संग्राम आणि कालिंदी दोघे मिळून काहीतरी खलबत करत होती. काहीतरी अनिष्ट त्या खोलीत घडत होतं ज्याची कल्पना वाड्यात कोणालाही नव्हती. पण जानकीबाई आणि निर्मला घाबरून असायच्या. संग्राम तर निर्मला आणि राधा कडे बघत सुद्धा नव्हता. बिचारी निर्मला खूप दुःखी असायची ,जानकीबाईं जवळ रडायची त्या तिला आधार द्यायच्या .राधा कडे बघून निर्मला स्वतःला सावरायाची.
भाऊ संग्रामला समजावत पण तो कोणाचंही काहीही ऐकायचं नाही. तो पूर्णपणे कालिंदीच्या पाशात अडकला होता.गावातील लोकांचं ही वाड्यावर येणं जाणं कमी झालं होतं..
एक दिवस दुपारी वाड्यावर एक माणूस आला तो त्या कालिंदी चा साथीदार होता.वाड्याच्या मागच्या दाराने तो आत आला.तिच्याच सारखा तो भयंकर होता.त्याच नाव भीमा होता.कालिंदी जंगलात राहत होती तेंव्हा पासून भीमा तिला तिच्या दुष्कृत्यात मदत करायचा. खूप कठीण परिस्थितीत महिना निघून गेला. एका सकाळी वाड्यावर बातमी आली गावातील दोन लहान मूल अचानकपणे गायब झाली होती. त्यांचे आईवडील आणि गावकरी रावसाहेबांकडे ही बातमी घेऊन आले.रावसाहेबांनी लगेच पोलिसात तक्रार केली पण काही केल्या त्या मुलांचा शोध लागत नव्हता. मुलं गायब झाली त्या रात्री अमावस्या होती त्यामुळे लोकांच्या मनात वेगळीच शंका येऊ लागली . नरबळीच्या उद्देशाने त्या मुलांना गायब केलं असावं असं बहुतेक लोकांना वाटत होतं आणि सगळा संशय कालिंदी वर होता.पण पुरावे नसल्याने कोणी ठामपणे बोलू शकत नव्हत. त्या मुलांची आई सारखी रडत होती. रावसाहेब आणि भाऊ सगळ्यापरीने त्या लहान मुलांचा शोध घेत होते.
कळायला काही मार्ग नव्हता की मुलं गेली कुठे होती. त्या मुलांचा शोध लागतं नाही तर तिकडे पंधरा दिवसांनी अजून एक मुलगी बेपत्ता झाली. आता गावातील लोक घाबरायला लागली लहान मुलांना घराच्या बाहेर पडू देत नव्हते. रावसाहेब आणि भाऊ खूप चिंतेत असायचे. महिना उलटून गेला तरी त्या मुलांचा काही केल्या शोध लागत नव्हता. भीमाच वाड्यावर चोरून लपून येणं वाढलं होत. त्या खोलीत नेमकं काय चाललं होतं याचा काही पत्ता लागत नव्हता. आणि पुन्हा एकदा अमावस्या आली .निर्मलाला त्या रात्री खूप अस्वस्थ वाटत होतं .हळूहळू रात्र वर चढत होती .रावसाहेब आणि भाऊ घरी नव्हते.ते दुसऱ्या दिवशी सकाळी येणार होते. जानकीबाई, निर्मला आणि एक दोन गडी माणसं वाड्यावर होते. जानकीबाई निर्मलाच्या खोलीतच झोपल्या होत्या. थकल्या मुळे त्या लवकर झोपल्या पण निर्मलाला काही केल्या झोप येत नव्हती.काहीतरी अनिष्ट घडणार अस तिला राहून राहून वाटत होतं. लहानगी राधा आईच्या कुशीत शांतपणे झोपली होती. निर्मलाच्या मनात मात्र विचारांनी थैमान घातले होते.त्यात भीमा ही वाड्यावर आलेले होता. रात्री उशिरा कधीतरी निर्मलाला झोप लागली.
सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा बघते तर राधा तिच्या जवळ नव्हती ती घाबरली. इकडे तिकडे बघू लागली पण राधा नव्हती.तिने जानकीबाईंना उठवलं .त्याही घाबरल्या .धावत बाहेर येऊन पूर्ण वाड्यात राधाला शोधलं पण राधा कुठेच नव्हती.निर्मला आणि जानकीबाई दोघीही रडत होत्या. निर्मला तशीच धावत मागच्या अंगणात गेली आणि तिने त्या खोलीच दार वाजवल .जानकीबाई आणि गडी तिच्या मागे गेले .कालिंदी बाहेर आली तिची ती भेदक नजर मनात धडकी भरेल अशी होती. तिच्या पाठोपाठ संग्राम ही बाहेर आला.निर्मला ने तिला सरळ विचारलं की माझी मुलगी कुठे आहे.त्यावर कालिंदी मला काय माहित म्हणून म्हणाली. निर्मला तिला धक्का मारून सरळ आत घुसली .आत कुबट वास येत होता. लिंबू,धागेदोरे, काळ्या बाहुल्या, कुंकवाचे वर्तुळ काळ्या जादूचे साहित्य तिथे पडलेल दिसल.पण राधा तिथे नव्हती. निर्मला त्या खोली बाहेर पडणारच की तिला राधाच्या पायातली पैंजण दिसले .निर्मला घाबरली तिने संग्रामला विचारलं माझी राधा कुठे आहे,त्यावर तो क्रूरपणे हसून म्हणाला की तुझ्या त्या पोरीचा आम्ही नरबळी दिला आहे. निर्मला धडकन खालीच कोसळली. जानकीबाईंनी संग्रामाच्या एक कानाखाली लावली. हे बघून कालिंदी चिडली आणि जानकीबाईंच्या अंगावर मारायला जाणार च की तेवढ्यात तिकडून रावसाहेब आणि भाऊ आले . भाऊ कालिंदी चा हात धरला आणि मागे लोटल गावातील लोक ही वाड्यावर जमतात.निर्मला पुतल्यासारखी खाली बसलेली असते.
जानकीबाई घडलेलं सार सांगतात.रावसाहेबांना मोठा धक्का बसला. भाऊ चिडून संग्रामाच्या अंगावर जातात आणि त्याला जाब विचारला त्याने कबूल केलं की राधा आणि गावातील त्या तीन मुलांचा बळी दिला.गावकरी भयंकर संतापतात. आणि कालिंदी च्या आणि संग्रामाच्या अंगावर मारायला जातात. कालिंदी धावत तिच्या खोलीत जाते .गावकरी दरवाजा तोडून आत जातात .तिने अंगावर रॉकेल ओतून घेतलेले असते .सगळे तिला मारायला जाणारच की ती स्वतःला पेटवून घेते .सगळे घाबरत ,ओरडत बाहेर पडतात .कालिंदी भरभर पेटून मरून जाते. सगळे फक्त बघतच राहतात.पण मारतांना मी परत येईल अशी धमकी देऊन गेली. संग्राम ला कालिंदी च अस मरणं सहन झालं नाही .त्याचा प्रचंड आघात त्याच्या मनावर झाला. पोलीस आले त्यांनी संग्रामला ताब्यात घेतलं.निर्मलाची अवस्था खुप वाईट होती. रावसाहेब आपल्या लाडक्या नातीच्या मरणाने खचून गेले होते.
कालिंदीच्या मरणाने संग्राम वेडा झाला होता .त्यामुळे त्या तिघांनी कोणत्या कारणाने आणि कश्या पध्दतीने लहानग्या मुलांचा नरबळी दिला हे उघड झाले नाही. भीमा मात्र पसार झाला होता.पुराव्या अभावी आणि त्याची मानसिक परिस्थिती बघून संग्राम ला निर्दोष सोडून दिलं.त्याची अवस्था बघून भाऊंनी त्याला घरी आणलं.रावसाहेबांनी कामकाजातून सगळं लक्ष काढून टाकलं होतं. राधाच्या आठवणीत ते दुःखी असायचे. निर्मला तर राधा ची आई होती तीच्या बिचारीची काय स्थिती असेल.जानकीबाई तिची खूप काळजी घेत होत्या. भाऊंवर सगळी जबाबदारी येऊन पडली होती. संग्राम नी वरच्या खोलीत स्वतःला अक्षरशः कोंडून घेतल होत. जेवायला ही बाहेर पडत नसायचा .गडी त्याच्या खोलीच्या बाहेर ताट ठेवून त्याला हाक देऊन चालले जायचे वाटलं तर तो ते ताट आत न्यायचा नाहीतर ताट तिथेच पडलं रहायच.संग्राम आत कोणाशी तरी सारख बोलत असायचा .सगळ्यांना वाटायचं की याला वेड लागलं म्हणून बरळत असेल. पण आत वेगळंच काही तरी सुरू होत.
एका रात्री निर्मला पाणी पिण्यासाठी स्वयंपाक घरात गेली . खूप अंधार होता .बाहेर खूप पाऊस पडत होता .आणि अचानक तीच लक्ष अंगणातील खोलीबाहेर गेलं. एक कडकडून वीज चमकली आणि तिला त्या प्रकाशात भयंकर काहीतरी दिसलं. ती होती पूर्णपणे जळलेली विद्रुप भयंकर कालिंदी .तिला बघून निर्मलाच्या तोंडून मोठी किंकाळी बाहेर पडली.सगळे धावत तिच्या जवळ आले.निर्मला खूप घाबरली होती.तिने जे पाहिलं होतं ते खूप भयावह होत.जानकीबाईंनी तिला विचारले की काय झाले.तेंव्हा तिने घाबरत घाबरत काय पाहिलं ते सांगितलं.आता जानकीबाई पण घाबरल्या होत्या. भाऊंना वाटलं की कदाचित निर्मलाला भास झाला असेल. पण हा केवळ भास होता की येणाऱ्या संकटांची चाहूल होती..