कधी मी घायाळ व्हायचो,
चौफेर आक्रमणाने संकटांच्या.
गडबडायचो आकस्मिक माऱ्याने-
संघर्षांच्या, आव्हानांच्या.
चक्रव्युव्हात त्यांच्या मी खचायचो,
कुटिल डावपेचात त्यांच्या मी हरायचो.
अनुग्रह श्री स्वामी समर्थांचा,
आयुष्यात आगंतुक माझ्या आला,
शस्त्राविनाच शक्तीपात त्या साऱ्यांचा झाला.
''भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे''
स्वामी वचन मला हे झाले,
दोन हात करावया त्यांच्याशी,
तेव्हा कोठे बळ मला आले.
सुदर्शन माझ्या स्वामींचे फिरले,
संकटे किती तरी हवेतच विरले.
आता तर स्वामी शक्ती माझ्या पाठीशी,
संकटांनो, संघर्षांनो आव्हानांनो,
या समोर गाठ तुमची माझ्याशी.
श्री स्वामी समर्थ
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.