मोहन आगाशे ह्यांचा जैत रे जैत म्हणजे मराठी सिनेमा मधील एक मैलाचा दगड आहे. हे शब्द लिहिताना माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला आहे. मोहन आगाशेंचा नाग्या आणि स्मित पाटील ह्यांची चिंधी हि ठाकर जातीची जोडी ह्यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे. दोघांचे एक मेकावर प्रेम आहे. एक दिवस नाग्यावर मधमाशी हल्ला करतात आणि त्याचा एक डोळा निकामी होतो. नाग्या सुडाच्या भावनेने पेटून उठतो आणि त्याची गरोदर पत्नी चिंधी त्याला साथ देते. Obsession म्हणजे काय हे नाग्या आपल्या भुमिके द्वारे आम्हाला दाखवतो. नाग्या शेवटी उंच कड्यावर चढून सर्व मधाची पोळी नष्ट करतो पण खवळलेल्या माश्या खाली असेलल्या चिंधी वर तुटून पडतात आणि तिचा मृत्यू होतो.
नाग्या जिंकतो पण हरतो सुद्धा. मोहन आगाशे ह्यांनी हि भूमिका सुंदर पाने रेखाटली आहेच पण त्याच वेळी ह्या भूमिकेचा पुरेपूर आनंद घेताना ते दिसतात.