तमाम शुड हे खुनांच्या रहस्यांच्या जगातले खूप गाजलेले नाव आहे. याला ‘सोमार्टन मॅन’ असेही नाव पडले आहे. कारण याचे शव सोमार्टन बीचवर सापडले होते. त्याच्या मृत्यूचे कारण आजतागायत एक रहस्य आहे. सत्तर वर्षांच्या तपासानंतर हि, रहस्यमय मृत्यू आणि ओळख यांची पुरेशी शहानिशा न करता आल्याने, याच वर्षी तथाकथित ‘सोमार्टन मॅन’च्या पुरलेल्या शवाचे अवशेष खणून बाहेर काढण्यात आले होते. १ डिसेंबर,१९४८ रोजी, त्याचा मृतदेह दक्षिणेकडील सॉमर्टन बीचवर सापडला होता. त्याच्या मृत्यूचे काहीही  परिस्थितीजन्य पुरावे न मिळाल्याने ती केस अजूनही ऑस्ट्रेलियाच्या पोलिस तपासत खुली आहे. हे प्रकरण मुख्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या ताब्यात आहे. ऑस्ट्रेलियन डिटेक्टिवनी त्याचे शव वेस्ट टेरेस कब्रीस्तानातून आणले होते. हे कब्रीस्तान अॅडिलेड येथे होते. बारा तासांनंतर, एक शवपेटी चार जणांनी पोलिसांच्या बंदोबस्तात स्मशानभूमीबाहेर नेली. त्या शवाला फॉरेन्सिक सायन्स एस.ए. येथे नेले गेले. तेथील तज्ञ डी.एन.ए. प्रोफाइल तयार करण्याचा प्रयत्न करीत होते, जेणे करून त्या शवाची ओळख पटण्यास मदत होईल.

हा सोमार्टन मॅन त्या समुद्रकिनार्यावरून जाणाऱ्या एका वाटसरूला दिसला होता. त्याने पहिलं तेंव्हा त्याचे शव समुद्रच्या किनाऱ्यावर असलेल्या मोठ्या-मोठ्या दगडांना टेकून पडले होते. त्याच्या मृत्यूचे गूढ अजूनही आकलनीय आहे. आजपर्यंत तुरूंगातून निसटलेल्या प्रियकरापासून ते शीतयुद्धात कार्यरत असणाऱ्या हेरापर्यंतचे अनेक दावे आणि सिद्धांत त्याच्या ओळखीवर करण्यात आले. प्राथमिक पोलिस तपासणीत आणि चौकशीत हे प्रकरण निराकरण न करता तसेच दुर्लक्ष केले गेले. विशेषत: त्याच्या शवाजवळ सापडलेल्या बऱ्याच वस्तूमुळे हे प्रकरण अजूनच रहस्यमय होत गेले.

त्याच्या शवाजवळ एक सुटकेस होती, काही कपडे होते ज्याचे लेबल काढून टाकण्यात आले होते, कदाचित त्याची ओळख लवकर पटू नये म्हणून केलेले कारस्थान असावे. काहीतरी असंगत लेखन असलेला एक कागद होता कदाचित कुठलातरी कोडं असल्याचे मानले गेले. ओमार काहीय्याम यांचे रुबियत हा काव्य संग्रह त्याच्याजवळ सापडला होता. एक कागदाचा कपटा देखील मिळाला होता. त्यात पर्शियन भाषेत “तमाम शुड” असे लिहिले होते. याचा अर्थ पर्शियन भाषेत “समाप्त” असं होतो. काय समाप्त झाले होते?? कि काहीतरी संपवून हा माणूस येथे आत्महत्या करायला आला होता आणि तसे त्याने केले असेल?? असे बरेच प्रश्न उभे ठाकले होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen on Youtube.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel