स्वच्छता सुरू होती खुप कामात गुंतलेली होती,तेवढ्यातच  एक सिल्वर मेडल हाती आलं पाहताच क्षणी त्वचेवर शहारे उभे झालेत Lower jaw and ankle मध्ये एवढ्या जोरात दु:खल की त्या किक च्या स्पर्षाची तीव्रता आजही ताजी वाटते, क्षणाची आठवन मोटोर न्युराँन नी जणु ब्रेन ला  करवुन दिली  .

आठवी  मध्ये विद़्यार्थ्यांना नवीन उपक्रमाची ओळख म्हणुन शाळेमध्ये कराटे आणि योगासनाच प्रशिक्षण सुरू करण्यात आल ज्यात एका महिन्यानंतर जास्त विद़्यार्थी असणार ते पुढे राबवले जाणार होते.कराटे शिकवण्यासाठी आणले गेलेले गणवेश,गार्ड वगैरे वगैरे त्यांनी आमच आकर्षण वेधलं आम्ही कराटे मध्ये नाव नोंदवल आणि आगळ्या वेगळ्या प्रशिक्षणाची सुरूवात झाली .बापरे खुप मजा येऊ लागली आणि आणखी रस निर्माण व्हावा म्हणुन त्यांच्या संस्थेने 30 दिवसांमध्ये आंतरशालेय स्पर्धांच आयोजन करण्यात आल होत .म्हणजे आमच्यापुढे उद्देश्श होता ,रोज मैदानात धावताना व त्यानंतर प्रशिक्षणाच्या वेळेस पण खुप मजा यायची .वेगवेगळे दाव सर शिकवायचे ते खुप बेसीक होते मात्र आमच्यासारख्या नव-शिक्यांना ते ही अवाढव्य वाटायचे आणि आता महत्ताचा विषय म्हणजे सर जे शिकवायचे ते उत्कृष्ट नाही मात्र तेवढ्या जमावात मला जमु  लागलं सर मला प्रोत्साहीत करू लागले आणि या खेळाबद्दल मला बाकी काही माहीती नव्हतं म्हणजे पुर्णत्वाने कुपमंडुकाची मी भुमीका घेतली .ज्याला आपल्या सभोवतालच जग म्हणजेच सर्वोतपरी वाटु लागलं .आणि आपल्या जगात आपण श्रेष्ट आहोत हा भाव त्या लहानग्या अपेक्षाला आणखीनच आनंदी करू लागल.मग सराचे बेसीक दाव मला सर्वश्रेष्ट वाटु लागले जे मला जमायचे.आमच्या ग्रुप मधली रूकसार बाजुला बसुन जायची ती कधीच सराव करत नव्हती .ती केवळ औपचारीकता म्हणुन यायची खुप मुलींनी तर ते त्रासुन सोडुन देखील दिल मात्र रूकसार नियमीततेने यायची मी तीला म्हणायची तु तुझा वेळ कशाला घालवते ती काहीच उत्तर नाही करायची.अखेरीस आमच्या स्पर्धेचा दिवस आला .ईश्वर देशमुख च्या सभागृहात आयोजीत केलं होतं . तीथे पोहोचण्याच्या आधीपर्यंत खुप जबरदस्त आत्मविश्वास उराशी होताच मग त्या भव्य आयोजनाला पाहुन अजुन अती आत्मविश्वास बळावला की आज येथे काही तर चमत्कार आपण करूनच जाऊ.मग मला जरा वास्तव्याशी संपर्क येणार तीथल्या सर्व जमावाला पाहुन पण मी डोळे बंद केले आणि स्वत:ला जींकलेल कल्पना करू लागली,आणि माझ्या विचारांनी  सीमा तर तेव्हा ओलांडली जेव्हा माझा पहीला सामना झाला आणि मी सील्वर जींकला माझ्यासारखीच नवशिकी होती ती.आता तर अपेक्षा कोठे वर गुरूत्वाकर्षणाचा कुठलाच सिद्धांत लागत नव्हता .नंतरच्या सामन्याच्या आधिच मी तर गोल्ड मेडलवर अधिपत्य मिळवुन टाकलं होतं .आणि वाटलेली थोडीसी भिती देखील पुर्णपणे नाहीशी झाली आणि एक वेगळा विश्वास तर बळावलाच होता .अतीआत्मविश्वास म्हटला तरी चालेल.अश्या सगळ्या वातावरणात प्रालब्धाची नजर माझ्याकडे ओढली गेली आणि तो हुशाऱ माझ्या फजीती करण्याची योजना आखु लागला.

