बाबा राजन ला कोरोना झाला आहे. हॉस्पिटल मध्ये आहे तो. संजय भीतभितच माधव रावांना बोलला. मग काय करायचे सव्हताच्या आई बापाला दुखवून पळून जावून लग्न केले की असच होणार. देव् बघत असतो सगळ. अहो आपला जावई आहे तो आपली लेक त्याची बायको आहे हे ही विसरलात का? शोभा म्हणाली. ज्या दिवशी रसिका पळून गेली तेव्हाच तिच्याशी असलेल नात पण संपले आहे या विषयावर आता बोलने नको म्हणत माधवराव निघुन गेले. संजय रसिका आणि ओवी कशा आहेत रे? आई आता दोघीची टेस्ट करायला हवी बघू काय होते. सात वर्ष झाली पण यांनी काही रसिकाला माफ केले नाही बघ. पण आई रसिका ने पळून जावून का लग्न केले याचा विचार तरी करा म्हणा बाबा ना कधीतरी नुसत आपले हुकुमशहा सारखे वागत आले आयुष्यभर मुलांना काय आवडते ,त्यांचे मत काय याचा त्यांनी कधीच विचार केला नाही बस्स मी म्हणेन तस सगळ्यांनी वागायचे .रसिका ने प्रेम केले म्हणून लग्न केले आणि राजन ही चांगलाच आहे तरी यांना त्याचा राग. माझ्या शब्दा बाहेर पोरगी गेलीच कशी? मानुसकी तरी आहे की नाही यांच्या कड़े. संजय तू शान्त हो तू आहेस ना रसिका सोबत मग झाल तर. दुसऱ्या दिवशी रसिका आणि छोटी ओवी ची कोरोना टेस्ट झाली तर रासिका पॉझिटिव्ह निघाली मात्र ओवी निगेटिव! दादा ओवी ला कोण सांभाळनार आता? ताई तुम्ही नका काळजी करू मी ओवी ला घरी घेवून जाते संजय ची बायको रीमा म्हणाली. पण वाहिनी बाबांना नाही आवडनार. ताई आता कोणाला का्य आवडत काय नाही याचा विचार करण्याची ही वेळ नाही. मग ओवी च सगळ सामान घेवून संजय आणि रीमा घरी आले. राजन आणि रसिका घरीच कॉर्नटाइन झाले. ओवी ला बाबा नी अजुन बघितले नव्हते सहा वर्षाची होती ती. फ़क्त आई संजय आणि रीमा  रसिका ला भेटत होते ही गोष्ट माधव रावाना माहित होती पन बोलत काही नव्हते.  ही कोणाची पोर ? बाबांनी ओवी ला आपल्या घरात बघून विचारले. बाबा ही रसिका ताईची मूलगी तुमची नात. रीमा म्हणाली. ही इथे काय करते? बाबा रसिकाला सुद्धा कोरोना झाला आहे म्हणून ओवी ला इकडे घेवून आलो संजय बोलला. ओवी हे तुझे आजोबा आहेत बर का. रीमा बोलली. तशी ओवी आजोबा कड़े जावून म्हणाली हैंलो आजोबा पण माधवराव दुर्लक्ष करत निघुन गेले. रीमा रोज सकाळी संजय सोबत नाष्टा आणि जेवन गरम पाणी सगळ काही राजन रसिका ला पाठवत होती. कधी संजय सोबत स्वहता ही जात होती . ओवी ला लांबुन तिला दाखवून आनायची. बाबा ना हे समजले तसे ते भड़कले . काही गरज नाही बोलले त्यांना मदत करायची. तसे रीमा म्हणाली बाबा रसिका ताई माझ्या किंवा या घरच्या कोणी लागतात म्हणून मी त्यांना मदत करत नाही तर माझ्या कड़े मानुसकी आहे म्हणून. बाबा अहो बाहेर बघा जरा कोरोना ने किती तरी जनाचे बळी घेतले. आज भेटनारा मानुस उद्या जिवंत असेलच याची शाश्वती नाही. मी ,माझ, पैसा, घर,संपत्ति,जमीन जुमला अहंकार कशालाच काही मोल नाही आज या आजारा समोर. मी मी म्हणनारे करोडो ने कमवनारे सुद्धा आज एकाच रुग्णालयात गरीब श्रीमंता सोबत उपचार घेत आहेत. कोरोना ने नाती जवळ आणली आपल कोन परक कोन याची जाणीव करून दिली. बाबा आहे त्या आपल्या जवळच्यां माणसांना आज जपायची  त्याची काळजी घ्यायची ही वेळ आहे. मी ताई ना मदत करणार भले या साठी तुम्ही जी शिक्षा मला द्याल ती मला मान्य आहे.  रीमाने बाबांच्या डोळयात झंणझणीत अंजन घातले. ओवी ख़ुप गोड होती संजय च्या मुला सोबत छान रमली. आजी आजोबा ना ही 15 दिवसात तिचा लळा लागला. लहान मुलां पासून माणुस जास्त काळ अलिप्त राहु शकत नाही हेच खरे कारण ओवी मुळे बाबा हळूहळू बदलत चालले होते. पूर्ण एक महिन्यांनी राजन आणि रसिका व्यवस्थित बरे झाले. हे सगळ संजय आणि रीमा मुळे झाले. रसिका म्हणाली वाहिनी तुझ्या मुळे मी आणि राजन सुखरूप या कोरोना तुन बाहेर आलो तू मोलाची मदत केलीस. ताई मी फ़क्त माझ कर्तव्य पूर्ण केले. वाहिनी तुझ्या सारखी सुन घरोघरी असेल तर प्रत्येक घरात नंनंदनवन फुलेल. बास ताई माझ ख़ुप झाल कौतुक आता पटकन घरी चला. आई बाबा वाट बघत आहेत. काय सांगतेस वाहिनी बाबा माझी वाट बघत आहेत? हो ताई बाबा बदलले आहेत आता. हा चमत्कार तुझ्या ओवी ने आणि माझ्या बायको ने केला बर का. संजय म्हणाला. हो का दादा मग आहेच माझी वाहिनी गुणाची! सगळेजन मग घरी आले. आई ने राजन रसिका चे औक्षण केले. हसत त्यांचे स्वागत केले. आज इतक्या वर्षानी आपल्या लेकीला बघून बाबांच्यां डोळयात अश्रु जमा झाले. बाबा म्हणत रसिका त्यांच्या गळ्यात पडली. आज कोरोना ने एक तूटलेले घर पुन्हा जुळवले.

समाप्त  

संगीता देवकर.प्रिंट &मीडिया रायटर पुणे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel