ज्युली वॉर्ड २८ वर्षीय तरुणी होती. ती एक वन्यजीव फोटोग्राफर होती. ती एकटीच फोटोग्राफीसाठी मसाई मारा या वन्यजीव संवर्धन राष्ट्रीय उद्यानात गेली होती. हे उद्यान केनियामध्ये होते. तिचा मृतदेह ती बेपत्ता झाल्याच्या आठवडाभरानंतर जळलेल्या अवस्थेत आढळून आला. तिच्या शरीराचे भाग विखुरले गेले होते. केनियाच्या अधिकाऱ्यांच्यानुसार ज्युलीवर वीज पडली असावी आणि कदाचित कोणा जंगली श्वापदाने लचके तोडले असावेत.

तथापि, तिचे वडील हे स्पष्टीकरण स्वीकारण्यास तयार नव्हते आणि त्यांनी आपल्या परीने शोध व तपास चालू केला. ज्युलीचे वडील उत्तर शोधत असताना त्यांच्या हाती एक माहिती आली. हे उघड झाले की, त्याच्या मुलीच्या शरीराबद्दलचा शवविच्छेदनाचा अहवाल बदलला गेला होता. अहवालात असे दिसून आले आहे की, तिच्या हाडांवर कुरतडल्या गेल्याच्या खुणा आहेत त्या खरतर कुणीतरी धारदार शस्त्राने कापल्याच्या खुणा आहेत. यावरून हे सिद्ध होते कि, तिला जंगली श्वापदाने नाही तर माणसातल्या श्वापदाने मारले आहे. ज्युलीचे वडील जॉन यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दलचे रहस्य शोधण्यासाठी तब्बल दोन लाख डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केला. अधिक माहिती शोधण्याच्या प्रयत्नात आणि केनियाला किमान शंभर वेळा तरी भेट दिली असेल.

आजपर्यंत, ज्युली वार्डच्या हत्येसंदर्भात फक्त दोनच खटले चालले आहेत. दोन खटल्यांपैकी पहिले दोन खटले १९९२ साली घेण्यात आले होते. यामध्ये त्या राष्ट्रीय उद्यानाच्या दोन पार्क रेंजर्सवर हत्येसाठी खटला चालविला गेला. कसे ते माहिती नाही परंतु, ते दोघेही या खटल्यातून निर्दोष मुक्त झाले. १९९८ मध्ये दुसरा खटला त्या उद्यानाच्या हेड पार्क वॉर्डनवर चालविण्यात आलं होता. 

या घडलेल्या प्रकारानंतर जॉनचा असा विश्वास बसला की, केनियाच्या सरकारने त्याच्या मुलीच्या मृत्यूची केस दाबण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हे सारे खटाटोप केनिया सरकारने केवळ त्यांच्या पर्यटन उद्योगावर त्याचा परिणाम होण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नात केले होते. बरीच तपासणी करूनही, ज्युली वार्डच्या हत्येचे प्रकरण कधीच सुटलेले नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel