मौर्य साम्राज्य
भारतीय लेखांमध्ये इ.स.पूर्व ३२६ मध्ये अलेक्झांडर द ग्रेटच्या सिंधुच्या खोऱ्यातल्या आक्रमणाबद्दल काहीच उल्लेख नाही तरी ग्रीक लेखकांनी त्या काळातल्या दक्षिण आशियात असणाऱ्या परिस्थीतीची उल्लेख नक्कीच केला आहे. पुढची अनेक वर्षे भारतीय आणि ग्रीक संस्कृतीत विशेषतः कला, निर्माण, आणि नाण्यांचा बाबतीत एक मिलाप दिसून आला आहे. उत्तर भारताच्या राजकीय समीकरणात मगधच्या उदयाचा एक व्यापक प्रभव पडला. काहीच काळानंतर चंद्रगुप्त नावाच्या राजाने मगधपासुन सुरूवात करून संपूर्ण देशावर ताबा मिळवला आणि त्यानंतर त्याने अफगाणिस्तानाकडे कुच केली. हा काळ भारताच्या सर्वात महान साम्राज्याचा, मौर्य साम्राज्याचा होता. इ.स.पूर्व ३२२ मध्ये चंद्रगुप्त मौर्याच्या नेतृत्तवाखाली मगध शेजारच्या राज्यांवर ताबा मिळवू लागले. चंद्रगुप्त ज्याने इ.स.पूर्व ३२४ ते ३०१ पर्यंत राज्य केलं, हा भारतावर साम्राज्य गाजवणारा सर्वात पहिला योद्धा होता. मौर्यन साम्राज्य (इ.स.पूर्व ३२६ – १८४ ) ज्याची राजधानी पाटलीपुत्र होती जी आजच्या बिहारची राजधानी पटना म्हणून ओळखली जाते. सुपीक जमिन आणि धातू संग्रह (विशेषतः लोखंड) च्या जवळ स्थित मगध हे पैसा आणि व्यापाराचं केंद्र होतं. इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात ग्रीक इतिहासकार आणि मौर्य न्यायालयाचे राजदूत मेगास्थींसच्या मते त्या राजधानीत भव्य महाल, मंदिर, विश्वविद्यालय, ग्रंथालय, बागा इत्यादी होते. कथांनुसार चंद्रगुप्तचं यश हे बऱ्याचअंशी त्याच्या सल्लागार कौटिल्य, अर्थशास्त्राचे (सरकारी प्रशासन आणि शासकीय धोरणांबद्दल मार्गदर्शन करणारं एक पुस्तक) ब्राह्मण लेखकावर अवलंबुन होती. एक अत्यंत मध्यवर्ती आणि प्रतवार सरकार होतं ज्यात बरेच कर्मचारी नियुक्त होते जे नियमीत कर गोळा करायचे, पैसा आणि व्यापार, औद्योगिककला, खोदकाम, महत्त्वपूर्ण तपशील, परदेशीयांचे कल्याण, बाजार, मंदिर आणि वेश्यांसहित इतर सार्वडनिक ठिकाणांची देखभाल करायचे. एक विशाल सैन्य आणि गुप्तचर यंत्रणा स्थापन करण्यात आली होती. राज्यांची प्रांत, जिल्हे आणि गावांमध्ये विभागणी करण्यात आली होती, ज्यांसाठी स्थानिक अधिकारी केंद्रसरकारची कामं पहात असे. अशोक बिंदूसारचा विश्वासु सुपूत्र आणि चंद्रगुप्तचा नातू होता. आपल्या वडिलांच्या राज्यात तो उज्जैन आणि ताक्लिसाचा राज्यपाल होता. त्याच्या सर्व भावांचे सिंहासनावरचे हक्क डावलून अशोकला राजा म्हणून जाहिर करण्यात आलं. त्याने इ.स.पूर्व २६९ ते २३२ पर्यंत राज्य केलं आणि तो भारताच्या अत्यंत प्रतिभाशाली राजांपैकी एक होता. अशोकच्या नेतृत्त्वाखाली मौर्यन साम्राज्याने संपूर्ण खंडावर आपली सत्ता प्रस्थापित केली. अशोकने मोर्यन साम्राज्याला दक्षिण आणि दक्षिण पूर्व सोडून पूर्ण भारतभर आपलं राज्य पसरवलं आणि मध्य आशियापर्यंतही आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. अशोकाचे शिलालेख पर्वत आणि दगडी खांबावर, त्याच्या राज्याच्या महत्त्वाच्या स्थानी – लम्पका (आधुनिक अफगाणिस्तान मधील लघमान), महास्तान (आताच्या बांग्लादेशात), आणि ब्रह्मगिरी (कर्नाटक) स्थापित केले होते. यांपैकी काही शिलालेखांनुसार आपल्या कलिंगाविरूद्ध झालेल्या युद्धात झालेल्या हिंसेमुळे चिडून अशोकने हिंसेचा त्याग केला आणि अहिंसेच्या धोरणाचा अवलंबन करण्याचा निर्णय घेतला. तो वैयक्तिक आयुष्यात जरी बौद्ध धर्म पाळत होता तरी त्याची इतर भाषा आणि धर्मांप्रती असणारी सहिष्णुता भारताच्या बहुलतावादाची वास्तविकता दर्शवायची. सुरूवातीच्या बौद्धकथांनुसार त्याने आपल्या राजधानीत एका बौद्ध समितीची स्थापना केली होती. ते पूर्ण राज्यात फिरायचे आणि त्यांनी श्रीलंकेपर्यंत आपल्या बौद्ध धर्म प्रसारकांना पाठवलं होतं. त्याच्या राज्यात मौर्यन साम्राज्याने उत्कृष्टतें शिखर गाठलं होतं आणि त्याच्या मृत्यूनंतर १०० वर्षांनी या साम्राज्याचा अंत झाला. त्याच्या राज्यात बौद्ध धर्म सिरीया, इजिप्त, मसदोनिया, मध्य आशिया आणि बर्मा पर्यंत पसरला. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी त्याने डोंगर आणि दगडी खांबावर लेख लिहीणं सुरू केलं जेणेकरून लोकं सहज वाचू शकतील. हे डोंगर आणि खांब आजही भारतात आहेत आणि गेली २००० वर्ष प्रेम आणि शांतीचा संदेश लोकांना देत आहे. आपल्या विचारांना त्याने धर्म असं नाव दिलं. इ.स.पूर्व २३२ मध्ये अशोकचा मृत्यू झाला. सारनाथला असलेल्या अशोकस्तंभाला भारत राष्ट्रचिन्ह म्हणून संबोधतं. अशोकस्तंभावर असलेलं ‘धर्मचक्र’ आपल्या राष्ट्रध्वजाची शोभा वाढवतं.