“आई, नको तिला रडवू. तिचे पाय मोकळे कप. पाय वाढू न देणारे ते लोखंडी जोडे काढ तिच्या पायांतून” लहान सन्यत्सेन बहिणीचे दु:ख बघवेना, म्हणून आईची मनधरणी करीत होता. पाय वाढू न देणे हे चिनी स्त्रियांच्या सौंदर्याचे लक्षण मानीत! लहान मुलींचे पाढते पाय अशा घट्ट लोखंडी बंधनात घालून ठेवीत. ती अपार वेदना असे. चीनमध्ये सर्वांगीण क्रांती करणारा सन्यत्सेन आधी घरी क्रांती करायला उभा राहिला. १८६६ मध्ये तो जन्मला. कन्तान शहराजवळ त्याचे गाव. बालपणापासून तो स्वतंत्र वृत्तीचा. मंदिरातील मूर्तीची लोक पूजा करीत. तो म्हणे, “ही मूर्ती स्वत:चेही रक्षण करू शकत नाही!” एके दिवशी मूर्तीच्या पायाचे एक बोट त्याने तोडले. गावात प्रक्षोभ पेटला. आईबाप मुलाला म्हणाले, “गाव सोडून जा. त्यात सर्वांचे भले!” सन्यत्सेन कन्तानला आला व तेथून एका ब्रिटिश आगबोटीतून मकाव येथे गेला. “केवढाल्या आगबोटी हे लोक बांधतात! चीन नाही का बांधू शकणार? पाश्चात्त्यांहून का आम्ही कमी आहोत?” असा विचार त्याच्या मनात आला. तेथील ब्रिटिश मेडिकल कॉलेजात तो विद्यार्थी झाला. त्या कॉलेजातील तो पहिला चिनी पदवीधर!

देशाची चिंता
सन्यत्सेनने दवाखाना घातला, परंतु रोग्यांना औषधे देत असताना चीनचा रोग कसा बरा होईल याचा विचार सारखा त्याच्या डोक्यात चाले. १८९४ मध्ये चिनी-जपानी युद्ध होऊन चीनचा पराजय झाला. चीनभर असंतोष पेटला. सन्यत्सेनने चीनपुनरुद्धार मंडळ स्थापिले व चीनभर त्याच्या शाखा पसरविल्या. कप्तान शहरात लष्करातील मुख्य अधिका-यास भेटायला निघाले. परंतु त्या लोकांना पकडण्याचा हुकूम सुटला. त्या तीनशे लोकांत सन्यत्सेनही होता. तोही पकडला जायचा; परंतु निसटला.

फाशीच जायचा

सन्यत्सेन आता मोठा कट रचू लागला. कन्तान शहर ताब्यात घेऊन तेथे स्वतंत्र सरकार स्थापावे असे त्याने मनात आणले. शस्त्रे जमू लागली. सन्यत्सेन व त्याचे सहकारी गुप्तपणे कन्तान शहरात शिरले, परंतु कटाचा सुगावा लागला. सन्यत्सेनचे सहकारी पकडले गेले. तोही पकडला जायचा; परंतु भिंतीवरून उडी मारून निसटला. त्याच्या १९ सहका-यांना फाशी देण्यात आले.

जगभर १५ वर्षे वणवण
या वेळेपासून जवळजवळ १५ वर्षे तो जगभर भटकत होता. जेथे जेथे म्हणून चिनी लोक होते तेथे तो जाई, क्रांतीचा संदेश देई, मदत गोळा करी. चिनी सरकारचे हेर व मारेकरी जगभर त्याच्या पाठोपाठ होते. त्याला पकडून देणा-यास मोठे बक्षीस जाहीर झाले. एकदा लंडनमध्ये अचानक तो पकडला गेला. तेथील चिनी वकिलातीत त्याला ठेवण्यात आले. लंडनच्या गोदीत त्याला चीनमध्ये नेण्यासाठी एक बेट उभी होती. परंतु एका नोकराकरवी आपले पूर्वीचे शिक्षक डॉ. कान्ट ली यांच्याकडे त्याने चिठ्ठी पाठवली. डॉ. कान्ट ली यांनी शिष्याच्या सुटकेसाठी जाहीर चळवळ केली. अखेर ब्रिटिशांच्या दडपणामुळे चिनी वकिलातीतून सन्यत्सेन मुक्त झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel