"प्रेम म्हणजे प्रेम असत,
तुमच आणि आमच अगदी सेम अस्त.

या कविते मधून मंगेश पाड़गांवकरांनी प्रेमाची भावना व्यक्त केली आहे. आपण कोणावर तरी प्रेम करतो हे सांगण्यासाठी एखाद्या विशिष्ठ दिवस असावा असे नाही.प्रेम ही भावना उपजत असते. ती एकमेकांच्या हृदया पर्यन्त नकळत् पोहचत् असते. परंतु आजच्या धकाधकी च्या जीवनात आपण एकमेकांना पुरेसा वेळ नाही देवू शकत. तेव्हा आपल्या प्रिय व्यक्ति वरील प्रेम सेलिब्रेट करण्या साठी "वेलेंनटाइन डे" सारखा एखाद्या दिवस असला तर काय बिघडले? पण आपल्या सेलिब्रेशन मुळे इतरांना त्रास होऊ नये याची जरूर काळजी घ्यावी. आपले सेलिब्रेशन आपल्या पुरतेच मर्यादित असावे..     

प्रेम ही एक सुंदर भावना आहे. मग ते प्रेम आई मुले,भाऊ,बहिन ,मित्र मैत्रिण,पति पत्नी यांच्या पैकी कोणाचे ही असू दे,प्रेम हे प्रेमच असते. याची ठराविक व्याख्या नाही करता येत. एखाद्या व्यक्ति बद्दल वाटणारी ओढ़,आपुलकी,माया,ममता,काळजी याला प्रेम म्हणतात. पण आज आजुबाजुला पाहिले की असे  आढळते की यालाच प्रेम म्हणतात का,असा प्रश्न पडतो!! कॉलेज,शाळेला जाणाऱ्या मुलिंना वाटेत् आडवणे,तू मला आवडतेस ,माझे तुझ्यावर प्रेम आहे,अशी फ़िल्मी वाक्य ऐकवणे,येता जाता मुलींची छेड़ काढ़ने आणि तिने नकार दिला तर त्या मुलीला जीवे मारणे,भररसत्यात तिच्या वर अतिप्रसंग करने,खरच याला प्रेम म्हणता येईल?.ही निव्वळ विकृती आहे. सिनेमा,इंटरनेट,टीव्ही, या माध्यमा तुन जे प्रेमाचे अव्यावहारिक,विकृत ,असभ्य चित्रण दाखवले जाते त्याचेच अनुकरण आजची पीढ़ी करते आहे. लाडात् वाढलेल्या मुलांना जे हवे ते लहान पणा पासूनच देत रहाणे,नकार पचवन्याची सोशिकता नसणे ,याचाच हा परिणाम दिसून येतो. प्रेम करण्या बद्दल कोणाचीच आडकाठी नसते,प्रेमाच्या विरोधात ही कोणी नसते पण ते प्रेम समजस,विचारी आणि प्रामाणिक पणे केलेले असावे. प्रेम ही एक नितांत सूंदर भावना आहे. एकमेकां बद्दल वाटणारा विश्वास आहे. प्रसंगी दुसऱ्याचा ही होउंन जाणारा एक सुंदर अविष्कार आहे. प्रेम म्हणजे शब्दा मध्ये व् मनामध्ये गुंफलेला मोती आहे. या प्रेमाला कधी ही विकृत बनवू  नका. जबरदस्तीने कोणाचे प्रेम मिळवता येत नाही,ती हृदयातुन येणारी उत्स्फूर्त भावना आहे.    

" वेलेंटाइन डे" म्हणजे निव्वळ प्रियकर आणि प्रेयसी  यांच्या मधले प्रेम व्यक्त करण्या चा दिवस ही संकल्पना आता बदलली आहे. आपल्या प्रिय व्यक्ति बद्दलच्या भावना व्यक्त करण्या साठी हा दिवस साजरा केला जातो. मग ती व्यक्ति आई,बाबा,भाऊ,बहिन,असो किवा जवळ चा मित्र किवा मैत्रिण!! शेवटी प्रेम म्हणजे नेमके काय ? तर किती ही जवळ जाणार असाल तरी गाड़ी सावकाश  चालव आणि पोहचल्या वर फोन कर ,असे आई चे काळजीचे बोल म्हणजे प्रेम! दिवाळी ला स्व्:ता साठी साधे कपड़े न् घेता मुलांच्या पसंतीचे महागातले कपड़े  घेणारे वडील ,,म्हणजे प्रेम,,! किती ही मस्ती केली,व् रात्री उशीर झाला तरी,आई बाबांना न् सांगता दार उघड़णारे आजी आजोबा म्हणजे प्रेम,,,कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का ? अशी विचारणारी बहिन म्हणजे प्रेम,,,,! पगार कितीही कमी असला तरी भाऊबीजेला बहिनी च्या पसंती चे घडयाळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम,,,आणि या सर्वांची काळजी घेऊन स्व:ताची काळजी न् करता सकाळी लवकर उठून जेवनाचा डबा बनवणारी बायको म्हणजेच प्रेम,,!!!शब्दातुन जे व्यक्त होत नाही ते प्रेम असते. प्रेम ही एक गोड भावना आहे. एकमेकांवरील विश्वास जपन्याचा ,वाढवन्याचा एखाद्या दिवस "वेलेंटाइन डे" म्हणून साजरा करूया. दुसऱ्या चे मन न् दुखवता एकमेकांना जपुया. हाच तर वेलेंटाइन चा संदेश आहे. एकमेकातील नाती प्रेमाच्या धाग्याने घट्ट बांधून ठेवुयात आणि ओठांवर येऊ दया,,""हा यही प्यार है,!!!,

संगीता देवकर,प्रिंट &मीडिया रायटर, पुणे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel