सदर पुस्तकाच्या एका पानावर एक फोन नंबर सापडला जो सोमार्तन बीच च्या जवळच राहणार्या एका नर्स चा होता. पोलिसांनी तत्काळ त्या नर्स च्या घरी धाव घेतली तिच्या म्हणण्या प्रमाणे, तिच्या जवळ एक असे पुस्तक जरूर होते जे तिने द्वितीय महायुद्धाच्या वेळी दवाखान्यात भरती झालेल्या बोक्साल नामक लेफ्टनंट ला भेट दिले होते. पोलिसांनी तिला मृत व्यक्तीचा फोटो आणि पुतळा दाखवला पण तिने त्याला ओळखण्यास साफ नकार दिला. ( पण त्या वेळी उपस्थित असलेल्या पोलिस अधिकार्यांनी हे स्पष्ट पाने नमूद केले कि पुतळा पाहून ती महील जवळ जवळ बेशुद्ध पडली होती आणि काही क्षणाच ती त्या पुतळ्याकडे बघू शकली होती,
तो पुतळा पाहून तिला मानसिक धक्का बसला होता हे स्पष्ट होते.) सदर महीला आता लग्न झाली असल्याने तिने पोलिसांना आपल्या पासून दूर राहण्याची विनंती केली आणि पोलिसांनी सुद्धा ती मान्य केली पण मृत व्यक्ती बोक्साल असावी असाच निष्कर्ष त्यांनी काढला पण योग योगाने २ वर्षांनी पोलिसांना बोक्साल जिवंत सापडला तसेच त्याच्या कडे ते रुबयीयात पुस्तक सुद्धा होते आणि त्याचे शेवटचे पान सुद्धा जसेच्या तसे शाबूत होते. पुस्तकावर नर्सने स्वतःच्या हस्ताक्षरांत ४ ओळी लिहिल्या होत्या. हि गोष्ट नर्स पोलिसांना सांगण्यास आधी विसरली असावी किंवा जाणून बुजून तिने ती गुप्त ठेवली असावी.
पोलिसांनी नर्सेचे नाव सुद्धा नमूद केले नाही. अनेक वर्षांनी ज्या पोलिस अधिकार्याने त्या नर्सची चौकशी केली होते त्याने एका टी.वी. प्रोग्राममध्ये असे सांगितले कि त्या नर्सला जरून ह्या माणसाची ओळख ठावूक होती. त्यावेळी ह्या महिलेने आपण लग्न झाल्याचे सांगितले होते तरी प्रत्यक्षांत तिने लग्न केले असल्याचा काहीही पुरावा पोलिसांना दिला नव्हता. २००७ साली काही पत्रकरांनी ह्या महिलेचा शोध घेतला पण ती त्याच साली दिवंगत झाली होति. तिच्या नातलागणी तिचे नाव प्रकाशित करण्यास न हरकत दखल दिला होता पण आज पर्यंत ते नाव प्रकाशित झाले नाही.
ब्लॅकमहाराज
One of the best stories. The fact that it is true is scary