भुकेची चव.......
सप्टेंबरचा गुरूवार चा दिवस ,आईचा पुजेचा दिवस घर अगदी प्रसन्नचीत्त होत मी सुद्धा छान पैकी वांग्याचा भाजीचा आस्वाद घेतला त्यानंतर आईने केलेला साबुदाणा वाईट मानु नये म्हणुन फक्त मी तोही खाल्ला (अधाशीपणा) .आता पोट तंबुन भरल,आता अगदी आरामाची वेळ .तेवढ्यातच शेजारच्या आंटी आल्यात त्यांना औषध हव्या होत्या ज्या राधा कृष्ण हास्पीटलच्या फार्मसीमधनं आणायच्या होत्या .माझ्या खाद़्यावर ते काम आलं मी सुद्धा आईच्या म्हणण्याने निघाली .फार्मसीत जाताना मला दिसलं की माझा रेग्युलर आलु चाट.चा स्टाँल आज तीन दिवसानी लागलेला आहे जठर पुर्णपणे भरलेल असताना सुद्धा जीभेवरचे रूची-कलिका(taste bud) उत्तेजीत झाल्यात.मात्र फार्मशीत गेली ओषधी घेतल्या ,त्या जीभेवरच्या रूची-कलिका मला गाडी पुढे घेऊन जाण्यास सहमती देत नव्हत्या मग जिभेवरच्या त्या सुक्ष्म कलिकांनी माझ्यावर पुर्ण ताबा मिळवला आणि मी मोठ्या मनाने हाफ प्लेट खाण्याचा निर्धार करताच माझ्या पोटाला जणु वाचा फुटली आणि तो जीभेला म्हणाला " पहा ग बाई तुझ्यासाठी कराव लागतं नाही तर काय परवडतं ".मी थांबले स्टाँल जवळ आणि आर्डर दिला व त्या अंकल शी बोलत बसले,तेवढ्यातच बाजुच्या कारच्या शोरूम जवळ मोठी कार थांबली त्यातुन कुटुंब बाहेर पडल आणि आत शोरूम मध्ये प्रवेश केला त्यांतील एका छोट्यास्या मुलाच्या हातात असलेला समोस्याचा डब्बा खाली पडला ,त्याच्या आईने त्याला ते राहु देत आत येण्याचा इशारा केला तेथील गार्ड नी ते सर्व समोसे त्या डब्यात उचलुन बाजुच्या डस्टबीन मध्ये टाकलं माझी नजर या संपुर्ण घटनेवर होतचं एकाएक मला जाण आली की आणखी एक नजर होती जी माझ्याप्रमाणेच या घटनेला अगदी बारकाईने पाहत होती तीच्या त्या केवीलवाण्या नजरेने माझी नजर आकर्षीली आणि तेव्हाच गार्ड ची नजर नाही हे धान्यात घेता ती डस्टबीन जवळ गेली आणि बस्स तो डब्बा बाहेर काढणार तेच त्या गार्ड ची नजर पडली त्याने त्या चिमुकली वर यथाशक्ती आपल्या हातातील दंड्याने प्रहार केला,हा प्रसंग आपल्यासाठी नविन नाही पण तरीही तीच्या तोंडातुन निघालेली किंकाळी माझ्या अंगावर शहारे आणणारी होतीच .तीन्हे रस्ता ओलांडला आणि ओक्साबोक्शी ती रडु लागली तीच्या अख्ख्या शरिरबांध्यावरून नजर फिरवताच खरच शोकांतीका म्हनुन माझ्यातला कवी जागला ------> "कुपोषिततेने झाल होत त्या चिमुकलीच क्षरण,व बालपणाच होत होतं कण्हत कण्हत मरण ,समाजाचा तिरस्कार देत होता तीला शिक्षा ,का प्रालब्धही पाहत होता तीची परिक्षा....??" तीच्यावर नजर स्थिर करून ठेवत विचारात गुंतलेली असताना एकाएक तिच्या चेहऱ्यावरील भाव पुर्णत्वाने बदलले होते ,हातावर चे व्रण ताजे असताना डोळ्यातले अश्रु पुर्ण सोखले गेले होते तीच्यात मला आता बंड पुकारण्याचे भाव दिसले ती आता काय त्या गार्ड शी भांडेल ? या उत्सुकतेेपोटी मी अगदी स्तब्ध होते मात्र ती इतक्या चपळतेने पुढे सरसावली व क्षणार्धात तीन्हे अख्खा समोसाच्या डब्बा मिळवुन धुम ठोकली व अगदी मीस्टर इंडीया सारखी गायब झाली सबोतच गार्ड व तेथील जमावाला हसण्याला विषय देऊन गेली .त्याच क्षणी हातात चवीष्ट आलु चाट आली पहिलाच घास मुखात घेतात आलु चाट ची नाही तर त्या चिमुकलेच्या भुकेची चव रूची कलिकांना झाली व डोळ्यातील भावनेच्या नदीवरचा बांध हल्का सा कमकुवत झाला आजुबाजुचे संशयात्मक नजरेने पाहुन वेड्यात काढेल या भितीने म्हणाली "अंकल आज बहोत तीखी है आलु चाट.....!"
घरी आल्यानंतर वैचारीक गांभीर्याची भुमीका घेतली,माझ्या विचारात तीच्या प्रती सहानुभुती न येऊ देण्याचा आदेश मी विचारांना केला,अहो आपण मनुष्य प्राणी कुणालाही न मिळालेल बुद्धीचं चमत्कार आपल्याकडे आहेच त्याच बुद्धीमध्ये भविष्याच्या पुर्वसुचनेनुसार योजना आखण्याच कार्यात्मक कार्यालय आपल्याला मिळालेल आहे माझा प्रश्न समाजातील प्रत्येक आई -वडीलांना आहे की काय तुम्ही स्व बुद्धीच्या या कार्यालयात एक सेकंद घालवुन नवीन जीवाच्या भविष्याची पुर्वसुचना घेऊन पुर्वतयारी करत नाही काय? अहो जर मायेची माऊली पित्याची सावली देण्याची क्षमता नाही तर का एका निरागस जीवाला जगण्याच शाप द़्यायचं? अहो निसर्गातले अबोल पक्षी देखील घरट्याशिवाय अंडे देत नाहीत मग काय आपण त्या पक्ष्यापेक्षाही भावना शुन्य आहोत ......!माझ्याच विचारांनी मी च हादरले आणि या समाजाचा भाग असण्यावर फाजील होऊ लागली...! आई म्हणाली अपु आज सकाळ नंतर काही खाल्लच नाही ग तु नाही तर घरी असल्यावर सतत काहीतरी खायला हव असतं ,आईच्या आवाजाने चेहऱ्यावर स्मीत हास्य आलं आणि आलेल्या अनुभवाच्या गांभीर्याची चटक रूची कलिकांना अगदी तीव्रतेन्हे जाणवु लागली......!
धन्यवाद