या चित्रात एका तरुणीला हार हातात घेऊन वराची वाट पाहत असल्याचे दाखवण्यात आले आहे. ही कन्याकुमारी म्हणजेच कुमारी देवी आहे, जिचे मंदिर भारताच्या दक्षिण टोकाला आहे. तिची कथा खालीलप्रमाणे आहे.
उत्तरेत बर्फाच्छादित पर्वतावर राहणाऱ्या तपस्वी शिवाशी कन्याकुमारीला लग्न करायचे होते. लग्नाची वेळ अशा प्रकारे निश्चित करण्यात आली होती की शिव एका रात्रीत उत्तरेकडून दक्षिणेकडे पोहोचू शकेल; पण शिव दक्षिणेला पोहचण्यापूर्वी देवांनी कोंबडा निर्माण केला. जेव्हा कोंबडा आरवला, तेव्हा शिवाने विचार केला की सकाळ झाली आहे आणि लग्नाची शुभ मुहूर्ताची वेळ निघून गेली आहे. म्हणून, ते अर्ध्या रस्त्यातूनच परत आले.
इकडे कन्याकुमारी वधूची वेशभूषा करून तिची वाट पाहत राहिली, पण तिचा वर भगवान भोलेनाथ आलेच नाहीत. लग्नासाठी तयार केलेले सर्व अन्न वाया गेले. संतापाच्या भरात देवीने भांडी लाथाडून लावली आणि केलेला सर्व शृंगार पुसून टाकला. हेच कारण आहे की भारताच्या दक्षिण टोकावर समुद्र आणि वाळूचे वेगवेगळे रंग आहेत.
देवीकडे इतकी मोठी शक्ती होती की तिला केवळ विवाह आणि मातृत्व याद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते. आता देवी वराशिवाय कुमारीच राहू लागली. तेव्हा देवांनी त्याला राक्षसांच्या संहारासाठी तिच्याकडे प्रार्थना केली.
ही कथा देवीच्या शुद्ध उर्जेकडे आपले लक्ष वेधते. जर तिने लग्न केले असते तर तिने संसार करण्यासाठी तिची शक्ती वापरली असती. अविवाहित राहिल्यामुळे तिने जगाचे रक्षण करण्यासाठी आपली शक्ती वापरली.
देवी भौतिक जगाचे प्रतीक आहे. आपण आपल्या ज्ञानेंद्रियांद्वारे भौतिक जगाचे केवळ निरीक्षण करतो. आपल्याला हे जग एका मातेच्या रुपात पाहायचे आहे, जेणेकरून ती माता खाऊ घालू शकेल आणि आपले भरण पोषण करू शकेल. त्याचप्रमाणे आपल्याया या जगाला एका योद्ध्याच्या रूपातही बघायचे आहे, जेणेकरून ती आपले संरक्षण करू शकेल.
तर, देवी आणि तिचे विविध प्रतिरूपे माता आहेत आणि योद्धा देखील आहेत, जी प्रेमळ आहेत आणि भयंकर देखील आहेत. कुलदेवता आणि ग्रामदेवता हि या प्रतिरूपांची उदाहरणे आहेत.