जॅक द स्ट्रिपरचं नाव जॅक रिपर सारखं वाटलं तरी, ते दोन वेगवेगळे खुनी आहेत. दोघांची खुन करायची पद्धत साधारण सारखीच होती. जॅक द स्ट्रिपरची केस हॅमरमॅन मर्डर किंवा हॅमरमॅन न्यूडस् केस सारखी होती. जॅक रिपर सारखंच जॅक द स्ट्रिपरचा निशाणा देहविक्री करणाऱ्या बायका होत्या. त्याने १९६४ ते १९६५ या आवघ्या एक वर्षाच्या कालावधीत आठ खून केले. या सगळ्या मेलेल्या व्यक्तीची शवे लंडनच्या थेम्स नदीमध्ये टाकली होती. ते मृतदेह अखंड लंडनमध्ये थेम्सच्या किनाऱ्यावर येऊन आदळले होते.
जॅक द रिपरच्या केस प्रमाणेच ह्याच्या केसमध्ये शंकेची सुई एका माणसावर गेली होती. जॅक द स्ट्रिपरच्या केसमध्ये एक पुरावा मिळाला ज्यातून असे कळले कि, मृतदेहांवर लागलेला रंग कोणत्यातरी एका गाड्या बनवणाऱ्या कंपनीच्या आवारातला होता. नुसतेच पुरावे गोळा झाल्यावर या केसमध्ये कोणालाही अटक झाली नाही कारण कोणी सापडलेच नाही. पोलिसांनी एक अंदाज असाही बांधला कि या खून मागे त्या कंपनीच्या स्कॉटीश वॉचमन मुन्गो आयर्लंड याचा हट असेल. मुन्गोलं पोलिसांच्या हाती लागलेल्या पुराव्याची खबर मिळताच त्याने कार्बन मोनॉक्साईड असलेले विष पिऊन आत्महत्या केली. सगळ्यात महत्वाचा पुरावा पोलिसांच्या हातही लागला होता ज्याने आयर्लंडचा या केस मधील सक्रीय सहभाग कोणाचा आहे ते दर्शवले होते.
त्याने आपल्या बायकोला एक चिट्ठी लिहिली होती. “ प्रिय पत्नी मी यात अजून सहभागी होऊ शकत नाही आहे मला सहन होण्यासारखे नाही.” त्यात त्याने पुढे लिहिले होते, “हे सारे मी तुला वाचवण्यासाठी करत आहे. पोलीस मलाच शोधात येतील मी तेंव्हा आपल्या गॅरेजमध्ये असेन.” असेही लिहिले होते. ही चिठ्ठी या प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा पुरावा असली तरी, इतर पुराव्यांवरून असे दिसून येते की जेव्हा स्ट्रिपरने खून केले तेव्हा तो आयर्लंड शहराबाहेर होता. त्यामुळे कदाचित हे त्याने केलेलेच नसतील असा अंदाज पोलिसांनी लावला. त्याची बायको पोलिसांच्या शंकेच्या चक्रव्युहात अडकली असती, पण तिचा पत्ताच लागला नाही. त्यामुळे या केस मध्ये कोणालाही शिक्षा झाली नाही.