मेहरगड (भारतीय उपखंडाचा उत्तर पश्चिमी क्षेत्र ) इथून मिळालेल्या ऐतिहासिक पुराव्यांच्या मते भारतीय संस्कृतीची सुरूवात इ..पूर्व ६५०० त्या आसपास झाली. हे दुनियाभरातलं त्या काळातलं सर्वात जुनं आणि शहरी स्थान आहे. इथून आपल्याला प्राण्यांना पाळणं, शेतीचा विकास आणि कला आणि शिल्प यांच्या संबंधित पुरावे सापडतात. ..पूर्व ६५०० मध्ये सर्वात आधी येथे घोडे पाळण्यात आलेएका प्रगतिशील प्रक्रियेअंतर्गत गुरांना पाळणं, शेतीचा विकास, धातूंचा वापर आणि गावांचा आणि शहरांचा विकास या गोष्टींचा विकास झाला. काही इतिहासकारांनी सुचवलं की भारतावर इ..पूर्व १५००-१००० मध्ये सर्वप्रथम आर्यांनी आक्रमण केलं. पण सध्याची कोणतीच ऐतिहासिक माहिती दक्षिण आशियावर इंडो आर्यन किंवा युरोपियन आक्रमण झाले असल्याला दुजोरा देत नाही. ही लोकं मुळात आजच्या भारतीय जातिसमुहांसारखेच होते आणि तशीच भाषा बोलायचे.   

 

दोन महत्त्वाच्या शहरांचा शोध लागला - १९२० मध्ये उत्खनना दरम्यान रावी नदीवर हडप्पा आणि सिंधु नदीवर मोहेंजोदडो ! या देन्ही शहरांचे अवशेष एका मोठ्या आणि संपूर्णपणे विकसीत अश्या संस्कृतीचा भाग होते जी ला इतिहासकारसिंधु घाटी संस्कृतीकिंवासरस्वती संस्कृतीअसं संबोधतात. नंतर इ..पूर्व ३१०० ते १९०० मध्ये हडप्पन संस्कृती एक विशाल शहर, क्लिष्ट संस्कृती आणि धातूकरण, कला आणि शिल्पांचा विकास आणि मोजमापनातली अचूकता दर्शवते.  ते मोठ्या इमारती बांधायचे ज्या गणितावर, आकडेमोडीवर आधारीत असायच्या. त्या काळच्या शहर वसवण्याच्या पद्धतींची तुलना आजच्या आपल्या उत्तम आधुनिक शहरी इमारतींशी केली जाऊ शकते. या संस्कृतीची एक लिखीत भाषा होती जी अत्यंत उत्कृष्ट होती. यांपैकी काही शहरांचा व्यास ३ मैल इतका होता. या जुन्या नगरपालिकांमध्ये अन्नाचे भांडार, किल्ले आणि घराघरात शौचालय होते. मोहेंजोदडोमध्ये एक मैल लांब कालवा शहरांना समुद्राशी जोडायचा आणि तिथून व्यापारी जहाज मेसोपोटामियापर्यंत जायचे. आपल्या सर्वोच्च काळात सिंधु संस्कृती सिंधु नदीच्या खोऱ्याच्या अर्ध्या दशलक्ष चौरस मैलांपर्यंत पसरली होती आणि इजिप्त आणि सुमेरच्या संस्कृतींच्या समकालीन असुनही ती त्यांच्यापेक्षा जास्त काळ टिकली. ही सरस्वती संस्कृती व्यापाराचा आणि दक्षिण आणि पश्चिम आशियामध्ये संस्कृतीचा केंद्रबिंदू होती.मेहरगढ हडप्पा, मोहेंजोदडो, कालीबंगा आणि लोथल विशाल सरस्वती संस्कृतींचे प्रमुख शहर आहे. आणि या किनाऱ्यावर अजुनही ५०० पेक्षा जास्त शहरांचं उत्खनन बाकी आहे.इ.स.पूर्व ४५०० साली मान्धात्र ने ट्रय्हुस ला हरवुन त्याला पश्चिमेत इराणातून उलथवून लावलं. इ.स.पूर्व ४००० – ३७०० हा ऋग्वेदाचा काळ होता. इ..पूर्व ३७३० मध्ये १० राजांचं युद्ध झालं. हा काळ सुदा आणि त्यांचे सल्लागार ऋषी वशिष्ठ आणि विश्वामित्र यांचा होता. ..पूर्व ३६०० ते ३१०० ही वैदिक काळाची सांगता होती जेव्हा साम, यजुर आणि अथर्व वेद लिहीले गेले. ..पूर्व ३१०० हा व्यासांद्वारे महाभारत लिहीले गेल्याचा संभाव्य काळ आहे. याच काळात पृथ्वीच्या हलण्याने यमुना नदीचा,  जी सरस्वती नदीची उपनदी होती, तिचा मार्ग बदलला. यामुळे सरस्वती नदी लहान झाली. ही कलियुगाची सुरूवात होती. ..पूर्व १९००ला अजुन एकदा धरतीच्या हलण्याने सतलज नदी सरस्वती पासुन वेगळी झाली. सरस्वती कोरडी पडल्याने अनेक लोक पूर्वेला गंगाघाटाकडे निघाले ज्यामुळे भरतात अनेक संस्कृत्यांचा जन्म झाला. हडप्पन संस्कृती नंतर इ..पूर्व १९००-१०००  मध्ये नैसर्गिक आणि नदीच्या परिवर्तनामुळे हडप्पन शहरांना त्यागण्यात आलं.  विकेंद्रीकरण आणि स्थलांतरं होऊनही जुन्या शेती आणि कला परंपरा आणि अनेक नविन शहरं जसे द्वारका टिकले. पारंपारिक भारताची शास्त्रीय संस्कृती ही एक हजार वर्षांच्या काळानंतर गंगा संस्कृतीत विकसीत झाली जिने आपल्या सरस्वतीच्या खोऱ्यातल्या आपल्या मुळांना वेदांद्वारे घट्ट धरून ठेवलं.  

 

डेविड फ्राव्ले आणि अन्य आधुनिक विद्वानांचा प्रस्ताव

१.       ..पूर्व ६५००३१००, पूर्व हडप्पा, ऋग्वेदाची सुरूवात

२.       ..पूर्व ३१००-१९००, परिपक्व हडप्पा, ३१००-१९००, चार वेदांचा काळ

३.       ..पूर्व १९००-१०००, हडप्पा संस्कृतीची सांगता, वैदिक आणि ब्राह्मण काळाचा अंत

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel