वरण्यासाठी मला....
धन्यानं माझ्या, जीवाचं रान केलं.
रात्रंदिवस यानं सपान, फक्त माझंच पाहिलं.
माझ्यासाठी धन्यानं काय नाय केलं.
माना मोडल्या, गळे कापले, जवळच्यांना दूर लोटले.
तेव्हा कुठे घरात याच्या, बाळसे मी धरले.
माझ्यासाठी धन्यानं काय नाय केलं.
राब राब राबला, खप खप खपला.
तेव्हा कुठं हात धरून माझा,ईमला यानं बांधला.
घमेंड माझी होती याला, दिवस आणि रात.
रक्ताचे सुद्धा म्हणून, नुसते याच्याकडे पहात.
जेव्हा धन्याला माझ्या, कोरोनानं गाठलं.
घरच्यांनी तर नाही, मात्र इतरांनी गाडीत घातलं.
दवाखान्यांमध्ये सुद्धा खेट खेट खेटला,
तरीसुद्धा कोठे बेड नाही भेटला.
डॉक्टरांनी मेल्यांनी मलाच पुढं घातलं,
तेव्हा कुठं याला दाखल करून घेतलं.
दवाखान्यात सुद्धा, माझ्या धन्याचा जीव कासावीस. कारण स्कोअर होता याचा, गंभीर मात्र चोवीस.
चिंता त्याला माझीच, माझ्या संपत्तीचं कसं होणार.
मी मात्र बिनफिकीर, हा गेला तर दुसरा कोणी येणार.
गरीब बिचारे याचक, त्यांच्याकडे ऑक्सिजनची खाण.
सोबत मी असून सुद्धा, धन्याला माझ्या ऑक्सिजनची वान.
म्हटलं होतं धन्याला, नको आसक्ती माझी धरू.
साधं इमानी आयुष्य जगून,
पूर्ण आयुष्य आपण तरू.
इस्पितळात होता तेव्हा, खूप सेवा याची केली.
शेवटी मलाच दोष देऊन गेला..........
तू पण नाही कामात आली.