डॉक्टर च्या रिपोर्ट प्रमाणे मृत व्यक्तीचे आरोग्य अतिशय सुदृढ होते. वांशिक दृष्टीकोनातून माणूस इंग्रज वाटत होता, पायाचे स्नायू अतिशय बळकट असून हाथ आणि नखे पाहून ह्यामानास्ने शारीरिक कष्टाचे काम केले असेल असे वाटत नव्हते. मृत व्यक्तीने टोपी घातली नव्हती जे १९४८ सालच्या पद्धती प्रमाणे विचित्र होते. पोस्ट मार्टम मध्ये असे लक्षांत आले कि मृत व्यक्तीने ३-४ तास आधी एक पेटिस खाल्ला होता. शरीरांत काहीही विष सापडले नव्हते. किडनी, लिवर, आतडी ह्यातील सूज पाहून मृत्यू नैसर्गिक नव्हता हे मात्र स्पष्ट होते.
१९५२ साली इंग्लंड मधील स्कॉटलंड यार्डने तपास कामात भाग घेतला. जगभर ह्या माणसाचे फोटो प्रकाशित करण्यात आले पण ओळख पटविण्यास कोणीही समोर आला नाही.
३ डिसेंबर,१९४८ रोजी काही वर्तमान पात्रांनी हा माणूस ई. सी. जॉनसन आहे असे प्रकाशित केले होते पण सदर माणूस पोलिस स्टेशन मध्ये येवून आपण जिवंत आहोत हे दाखवून गेला. काही महिन्यांनी एका माणसाने आपण सदर माणसाला एका बार मध्ये दारू पिताना भेटलो होतो आणि त्या माणसा जवळ मिलिटरी ओळखपत्र होते असे सांगितले. पोलिसांनी सर्व मिलिटरी रीकोर्ड शोधले पण सदर माणूस त्यांना त्यात सापडला नाही. वाल्श नावाचा एक लाकूड तोडा गायब झाला होता ज्याचा चेहरा सदर माणसाशी अतिशय साम्य दाखवत होता पण सदर माणसाच्या एका मैत्रिणीने त्याचे शरीर पाहून त्याला ओळखण्यास नकार दिला त्या शिवाय काही व्रण जे वाल्शच्या शरीरावर होते ते मृत व्यक्तीच्या शरीरावर नव्हते.
१४ फेब्रुवारी १९४८ मध्ये बस सस्टेशन च्या लोकर रूम मध्ये एक सुटकेस सापडली जी मृत व्यक्तीची असावी असा कयास पोलिसांनी लावला. त्यात एक झगा, ४ चड्ड्या, एक चाकुची म्यान, एक कैची, एक चप्पल असे समान सापडले. त्याशिवाय ऑस्ट्रेलिया मध्ये न सापडले जाणारा एक विशेष प्रकारचा धागा पोलिसांना सापडला. हाच धागा मृत व्यक्तीच्या कोटाच्या खिश्याला रफू करण्यासाठी वापरला गेला होता त्यामुळे सुटकेस त्याच व्यक्तीची होती हे सिद्ध झाले. कैची आणि चाकू ज्या परकराचे होते त्या प्रकारचे चाकू आणि कैची फक्त खलाशी वापरात असत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुटकेस मध्ये पेन्सिल आणि कागद होते पण काहीही पत्रव्यवहार नव्हता. तसेच सुटकेस मध्ये एकही पायमोजा पोलिसांना सापडला नाही. सुटकेस ज्या वेळी लोकर रूम मध्ये ठेवली होती त्यातून हे सिद्ध झाले कि रेल्वेचे तिकीट जे मृत व्यक्तीच्या खिश्यात सापडले गेले होते ते वापरले गेले नव्हते आणि ह्या माणसाला कदाचित ती ट्रेन चुकली होती.
जून १९४९ मध्ये पुन्हा मृत शरीराची चाचणी करण्यात आली. एका विष विशारद प्राध्यापकाने दोन प्रकारच्या विषामुळे मृत्यू झाला असेल असा कयास केला. १९८० साला पर्यंत अमान्य लोकांना ह्या विषाचे नाव सांगण्यात आले नव्हते. पण डॉक्टर च्या म्हणण्या प्रमाणे मृत व्यक्तीच्या शरीरावर उलटी किंवा फेस नव्हता त्याशीवन माणसाचे बूट इतके साफ होते कि कुणी तरी मारून त्याला तिथे टाकला असण्याची शक्यता जास्त होती.