बऱ्याच दिवसानंतर बादशाहाला आपल्या सरदाराची विचित्र परीक्षा घेण्याची लहर आली .त्याने आपल्या सरदाराना माजरीची गोजिरवाणी पिल्लू दिली.
तो म्हणाला आज पासून बरोबर सहा महिन्यांनी हि पिल्लू घेऊन दरबारात यायच आहे. ज्याचे मांजर श्रेष्ठ ठरेल त्याला बादशाह कडून मोठ बक्षीस दिल जाईल .प्रत्येक सरदार आपलेल्या मिळाल्या मांजराचे पिल्लू घेऊन घरी गेले .घरातल्या माणसाना त्यांनी बादशहा नि लावलेल्या बक्षीस बदल सांगितले. मांजराला चांगली मिठाई व दुध खाऊ पिऊ घाला अशी घरतल्या माणसांना सूचना दिली .प्रत्येक सरदाराच्या घरी सरदाराच्या घरी मांजराना खुराक चालू झाला .हळू हळू मांजराच्या अंगावर तेज येऊ लागल ती चांगली गुबगुबीत दिसू लागली .मात्र बिरबलान आपलेल्या मिळालेल्या असा खुराक दिला नाही.
घरातल्या साध्या अन्नावर त्याला वाढवील उंदीर पकडायला शिकवलं बिरबलाचे मांजर उंदीर पकडण्यात तरबेज झाले .मात्र ते हडकुळे राहिले . अकबर बादशाहने एक चांगला दिवस ठरवून सर्व सरदारांना आपआपली मांजर दरबारात घेऊन यायला सांगितले .प्रत्येक जन आपआपली मांजर घेऊन दरबारात आला. अकबरान सर्व मांजरा वरून नजर फिरवली .बिरबलाच्या हातातील हडकुळे मांजर पाहून बादशाहाला हसू आले.आपले हसू दाबीत बादशहा म्हणाला "बिरबल सर्व सरदाराची मांजर गुबगुबीत दिसत असताना तुझे मांजर हडकुळे का ? बिरबल आपल्या मांजरी वरून हात फिरवत म्हणाला "खाविंद आपण मांजराची परीक्षा तर घ्या .उंदीर पकडन हे मांजराचे काम आहे .त्यात ते पटाईत असायला हवे .बादशाहने मान हलवली आणि नोकराला दरबारात उंदीर सोडायला सांगितले पंधरा वीस उंदीर दरबारात धाऊ लागले .प्रत्येक सरदाराने त्या दिशेने आपली मांजर सोडली .बिरबलाच्या मांजराने तर बिरबलाच्या हातातून उडी मारली .ते उंदराच्या मागे सुसाट धावत सुटले .त्याने दोन तीन उंदीर मारले देखील इतर गलेलठ मांजरे फक्त आपल्या गोंडेदार शेपट्या फुगवून तशाच जागेवर बसून पाहून लागली. त्यांनी फक्त आपल्या मिशा फेंदारल्या होत्या आणि अंग फुगविले होते.सरदार त्यांना पुढे ढकलत होते. परंतु जागेवरून हलण्याची तयारी नव्हती .बादशाहने बिरबल च्या मांजराला श्रेष्ठ ठरवून बिरबलाला भल मोठ बक्षीस दिल.