माझा सामना सुरू झाला माझी नजर तीच्या ब्लँक बेल्ट वर पडली तरीही अस वाटलं की बस्स पाहुन घेईन हिला..मग रेडी झाली दोघींना पुढे उभे ठेवलं आणि सुरू करताच तीन्हे एवढी भयानक फ्रन्ट किक मारली अगदी lower jaw पासनं तर अगदी upper head  पर्यंत त्याची तीव्रता मला जाणवली पुर्ण शुद्ध हरवली ज्यात अती आणि आत्मविश्वास वेगळा झाला त्यानंतर तीच्या नंतरच्या सतत आघाताने आत्मविश्वासाचा पण विध्वंस केला त्या मुलीने आणि गुरूत्वाकर्षणाने देखील अगदी वेगाने खाली ओढल मी साध तीला ब्लाँक पण नव्हतं करता येत पुर्ण सर्कशीतील विदुषक बनले होते,धाडस बांधुन पाय उचलत होते तर ती ब्लाँक करत होती आणि तीच्या कठोर हाताने सुद्धा माझ्या जीव नकोसा होत होता .म्हणजे अगदी दोन मिनीटात तीन्हे मला वास्तव्यात आणलं.तोंड दाबुन बुक्क्याच्या मार अशी अवस्था माझी झाली.

आणि सील्वर देखील मला आता नकोसा वाटला .आणखी नरकयातना तर तेव्हा झाल्यात जेव्हा माहीती पडलं की रुकसारच्या weight category  मध्ये कुणीच मिळाल नाही म्हणुन ती गोल्ड जींकुन district  स्तरावर पोहोचली होती .दादा सबोत घर गाठल.मला front kick  मुळे बोलण्याला त्रास होत होता,आणि ankle  सुद्धा पुर्णपणे सुजले होते .घरचे सगळे हसत होते .

आपल्या त्वचेच्या अनुभवलेल्या त्रासात मला आता पुर्ण प्रकार ध्यानात येऊ लागला ,आयुष्यात अती - आत्मविश्वाची शिक्षा स्वत: प्रालब्ध देतो .मी केवळ कुपमंडुक भुमीकेमुळे त्या खेेळाच्या स्पर्धेबद्दल अंधत्व स्विकारलं होतं ज्याची अद्दल मला अगदी हफ्ताभर घडली.त्या त्रासाची आठवण होताच त्या अनुभवाच महत्व मला आज कळतय कधीच जगाच्या पाठीवर श्रेष्टत्वाला आसपास भटकु द़्यायच नाही पालब्ध अगदी डोळे टिकवुनच असतो ज्याची भयानक शिक्षा तो आपल्याला देतो.आणि ज्याला बाकी सर्व हिणवतात पण त्याच्यातील सातत्य पाहुन चमत्कृतपणे त्याला विजयी करून इतरांच्या नजरेत आणतो (रूकसार ला विजयी केल) .आणि ज्याने अती-आत्मविश्वास दाखवला त्याला काय करतो हे आठवल की जीव आजही नकोसा होतो,कारण आमच्यातील कुणालाच एवढ नव्हत लागलं जेवढ मला खरच सगळ योजनात्मक वाटलं.आमच्या प्रशिक्षणकर्त्यांनी देखील माझ्यातील त्या विचीत्र उत्साहाला प्रोत्साहन देण्याचं काम केलं ज्या बाबतीत मला आजही फाजील झाल्यासारख वाटतं .

तो कराटे खरच आयुष्याचा कराटे ठरला जो मला ज्ञान देऊन गेला की शिकण्याची आवड,सातत्य ,पयत्न पाहुन आयुष्य तुम्हाला यशाचं बक्षीस  देत मात्र  तुम्ही त्याच आयुष्यापुढे  मुर्खासारखं अती-आत्मविश्वासाचा प्रदर्षण केल तर तो सुद्धा आपल्या सबोत कराटेचे भयानक दाव पेच खेळतो आणि अगदी आपल्याला जगाच ज्ञान करवुन देतो...

आईने जोरात आवाज दिला व त्या प्रसंगाच्या भरात सुटकेस मध्ये माझा हात फसला  आई ग ...खरच आयुष्यातला हा प्रसंग परत परत जमिनीवर ऱाहण्यास मनरंगमंचावर मोठ्याने ओरडुन सांगतो....

धन्यवाद...........!

अपेक्षा कोठे (Ad)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel