अप्रगत राष्ट्रावर आर्थिक व राजकीय वर्चस्व मिळवून तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग आपल्या देशासाठी करणे हे नव्या साम्राज्यवादाचे प्रमुख उद्दिष्ट होते. अशा प्रकारच्या साम्राज्यवादाला आर्थिक साम्राज्यवाद असे म्हणतात.
अठराव्या शतकात औद्योगिक क्रांती प्रथम इंग्लंडमध्ये झाली, म्हणून इंग्लंडला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर म्हटले जाते. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीचा प्रसार युरोपीय राष्ट्रांमध्ये झाला. या औद्योगिक क्रांतीने भांडवलशाहीला जन्म दिला. व्यापारी कंपन्यांमुळे युरोपातील देशांची आर्थिक भरभराट होत होती. आर्थिक भरभराटीतून इंग्लंटमधील धनसंचय वाढीस लागला. त्यातून युरोपात भांडवलशाही अर्थव्यवस्थेची पायाभरणी झाली.
भांडवलशाहीच्या विस्तारातून नव्या प्रकारचा साम्राज्यवाद अस्तित्वात आला. औद्योगिकीकरण झालेल्या युरोपीय राष्ट्रांनी व्यापार वाढीसाठी साम्राज्य विस्ताराचे धोरण स्वीकारले. अशा प्रकारे जगात आर्थिक साम्राज्यवाद वाढीस ला