" बाळाच्या बारश्या च्या दिवशी संग्राम एका स्त्री सोबत वाड्यावर दाखल झाला . ती स्त्री होती कालिंदी . एक भयंकर स्त्री संग्राम पेक्षा ही कितीतरी दृष्ट .कालिंदी गावाला लागलेल ग्रहण होती. तिला बघताच धडकी भरावी अशीच होती ती.  कालिंदीची  आई  काळीजादू करणारी स्त्री होती. आपल्या काळ्या जादूचे प्रयोग ती चुकीच्या कामासाठी करायची.करणी ,भानामती,पिशाच्च विद्या, वशीकरण असे कुठले कुठले प्रयोग करायची. गावातले लोक तिला घाबरून असायचे.एक दिवस गावातल्या लोकांनी तिची तक्रार आबासाहेबांकडे केली .म्हणून आबासाहेबांनी तिला गावाच्या बाहेर हाकलून लावले. त्यानंतर ती या घनदाट जंगलात तिच्या मुलीसोबत राहू लागली.आबासाहेबांविषयी तिच्या मनात खूप राग होता म्हणून तिने त्यांच्यवर ही तिच्या विद्येचा प्रयोग केला पण आबासाहेबांवर शंभू सोमनाथा चा आशीर्वाद म्हणून त्यांच्यवर कसलाही वाईट परिणाम झाला नाही.


         कालिंदी ची आई तर काही वर्षांनी वारली पण मरताना तिने  सगळी काळीजादू आपल्या मुलीला वारसा हक्काने दिली. आईसारखीच कालिंदी दृष्ट होती ,चार पावलं पुढेच होती .तिच्या मनातही आबासाहेबां बद्दल प्रचंड राग होता .तिला आबासाहेबांच्या वारसदारांना निस्तनाभूत करायचे होते.म्हणून तिने संग्राम ला हाताशी धरलं त्याच्या ही मनात आबासाहेब  आणि भाऊं बद्दल राग होताच  त्यात या संपत्तीचा लोभ ही होता कालिंदी च्या मदतीने आणि तिच्या काळ्या शक्तीने त्याला वाड्यावर आणि गावावर सत्ता मिळवायची होती. त्यासाठी तो काहीही करु शकत होता.त्यांचे आणि कालिंदी ची जुनी ओळख होती .तिने त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते.पण आबासाहेबांच्या पुढे त्याचे काही चालले नाही आणि निर्मलाशी लग्न करावे लागले ,त्याला वाटलं की आपल्या ला मुलगा झाला तर वारसा हक्काने मोठा राहील आणि सगळा कारभार त्याच्या हाती येईल पण त्याला मुलगी झाली म्हणून तो खूप चिडला होता .आता हवं तसं वागायचं त्याने ठरवलं आणि कालिंदीशी लग्न करून तिला वाड्यावर आणल यातही दोघांचा नक्की काही तरी हेतू होता.
       रावसाहेबांनी संग्राम आणि कालिंदी ला दारातच अडवले आणि जाब विचारला. त्यावर उर्मटपणे संग्राम ने सांगितले की त्याने कालिंदी सोबत लग्न केले आहे. हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला भाऊ पण खूप चिडले.पहिली बायको असतांना दुसरं लग्न कस केलं म्हणून आणि तेही कालिंदी सोबत. संग्राम ने  निर्मलाची अनवधानाने एका कोऱ्या पेपर वर सही घेतली होती आणि त्यात    माझी पतीच्या  दुसऱ्या लग्नाबद्दल काही हरकत नाही अस त्याने  स्वतःच लिहले होते. तो पेपर त्याने भाऊंच्या तोंडावर फेकला. निर्मला तर धक्याने खालीच बसली. सगळ्यांना झुगारून संग्राम कालिंदी ला घेऊन वाड्यात शिरला. आनंदच्या प्रसंगी हे विपरीत होऊन बसलं होत.सगळे गावकरी कुजबुज करत निघून गेले.रावसाहेबांनी संग्रामवर खूप चिडले त्याला खूप बोलले. खूप तमाशा झाला संग्राम काही केल्या ऐकेना .वाड्याच्या पाठीमागच्या अंगणातील खोलीत संग्राम आणि कालिंदी राहायला गेले.संग्राम ने एकदा ही आपल्या लेकीला पाहिल नव्हतं .त्यावेळी त्याच्या डोक्यात फक्त संपत्तीचा मोह आणि भाऊंचा सूड हेच शिजत होत. निर्मला बिचारी ती तर काही ही करू शकत नव्हती.जानकीबाई तिला सावरत असायच्या. कालिंदी वाड्यात येऊन दोन दिवस झाले असतील रावसाहेब आणि भाऊ कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. आणि त्या रात्री निर्मलाची लेक जिचं नाव राधा  ठेवलं होतं ती रात्रीची रडत होती म्हणून निर्मलाला जाग आली तिने राधाला जवळ घेऊन शांत केले आणि अचानक लक्ष कालिंदी च्या खोली कडे गेले तिथे कसलासा धूर निघत होता आणि अचानक कालिंदी एका भयंकर रूपात बाहेर आली. तिचे डोळ्यात जस रक्त उतरलं होत. चेहऱ्यावर असुरी हास्य होत आणि हातात काहीतरी होत जे निर्मलाला दुरून नीट दिसत नव्हतं. कालिंदीच ते रूप बघून निर्मला भीतीने थरथरत होती .तिच्यासाठी हे खूप भयंकर होत तिच्या पाठोपाठ संग्राम ही आला आणि तिच्या मागे वाड्याच्या मागच्या दाराने बाहेर गेले.
         काय असेल हे सगळं याचा विचार निर्मलाच्या मनात येत होता .तिने भीतीने ती पटकन खिडकी लावून घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी च तिने ही गोष्ट जानकी बाईंना सांगितली त्याही घाबरून गेल्या .आपल्या या पवित्र वाड्यात कसले अभद्र प्रकार घडत होते. त्यात रावसाहेब आणि भाऊ पण घरी नव्हते त्यामुळे त्या दोघी रात्री घडलेल्या प्रकारचा जाब विचारू शकत नव्हत्या... दोन दिवसांनी भाऊ आणि रावसाहेब परत आले. निर्मला आणि जानकी खुप घाबरलेल्या होत्या .हे रावसाहेबांच्या लक्षात आलं त्यांनी दोघींना त्या बद्दल विचारलं तेंव्हा निर्मलाने घडलेला प्रकार रावसाहेबांना सांगितला रावसाहेब तडक त्या खोलीकडे आणि मोठ्या ने संग्राम ला आवज दिला तो आवज ऐकून बाहेर आला .रावसाहेबांनी त्याला त्या प्रसंगाबद्दल जाब विचारला. कालिंदी पण बाहेर आली रागारागाने सगळ्यांकडे बघू लागली. निर्मलाकडे तर खाऊ की गिळू अशी बघत होती. रावसाहेबांनी दोघांना घरून निघून जायला सांगितले पण ती दोघे अशी सहजासहजी जाणारे नव्हते .त्या दोघांनी खूप वेळ हुज्जत घातली शेवटी रावसाहेब तिथून बाहेर निघून गेले.
      संग्राम कितीही वाईट असला तरी त्यांचा मुलगा होता आणि तो त्या दृष्ट बाईच्या नादी लागला होता. म्हणून काळजी ,चीड,राग अश्या संमिश्र प्रतिक्रिया रावसाहेबांच्या होत्या..
क्रमशः


 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel