सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ साली वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे या गावात झाला. त्याकाळी ब्रिटीश सत्ता होती. त्यांच्या वडिलांचे नाव अभिमन्यू साठे होते. ते त्याकाळचे गुराखी होते त्यांच्या अनेक गाई म्हशी होत्या. सिंधुताईंचा जन्म अश्या वेळी झाल जेंव्हा भारतात मुलगी जन्माला येणे म्हणजे अवांछित मूल समजले जायचे.
अश्या वेळी त्यांना त्यांच्या आई वडिलांनी चिंधी हे नाव दिले चिंधी म्हणजे एखाद्या कापडाचा फाटलेला तुकडा. ज्याची गरज आणि किंमत त्याकाळी शून्य होती पण त्याच चिंधी ने इतरांच्या फाटलेल्या आयुष्या ठिगळ लाऊन दुरुस्त केली. सिंधुताईचे अत्यंत गरिबीत जीवन काढले होते.
वयाच्या आठव्या वर्षी या चिमुकल्या मुलीवर कौटुंबिक जबाबदाऱ्या आल्याने शिक्षण चौथीत सोडवं लागलं होते. त्यांनी चौथी इयत्ता यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून सोडली होती. वयाच्या १२व्या वर्षी चिंधीचे आपल्या वयाच्या २० वर्षाने मोठ्या असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी लग्न लावण्यात आले होते. सिंधुताई लग्न करून वर्ध्यामध्येच सेलु मधील नवरगाव गावात आल्या होत्या. त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही. सिंधुताइंना वयाच्या २०व्या वर्षी एक मुलगी पदरात देऊन त्यांना एकटीला आयुष्याच्या दरीत ढकलले गेले.
त्याकाळचे सिंगल पेरेटिंग करण्यासठी सिंधुताई घरातून निघाल्या होत्या.प्रतिकूल परिस्थितीशी लढ देत, आपल्या वाट्याला आलेल्या आयुष्याला दोष न देता, त्यावर मात करीत सिंधुताईंनी उभ्या महाराष्ट्रातल्या अनाथांना आईची माया दिली. सिंधुताई सपकाळ यांच्या सामाजिक कार्याची राष्ट्रीय स्तरावरहि मोठी प्रशंसा झाली होती.
सिंधूताईंच्या आयुष्याची कहाणी संघर्षमय आणि प्रेरक आहे. कोवळ्या वयात झालेले लग्न, त्याकाळी एकट्या बाईने मुलांना वाढवण्याची कसरत, मुलांचे संगोपन करताना सिंधुताई यांनी सोसलेल्या यातना, त्यांच्याच घरात आणि समाजात होणारी उपेक्षा या सगळ्यातून मेरू सारख्या उभ्या राहिल्या त्या सिंधुताई सपकाळ.